शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

Holi 2025: मथुरेत फुलाच्या पाकळ्यांनी होळी खेळण्यामागे काय आहे कथा? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 13:54 IST

Holi 2025: उत्तर भारतात होळीला अधिक महत्त्व आहे आणि ती साजरी करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या, त्यापैकीच ही पर्यावरणपुरक पद्धत जाणून घेऊ.

यंदा १३ मार्च रोजी होळी आहे. परंतु देशभरात होळी साजरी करण्याची पद्धत वेगवेगळी असल्यामुळे होळीचे वेध फार आधीपासून लागतात. उत्तर भारतात तर होळीला अतिशय महत्त्व आहे. होळी, धुळवड, रंगपंचमी याबरोबर 'फुलेरा दुज' नावाने आजच्या दिवशी होळी खेळली जाते. यामागे एक कथा आहे. 

राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमाचे दाखले आजही दिले जातात. कृष्णाचा विवाह रुख्मिणी, सत्यभामाशी होऊनसुद्धा कृष्णाचा आठव करताना राधाकृष्ण हेच नाव आपल्या ओठी येते. एवढे त्यांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. त्यांच्या प्रेमात शारीरिक नाही आंतरिक ओढ होती. याच ओढीमुळे एकदा राधा कृष्णावर रागावली. कारण अनेक दिवसात त्यांची परस्परांशी भेट झाली नव्हती. राधेने अनेकदा कृष्णाला साद घातली, परंतु मथुरेच्या व्यापात अडकलेल्या कृष्णाला येणे जमत नव्हते. 

राधा हिरमुसली. कृष्णाच्या विरहाने व्याकुळ झाली. तिची अवस्था पाहून गोप गोपिकासुद्धा श्रीकृष्णावर रागावलया. एवढेच काय, तर वृन्दावनातल्या लता, वेलीसुद्धा कोमेजून गेल्या. ही वार्ता मथुरेत कृष्णाला कळली. कृष्णाला राहवेना. त्याने येतो, असा निरोप धाडला. कृष्ण येणार हे कळताच वृंदावनातले वातावरण आनंदून गेले. 

कृष्ण वृंदावनी आला. त्याने राधेची भेट घेतली आणि तिला नुकतेच उमललेले एक सुंदर फुल भेट म्हणून दिले. राधेनेही कृष्णाला छानसे फुल भेट म्हणून दिले. त्या दोघांचा परस्परांना पाहून झालेला आनंद पाहता साऱ्या सृष्टीने दोघांवर पुष्प वृष्टी केली. त्या भेटीनंतर कृष्ण होळी, रंगपंचमी झाल्यावर मथुरेत परतला. तेव्हापासून फाल्गुन द्वितीयेच्या दिवशी फुलेरा दुज हा उत्सव मथुरा आणि वृंदावनात साजरा केला जातो. 

हा सण वसंत ऋतूशी जोडलेला आहे. वसंतात उमलणाऱ्या विविध फुलांशी आपला परिचय व्हावा, निसर्गाशी जवळीक साधता यावी आणि दाम्पत्यांमध्ये प्रेम संबंध अधिक घट्ट व्हावेत, हा या सणामागील मुख्य उद्देश आहे. 

आजच्या काळाशी या सणाचा संबंध जोडायचा ठरवला, तर रंगपंचमीच्या दिवशी केमिकल रंगांनी होळी न खेळता, नैसर्गिक रंगांनी होळी खेळावी, हा संदेश या सणातून घेता येऊ शकतो. 

टॅग्स :Holiहोळी 2025