शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Holi 2025: पारमार्थिक होळी कशी खेळली जाते माहितीय? कवितेतून जाणून घेऊ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 07:05 IST

Holi 2025:होळी हा रंगांचा सण, अध्यात्म हाही एक रंग; इतर रंग पाण्याने निघून जातीलही, पण अध्यात्माचा रंग निघत नाही उलट अधिक गडद होत जातो!

आपण सगळे जण सण-उत्सवाच्या निमित्ताने क्षणिक सुख वेचत असतो. मात्र संत सज्जन कायमस्वरूपी आत्मानंदाची अनुभूती घेत असतात. त्यासाठी त्यांना कोणत्याही औचित्याची गरज लागत नाही. ते शारीरिक पातळीवर संसार करत असले तरी तरी मानसिक पातळीवर भगवंताशी एकरूप झालेले असतात. त्यामुळे ते लौकिक पातळीवर आपल्यासारखे सण उत्सव साजरा करताना दिसत असले तरी अध्यात्मिक पातळीवर त्यांच्या उत्सवाचे रूप कसे असते ते नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रसाद वाळिंबे यांनी सुंदर शब्दात मांडले आहे. 

कराया साजरा । होलिकेचा सण ।मनाचे स्थान । निवडीले ।।

ऐसे ते स्थान । साधने सरावले ।भक्तीने शिंपिले । केले सिद्ध ।।

त्या स्थानी खळगा। समर्पणाचा केला।त्यात उभा ठेला । अहंकार एरंड ।।

रचलीया तेथे। लाकडे वासनांची ।इंद्रीयगोवऱ्याची। रास भली ।।

गुरुकृपा तैल । रामनाम घृत ।अर्पिले तयात । ऐसे केले ।।

रेखिली भोवती । सत्त्कर्म रांगोळी ।भावरंगाचे मेळी । शोभिवंत ।।

वैराग्य अग्नीसी । तयाते स्थापिले । यज्ञरूप आले । झाली कृपा ।।

दिधली तयाते। विषय पक्वान्नाहुती ।आणिक पुर्णाहूती । षड्रिपु श्रीफळ।।

झाले सर्व हुत । वैराग्य अग्नीत ।जाणावया तेथ । नूरले काही ।।

वाळ्या म्हणे जनी । व्हावी ऐसी होळी ।।जेणे मुक्तीची दिवाळी।अखंडित ।।

मनोभूमीवर होळी रचण्याचे ठरवले आहे. भक्तीने ते अंगण सारवून घेतले. तिथे समर्पणाचा खळगा केला आणि त्यात अहंकाराचे एरंड टाकले. वासनेचे लाकूड सारण म्हणून घातले. इंद्रिय गोवऱ्यांची भर घातली. गुरु कृपेचे तेल, रामनामाचे तूप त्यात अर्पण केले. सत्कर्माच्या रांगोळीने ती होळी सुशोभित केली. वैराग्य अग्नीची ठिणगी पाडली त्यामुळे यज्ञरूप प्रगट झाले. विषय-इच्छांचा नैवेद्य दाखवला आणि षडरिपूची पूर्णाहुती दिली. भक्तीमार्गात अडसर आणणाऱ्या या सगळ्या गोष्टी होळीत भस्मसात होतील आणि त्यानंतर अध्यात्म रंगाची रंगपंचमी रंगेल आणि तो चिरंतन आनंद दिवाळीसारखा न संपणारा असेल!

टॅग्स :Holiहोळी 2025