Hartalika Vrat 2025 Rules In Marathi: अखंड सौभाग्य प्रदान करणारे आणि मोठ्या श्रद्धेने केले जाणारे व्रत म्हणजे हरितालिका व्रत. भाद्रपद शुद्ध तृतीया ही हरतालिका तृतीया म्हणून साजरी करण्यात येते. हरतालिका हे पार्वतीचे नाव. हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे. या व्रताचे महत्त्व आणि महात्म्य अनन्य साधारण आहे. हरितालिका व्रताचे काही नियम आणि हरितालिका आरती जाणून घेऊया...
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
हरितालिका व्रताच्या दिवशी उपास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींची पूजा केली जाते. यंदा भाद्रपद तृतीया तिथी सोमवार, २५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजून ३४ मिनिटांनी सुरू होणार असून, मंगळवार, २६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ०१ वाजून ५४ मिनिटांनी समाप्त होणार आहे. भारतीय पंचांगपद्धतीनुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा प्रचलित असल्यामुळे मंगळवार, २६ ऑगस्ट २०२५ रोजी हरितालिका तृतीया स्वर्ण गौरी व्रत करावे, असे सांगितले जात आहे.
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
हरितालिका व्रताचे नियम
- हरितालिका पूजेसाठी लागणारी सामग्री आधीच गोळा करावी.
- हरितालिका व्रताचा संकल्प अवश्य घ्यावा.
- भगवान शिव व पार्वतीची मूर्ती स्थापन करून त्यांना गंध, फुले, बेलपत्र, दुर्वा, नैवेद्य इत्यादी अर्पण करावे.
- पारंपरिक हरितालिका व्रतकथा ऐकणे आवश्यक मानले जाते. त्यामुळे हरितालिकेची कहाणी वाचावी किंवा श्रवण करावी.
- काही महिला निर्जळी उपवास करतात (पाणीही न घेता), तर काही फलाहार करतात. उपवासाची पद्धत आरोग्यानुसार ठरवावी.
- काही ठिकाणी स्त्रिया रात्रभर भजन-पूजन करून जागरण करतात.
- शास्त्रानुसार व्रताची सांगता करावी.
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
श्री हरितालिकेची आरती
जय देवी हरितालिके । सखी पार्वती अंबिके || आरती ओंवाळीते । ज्ञानदीपकळिके ॥ धृ० ॥
हर अर्धांगी वससी । जाशी यज्ञा माहेरासी ॥ तेथें अपमान पावसीं । यज्ञकुंडीं गुप्त होसी ॥ जय देवी० ॥ १ ॥
रिघसी हिमाद्रीच्या पोटीं । कन्यां होसी तू गोमटी ॥ उग्र तपश्चर्या मोठी । आचरसी उठाउठी ॥ जय देवी० ॥ २॥
तापपंचाग्निसाधनें । धूम्रपानें अधोवदनें ॥ केली बहु उपोषणें । शंभु भ्रताराकारणें ॥ जय देवी० ॥ ३ ॥
लीला दाखविसी दृष्टी । हें व्रत करिसी लोकांसाठी ॥ पुन्हां वरिसी धूर्जटी । मज रक्षावें संकटीं ॥ जय देवी० ॥ ४ ॥
काय वर्णूं तव गुण । अल्पमति नारायण ॥ माते दाखवीं चरण । चुकवावे जन्ममरण ॥ जय देवी० ॥ ५ ॥