तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की प्रयागराजमध्ये हनुमानाची भारतातील एकमेव अशी मूर्ती आहे जी निद्रिस्त (झोपलेल्या) मुद्रेत आहे. म्हणूनच त्यांना 'लेटे हनुमान(Sleeping Hanuman Temple at Prayagraj) या नावानेही ओळखले जाते. या मूर्तीला पाहण्यासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही भाविक येतात. असे मानले जाते की ही मूर्ती अनेक शतकांपासून येथे आहे. ही मूर्ती नेमकी कधी आणि कशी आली, हे निश्चितपणे सांगता येत नाही, पण तिच्याबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत.
या मंदिराशी संबंधित काही मनोरंजक गोष्टी:
असे मानले जाते की, रावणाशी झालेल्या युद्धानंतर हनुमान अत्यंत थकून गेले होते आणि त्यांची मूर्ती त्याच अवस्थेचे प्रतीक आहे. अन्यथा हनुमंत झोपलेल्या अवस्थेत असलेली मूर्ती सापडणे दुर्मिळच आहे.
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
गंगाही घेते दर्शन :
असे म्हटले जाते, की गंगा माता शिवशंकराला म्हणाली, मी सगळ्यांचे पाप धुते, मला पावन होण्यासाठी रुद्र अवतार असलेल्या हनुमंताच्या सेवेची संधी कधी देणार? त्यावेळी महादेवांनी गंगेला ती संधी दिली आणि हनुमंत जेव्हा प्रयागराजच्या काठावर येऊन पहुडले, तेव्हा दरवर्षी स्वतः गंगा माई पावसाळ्यात पूर आला असता हनुमंताच्या भेटीला थेट मंदिरापर्यंत पोहोचते.
ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व :
हे मंदिर प्रयागराज येथील किल्ला आणि संगमच्या जवळ आहे, त्यामुळे या स्थळाला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. असे म्हटले जाते की या मंदिरात येणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे येथे दर्शनासाठी नेहमीच मोठी गर्दी असते. हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर ते श्रद्धा आणि इतिहासाचे प्रतीक आहे. हनुमंताच्या या अनोख्या मूर्तीमुळे या मंदिराला एक वेगळी ओळख मिळाली आहे.