शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Hanuman Jayanti 2025: हनुमान जयंतीला 'या' चुका टाळा; पण कोणत्या गोष्टी करायच्या तेही जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 12:26 IST

Hanuman Jayanti 2025: शनिवारी १२ एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे, त्यादिवशी कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या टाळाव्या ते जाणून घ्या.

चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला हनुमंताचा जयंती(Hanuman Jayanti 2025) साजरा केला जातो. यंदा हा उत्सव शनिवारी, १२  एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे. हिंदू धर्मात हनुमान जन्मोत्सवाला खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान बजरंगबलीची उपासना केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि सुख-समृद्धी प्राप्त होते. या दिवशी अनेक भक्त उपवास करतात आणि उपासनाही करतात. हनुमंताच्या पूजेचे नियम थोडे कठीण आहेत. पण त्यांचे पालन केल्याने देवाला प्रसन्न करता येते. यासाठीच हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी कोणते काम निषिद्ध आहे हे जाणून घेऊ. 

Hanuman Jayanti 2025: हनुमान जयंती की जन्मोत्सव? दरवर्षीचा वाद; त्यावर दाते पंचांगाचा खुलासा!

हनुमान जयंतीच्या दिवशी पुढील गोष्टी अजिबात करू नका!

>> हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे. या दिवशी हनुमंताचे ध्यान करावे. वामकुक्षी घेणे टाळावे. 

>> या दिवशी शाकाहाराचा अवलंब करावा. व्यसने करू नये. तसे केल्यास हनुमंताची उपासना पूर्ण होत नाही. 

>> हनुमंताच्या भग्न मूर्तीची किंवा तसबिरीची पूजा करू नका. ती मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करून आजच्या दिवशी नवीन मूर्तीची स्थापना, पूजा करता येईल. 

>> हनुमानाची पूजा करताना पांढरे किंवा काळे कपडे घालून पूजा करू नका. त्याऐवजी  लाल, भगवे किंवा पिवळे कपडे घाला. 

>> जर तुमच्या कुटुंबातील कोणाचा मृत्यू झाला असेल आणि सुतक चालू असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी उपवास किंवा पूजा करू नका. त्याऐवजी घरी राहून तुम्ही मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसाचे मनोमन पठण करा. 

Hanuman Jayanti 2025: राहू-केतूची अशांती मागे लागू नये म्हणून हनुमान जयंतीला तुळशीचे रोप आणा व दान करा!

>> हनुमंताची पाद्यसेवा करू नका. कारण तो स्वतःला रामाचा सेवक मानतो. पाद्यपूजा करायचीच असेल तर श्रीरामांच्या पादुकांची करा आणि हनुमंताची पूजा करून त्याला हरभरा डाळ, गूळ याशिवाय बुंदीचे लाडू, इमरती वगैरे नैवेद्य दाखवू शकता. 

>> हनुमंत बालब्रह्मचारी असल्यामुळे शक्यतो महिलांनी हनुमंताला दुरूनच नमस्कार करावा, मूर्तिंस्पर्श टाळावा!

या काही छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून हनुमंत पूजा केल्यास ती त्याच्यापर्यंत नक्कीच पोहोचू शकेल.

Hanuman Jayanti 2025: शनिदेव आणि हनुमान यांची मंदिरं जोडून का असतात?जाणून घ्या कारण!

टॅग्स :Hanuman Jayantiहनुमान जयंतीPuja Vidhiपूजा विधी