शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Hanuman Jayanti 2022 : चिरंजीवी हनुमंताची जयंती साजरी करावी की जन्मोत्सव? दाते पंचांगाने केला खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 11:36 IST

Hanuman Jayanti 2022 : सदर माहिती वाचून मनातील संभ्रम दूर करूया आणि या वादाला पूर्णविराम देत उत्सवाचा मूळ उद्देश सफल करूया. 

आज हनुमान जयंती. काळानुकाळ आपण चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीच संबोधत आलो आहोत. मात्र अनेकदा शब्दच्छलामुळे उत्सवाचा आनंद बाजूला राहतो आणि विषयांतर घडते. हनुमान जन्मोत्सवाबद्दलदेखील जयंती की जन्मोत्सव हा नवीन वाद निर्माण झाल्यामुळे दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी जयंती व जन्मोत्सवाबद्दल मत मांडून या वादावर पडदा टाकला आहे. आपणही सदर माहिती वाचून मनातील संभ्रम दूर करूया आणि या वादाला पूर्णविराम देत उत्सवाचा मूळ उद्देश सफल करूया. 

दाते पंचांगकर्ते मोहन दाते सांगतात -

◆जो जन्माला येतो त्याची जयंती केली जाते आणि जो मुत्यु पावतो त्याची पुण्यतिथी केली जाते आणि जे समाधि घेतात त्यांचा समाधि उत्सव केला जातो, त्यामुळे जयंती आणि जन्मोत्सव हे समानार्थी शब्द असून विनाकारण शब्दच्छल करुन वेगळा अर्थ काढला जात आहे ! 

◆ जो मृत्यु पावतो त्याची जयंती साजरी करावी असे कुठेही सांगितलेले नाही . मात्र जो मृत्यु पावतो त्याची जयंती व पुण्यतिथी दोन्ही करता येते 

◆जयंती ही सुद्धा उत्सव म्हणूनच साजरी केली जाते तेंव्हा जन्मोत्सव व जयंती हे समानार्थी आहेत, (परशुराम व मार्कण्डेय सुद्धा चिरंजीव आहेत तिथे सुद्धा श्री परशुराम जयंती व मार्कण्डेय जयंतीअसेच म्हटले आहे.) 

◆ तसेच अनेक ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव आणि जयंती ऐवजी श्रीराम नवमी पण म्हंटले जाते आणि श्रीकृष्ण जयंती ऐवजी श्रीकृष्णाष्टमी असे सुद्धा शब्द प्रयोग केले जातात, तसेच गीता हा ग्रंथ असून मोक्षदा एकादशीला गीता जयंती पण साजरी होते,  तेव्हा विनाकारण शब्दच्छल करण्यात काहीच अर्थ नाही!

◆ देवता व अवतार यांच्याबाबत उत्सवापेक्षा जयंती  साजरी करणे हे अधिक योग्य असणार आहे.  कारण जयंतीचे पारणेसुद्धा महत्त्वाचे असते एखाद्या उत्सवाचे पारणे हा शब्दप्रयोग उचित वाटत नाही आता याविषयी विराम!

वरील माहिती वाचून आपल्याही मनातील संभ्रम दूर झाला असेल हे निश्चित! हनुमंताप्रमाणे शक्ती, युक्ती व भक्तीवर लक्ष केंद्रित करूया!

 

टॅग्स :Hanuman Jayantiहनुमान जयंती