शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 14:35 IST

Gurucharitra And Ganpati: गणपती ही ज्ञान आणि बुद्धीची देवता असून, अत्यंत पवित्र मानल्या गेलेल्या गुरुचरित्र ग्रंथात श्रीगणेशाचे वर्णन अद्भूत शब्दांत आल्याचे म्हटले जाते.

Gurucharitra And Ganpati: गणपती हा केवळ कुठल्याही विशिष्ट धर्माचा, जातीचा, पंथाचा देव नाही. तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा समाजाच्या सर्व थरांना, सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे, असे म्हटले जाते. श्रीगणेश हे हिंदूंचे आद्यदैवत असून सर्व कार्याच्या आरंभी त्याचे पूजन केले जाते. गणपती ही ज्ञान आणि बुद्धीची देवता आहेच, त्याचबरोबर ती शौर्याचीदेखील देवता आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इतर कुठल्याही देवतेची पूजा, आराधना गणपतीने केली, असे कुठल्याही पुराणात संदर्भ आढळत नाहीत. म्हणून गणपती ही देवता सार्वभौम म्हणून वर्णन केली जाते, असे सांगितले जाते. 

सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?

गणपतीला प्रथमेश म्हणून पुजले जाते. कोणत्याही पूजेची सुरुवात गणपती पूजनानेच केली जाते. कितीही मोठा यज्ञ, होम-हवन असो, गणपतीचे आवाहन, गणपती पूजन केल्याशिवाय कार्याची सुरुवात केली जात नाही. एवढेच नव्हे, तर बहुतांश धार्मिक ग्रंथांमध्येही पहिल्यांदा गणेश स्तवन केलेले आढळते. अत्यंत पवित्र आणि पाचवा वेद अशी मान्यता लाभलेल्या गुरुचरित्र या ग्रंथातही गणपतीची स्तुती आणि महात्म्य यांचे वर्णन आले आहे, असे सांगितले जाते. गणेशाचा संदर्भ गुरुचरित्रात तीन प्रकारे गुरुचरित्रात येतो, असे म्हटले जाते. 

कोणत्याही मंगल कार्याच्या आरंभी सर्वप्रथम तुलाच वंदन केले जाते

अध्यायाची सुरुवात गणेशाच्या नावे होते, याचा अर्थ आपण मनोभावे गणेशाचे नुसते स्मरण केल्यास विघ्न पळून जातात, असे ग्रंथकाराला सूचित करायचे आहे, असेही सांगितले जाते. तसेच दुसरे म्हणजे गणेशाचे सुंदर वर्णन गुरुचरित्रातील पहिला अध्यायात आहे. गुरुचरित्र लिखाणासाठी ज्ञान मिळावे, ह्यासाठी प्रार्थना केली आहे. हे ॐ कारस्वरूप गणेशा, विघ्नहर्ता, पार्वतीसुता, गजानना मी तुला माझा नमस्कार असो. तू लंबोदर, एकदंत, शूर्पकर्ण इत्यादी नावाने प्रसिद्ध आहेस. विघ्नांतक, विघ्नहर्ता अशीही गणपतीची स्तुती करण्यात आली आहे. तप्त सुवर्णाप्रमाणे असलेले तुझे मुख शोभून दिसते, उगवत्या सूर्याप्रमाणे असलेले त्याचे तेज सर्वत्र पसरते. संकटरुपी अरण्ये तोडून टाकण्यासाठी तू हातात परशू धारण केला आहेस. तू नागबंद म्हणजे सर्पाचा कमरपट्टा आणि सर्पाचे यज्ञोपवीत धारण केले आहेस. हे चतुर्भुज, विशाल नेत्र विनायका, तू या विश्वाची सर्व संकटे नाहीशी करून त्यांचा सांभाळ करतोस. जे लोक तुझे चिंतन नामस्मरण करतात त्यांना कोणत्याही संकटाची बाधा होत नाही त्यांचे सर्व मनोरथ तत्काळ सिद्धीला जातात. कोणत्याही मंगल कार्याच्या आरंभी सर्वप्रथम तुलाच वंदन केले जाते, असे काहीसे वर्णन गणरायाचे गुरुचरित्रात येत असल्याचे म्हटले जाते.

हे गणेशा, तू कृपासागर आहेस

हे लंबोदर गणेशा, तूच चौदा विद्यांचा, चार वेद, सहा वेदांगे, पुराणे, मीमांसा, न्यायशास्त्र व धर्मशास्त्र यांचा स्वामी आहेस. तूच वेद शास्त्रे पुराणे यांचे लेखन केले आहेस, म्हणून तर ब्रह्मदेवादी सर्व देव तुझे स्तवन करतात. हे गणेशा, अजिंक्य, अवध्य अशा त्रिपुरासुराचा वध करण्यापूर्वी भगवान शंकरांने तुझेच स्तवन केले होते. हरिब्रह्मादी देव कार्यारंभी तुलाच वंदन करतात. तुझ्या कृपेने त्यांना इच्छित गोष्टी प्राप्त होतात. हे कृपानिधी, गणनायका, हे मूषकवाहना, ॐकारस्वरूप, दु:खहर्ता, विनायका मला बुद्धी दे. जे लोक तुला वंदन करतात त्यांची कार्ये सिद्धीला जातात. हे गणेशा, तू कृपासागर आहेस. तू सर्वांचा आधार आहेस. हे गजानना माझे मनोरथ सिद्धीला जावे, म्हणून मी तुला साष्टांग नमस्कार घालतो. मला ज्ञान दे, बुद्धी दे, हे गणेशा, तू शरण आलेल्यांना वरदान देणारा आहेस. मी अज्ञानी आहे, म्हणून तुझ्याा शरणी आलो आहे. गुरुचरित्र लिहावे अशी इच्छा आहे. तुझी माझ्यावर पूर्ण कृपादुष्टी असावी व मी हाती घेतलेला ग्रंथ सिद्धीला जावा, अशी माझी तुला प्रार्थना आहे, असे गुरुचरित्रकार म्हणतात, असे म्हटले जाते.

'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!

गुरुचरित्रात अनेक ठिकाणचे स्थान महात्म्य वर्णन करण्यात आले आहे. यात गोकर्ण महाबळेश्वर या स्थानाचे महात्म्यही वर्णन करण्यात आले आहे. गोकर्ण महाबळेश्वर कथा विस्ताराने येते. या कथेत रावणाकडून शिवलिंग घेऊन कशी स्थापना केली, याचे वर्णन आले आहे. हा गुरुचरित्रातील ६ वा अध्याय त्यात गणेशाच सुंदर वर्णन आहे, असे म्हटले गेले आहे. 

 

टॅग्स :shree gurucharitraसंपूर्ण श्री गुरुचरित्र अध्यायshree datta guruदत्तगुरुSiddhivinayak Ganapati Templeसिद्धिविनायक गणपती मंदिरspiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक