शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Guru Pushyamrut 2025: गुरु पुष्यामृत योगावर आयुष्याचे सोने करणार्‍या 'या' मंत्राचा जप करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 17:21 IST

Guru Pushyamrut 2025 Puja Mantra : गुरु पुष्यामृत योगावर सोने खरेदी केली असता आर्थिक वृद्धी होते अशी श्रद्धा आहे, मात्र त्याबरोबरच दिलेला मंत्र जप केल्याने आयुष्याचे सोने होते.

>> सचिन मधुकर परांजपे, पालघर

अवघ्या काही दिवसांनी श्रावण महिन्याची सांगत होत आहे. श्रावण शुक्रवारी अर्थात २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांनी श्रावण अमावास्येचा प्रारंभ होत असून, शनिवारी सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांपर्यंत अमावास्या असणार आहे. त्यानंतर भाद्रपद महिना सुरू होईल. तत्पूर्वी, श्रावण गुरुवारी अनेक अद्भूत दुर्मिळ आणि शुभ पुण्य फलदायी योग जुळून आले आहेत. वारंवार न येणारा आणि अत्यंत शुभ मानला गेलेला गुरुपुष्यामृत योग(Guru Pushyamrut yoga 2025) श्रावण गुरुवारी दिवसभर असणार आहे. या मुहूर्तावर पुढे दिलेला मंत्र जप तुमचे आयुष्य सोन्यासारखे उजळून टाकेल. 

Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

“ॐ अनंताय नमः” हा इतकाच छोटासा षडाक्षरी मंत्र अत्यंत शुभ, अलौकिक आणि थेट वैश्विक शक्तीला जोडणारा दुवा आहे हे एक रहस्य आज खुले करतो आहे. अनंत हे श्रीविष्णुंच्या सहस्रनामांपैकी एक नाव आहे. विश्वात श्रीविष्णुंची किमान दशलक्ष नावे निरनिराळ्या विश्वात प्रचलित आहेत. त्यांचे शब्द, उच्चार आणि लिपी विभिन्न आहेत पण त्या प्रत्येक विश्वमितीत अनंत हे नाव सार्वत्रिक आहे हे आज सांगतो. आता याचं रहस्योद्घाटन. अनंत म्हणजे ज्याला अंत नाही असा जो....

तुम्हाला जेव्हा जेव्हा नैराश्य येईल, एकटेपणा वाटेल, समोर अंधःकार दाटून आलाय असं वाटेल, मन उदास होईल तेव्हा एक करत जा. हातातलं काम थोडावेळ बाजूला ठेवा. एकेजागी शांतपणे बसा. श्वास शांतपणे घेत रहा. डोळे मीट आणि दोन्ही हातांचे तळवे उघडून ते गुडघे किंवा मांडीवर ठेवा ( open to sky) आणि अजिबात न मोजता, मनात “ॐअनंतायनमः” या दिव्य मंत्राचा अविरत पण शांतपणे, कमी गतीत जप करा. अनंत या शब्दावर मन एकाग्र करा...ॐ अ नं ता य न मः.... अनंत या शब्दाला आत झिरपू दे... खोलवर.... शांतपणे... आसपास काय चाललंय... सगळं विसरण्याचा प्रयत्न करा...

किती वेळ करायचा? वगैरे सोडा... मासिक पाळी, सोयरसुतक सगळं विसरा....शब्द आणि त्या शब्दातील स्पंदनं आत घे, स्विकार करा... युनिवर्सचा व्हॅक्युम क्लिनर ताबडतोब सुरु होईल...मनातली सगळी घाण, जळमटं, कचरा, नैराश्य ताबडतोब साफ केलं जाईल.... जप करत रहा. तुम्हाला छान वाटेपर्यंत... मन मोकळे होईपर्यंत...

Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

जप संपला की तुम्हाला जाणवेल. परमेश्वराचं अस्तित्व आसपास.... विश्वशक्तीची ताकद... नैराश्य निघून जाईल. वैश्विक शक्तीशी तुम्ही कनेक्ट व्हाल... पण एक करायचं... काही मागायचे नाही...जे काही हवंय ते अनंत ठरवेल. तो श्रेयस्कर आहे तेच देईल....!

टॅग्स :Astrologyफलज्योतिषTraditional Ritualsपारंपारिक विधीShravan Specialश्रावण स्पेशल