शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

निस्वार्थ सेवा कशी करावी याचे मार्गदर्शन, स्वामी शांतिगिरीजी महाराजांकडून, लोकमत भक्ती युट्युब लाईव्हवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2021 18:06 IST

स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या निष्काम कर्मयोगातून आपल्यालाही निश्चितच बोध घेता येईल. आपल्यालाही त्यांच्याकडून प्रेरणा घेता यावी आणि 'मा फलेषु कदाचन' हा गीताउपदेश अंगी बाणता यावा, यासाठी ७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता स्वामी शांतिगिरीजी महाराजांचे विचार जरूर ऐका, लोकमत भक्ती या युट्यूब चॅनेलवर!

भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी कर्मयोग सांगितला. शिवाय कर्माचे महत्त्व अधोरेखित करताना, फळाची अपेक्षा ठेवू नकोस, असा उपदेशही दिला. मात्र, आताच्या या स्वार्थी जगात निष्काम सेवा करणे शक्य आहे का? ती कशी करता येईल? निस्वार्थी वृत्ती जन्मजात असावी लागते, की प्रयत्नाने अंगी बाणता येते? निस्वार्थी राहून जनसेवा करता येते का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी स्वामी शांतिगिरीजी महाराज, ७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता लोकमत भक्ती या युट्युब चॅनेलवर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. 

स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचा मोठा शिष्यपरिवार आहे. ते जगद्गुरू जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी असंख्य व्यसनी जीवांना व्यसनमुक्त केले. संसारात भरकटलेल्या लोकांना योग्य मार्गदर्शन केले. श्रमदानाच्या माध्यमातून लोकांना श्रमभक्ती शिकविली. सत्संगाच्या माध्यमातून अनेक पदभ्रष्ट झालेल्या लोकांना योग्य मार्गदर्शन केले. 

स्वामी शांतिगिरीजी महाराज कृषी आणि ऋषी संस्कृतीचे पुरस्कर्ते आहेत. शेतकरी संकटात सापडला तर त्याच्यासाठी पर्जन्ययाग यज्ञ करणे आणि त्याच्या मदतीला धावून जाणे हे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मदत करून त्यांनी दाखवून दिले आहे.आज कोरोना संकटातून देशाला नव्हे तर विश्वाला मुक्ती मिळावी म्हणून दैनंदिन होम हवन, महाराष्ट्रातून परराज्यात जाणाऱ्या मजुरांना भोजनाची व्यवस्था सुरू आहे. आज प्रत्येक आश्रमात दोन वेळचे मोफत भोजन अन्नदान सुरू आहे. आश्रमात येणाऱ्या प्रत्येक जीवाला शांती मिळावी म्हणून सतत प्रयत्नशील राहणे. असे अनेक समाजपयोगी कार्य स्वामी शांतिगिरीजी बाबा करत आहेत. त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या वेळेस हजारो साधू संतांना, संन्यासी महाराजांना भोजन देणे, वृक्षारोपण करणे, फळ फुलांच्या झाडांची देखभाल व संरक्षण करणे. असे अनेक उपक्रम स्वामी शांतिगिरीजी बाबा आश्रमाच्या वतीने करत असतात. 

या सर्व गोष्टी त्यांनी निस्वार्थी वृत्तीने केल्या. त्यांच्या निष्काम कर्मयोगातून आपल्यालाही निश्चितच बोध घेता येईल. आपल्यालाही त्यांच्याकडून प्रेरणा घेता यावी आणि 'मा फलेषु कदाचन' हा गीताउपदेश अंगी बाणता यावा, यासाठी ७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता स्वामी शांतिगिरीजी महाराजांचे विचार जरूर ऐका, लोकमत भक्ती या युट्यूब चॅनेलवर!

टॅग्स :Shantigiri Maharajशांतिगिरी महाराज