शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

Gudi Padwa 2023: इंग्रजी नववर्षाच्या सुरुवातीला वेटलॉस संकल्पाला हिंदू नववर्षात पुन्हा द्या 'अशी' चालना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 13:02 IST

Weight loss Tips: चैत्र मासात एक भुक्त व्रत अर्थात एकवेळ जेवणाचा संकल्प केला जातो. त्यामुळे डाएट आणि संकल्पपूर्ती दोन्ही कशी करता येईल, जाणून घ्या!

इंग्रजी वर्ष सुरु होताच संकल्पाची यादी तयार होते. त्यात वजन कमी करण्याचा संकल्प अग्रस्थानी असतो. त्या संकल्पाला स्थगिती मिळाली असेल तर हिंदू नवं वर्षाच्या निमित्ताने त्याला पुनश्च चालना देता येईल. कशी ते पहा!

२२ मार्च रोजी चैत्र मास सुरु होत आहे आणि तेच हिंदूंचे नवं वर्ष म्हणून ओळखले जाते. हे व्रत चैत्र शुक्ल प्रतिपदेला सुरू करून ते पूर्ण महिनाभर करावे. ह्या महिन्याभराच्या काळात व्रतकर्त्याने एकभुक्त राहावे. एकभुक्त म्हणजे केवळ दिवसा भोजन करावे आणि रात्री उपास करावा. या व्रतादरम्यान हिंसा भाव मनात नसावा. शक्य तेव्हा 'ओम नमो वासुदेवाय नमः' या मंत्राचा जप करावा. काही मंडळी महिनाभर ऐवजी वर्षभर हे व्रत करतात. मात्र एक महिनाभर व्रतस्थ राहून या व्रताचे पालन केल्यानेही तेवढाच लाभ होतो. 

हे व्रत का करावे? 

आरोग्याच्या दृष्टीने या व्रताचा विचार करायला हरकत नाही जेवणाचे प्रमाण ठरवून दिलेले असल्याने तसेच ते केवळ दिवसाच घ्यायचे असल्याने पचनसंस्थेवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होईल. तसेही उन्हाळ्यात भूक मंदावते आणि पचन संस्था ही थोडी कमकुवत होते. अशा वेळी आहार थोडा कमीच जातो. त्याला थोडी शिस्त लावून घेण्यासाठी या व्रताचा उपाय सुचवलेला आहे. हे व्रत आरोग्याशी निगडित असल्याने त्यातून पुण्यप्राप्ती होवो न होवो, सुदृढ आरोग्य नक्कीच प्राप्त होऊ शकेल. 

मनावर नियंत्रण : 

'कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है।' असे म्हणतात. अन्नावरील वासना कमी करून आपल्या दैनंदिन कार्यात, पूजे-अर्चेत मन रमवावे, यासाठी हे एकभुक्त व्रत केले जाते. त्यामुळे आपोआपच मनावर नियंत्रण येते आणि त्याग भावना बळावते. 

प्रतिकुल परिस्थितीत तग धरण्याची शिकवण:

सतत काही ना काही खाण्याच्या सवयीमुळे अकारण वजन वाढते. स्थूलत्त्व येते आणि शरीराला वरचेवर खाण्याची सवय लागते. घरात असताना ही सवय ठीक आहे, परंतु घराबाहेर असताना आपल्याला सतत अन्नपुरवठा कोण करणार आहे? आणि बाहेर जे अन्न उपलब्ध असते, ते शरीराला हितकारक असेलच असे नाही. अशा वेळी, भूकेवर नियंत्रण मिळवता आले पाहिजे. अन्यथा कोणत्याही कामात मन लागणार नाही आणि आपली चिडचिड होत राहील. अशा व्रतांमुळे संयम अंगी बाणला जातो. शिवाय, दुष्काळ, अन्नटंचाई, आर्थिक टंचाई अशा आस्मानी- सुलतानी संकटात तना-मनाने तग धरता येते आणि मीठ-भाकरीवरही तृृप्तता मानता येते. 

जाणिजे यज्ञकर्म : 

जेवायला बसताना आपण एक श्लोक म्हणतो. 'वदनी कवळ घेता.' त्या श्लोकाच्या शेवटी महत्त्वपूर्ण सूचना केली आहे, `उदर भरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म!' म्हणजेच अन्नग्रहण करताना भगवंताचा आठव करा आणि त्याच्या कृपेने आपल्याला सुग्रास भोजन मिळत आहे, याबद्दल त्याचे आभार माना. शिवाय, जे अन्न ग्रहण करत आहात, ते पोटाची किंवा मनाची तृप्ती व्हावी यासाठी नाही, तर हा एक यज्ञ आहे असे समजा आणि अन्न ही त्या यज्ञातील आहुती समजून, गरज आहे तेवढेच ग्रहण करा. तरच, त्या अन्नाचे ऊर्जेत रुपांतर होऊन, ती ऊर्जा दिवसभरात चांगल्या कामासाठी वापरली जाईल. 

पोषणकर्ता महाविष्णूंना एकवेळचे जेवण समर्पित :

सृष्टीचालक भगवान महाविष्णूंना मुंगीपासून हत्तीपर्यंत सर्व जीव-जीवांचे पोषण करायचे असते. त्यांच्या या महत्कार्यात आपला खारीचा वाटा, या भावनेने आपण एकभुक्त राहून आपल्या वाट्याचे एकवेळचे जेवण गरजू व्यक्तीला द्यावे. किंवा एकवेळच्या जेवणाचा शिधा (कोरडे धान्य, तांदूळ, पीठ, तेल, मीठ) द्यावे. एवढ्याशा सेवेने कोणा गरजूचे आशीर्वाद मिळाले, तर ती सेवा भगवान महाविष्णूंच्या चरणी रुजू झाली असे समजावे.

टॅग्स :gudhi padwaगुढीपाडवाHealth Tipsहेल्थ टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स