शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

Gudi Padwa 2022 : चैत्र मासात आरोग्यदायी आणि महापुण्यदायी ठरते एकभुक्त व्रत; सविस्तर वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 17:41 IST

Gudi Padwa 2022 : हे एकभुक्त व्रत भगवान विष्णूंना समर्पित केले जाते. वाचा या व्रताचे शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक फायदे!

हे व्रत चैत्र शुक्ल प्रतिपदेला सुरू करून ते पूर्ण महिनाभर करावे. ह्या महिन्याभराच्या काळात व्रतकर्त्याने एकभुक्त राहावे. एकभुक्त म्हणजे केवळ दिवसा भोजन करावे आणि रात्री उपास करावा. या व्रतादरम्यान हिंसा भाव मनात नसावा. शक्य तेव्हा 'ओम नमो वासुदेवाय नमः' या मंत्राचा जप करावा. काही मंडळी महिनाभर ऐवजी वर्षभर हे व्रत करतात. मात्र एक महिनाभर व्रतस्थ राहून या व्रताचे पालन केल्यानेही तेवढाच लाभ होतो. 

हे व्रत का करावे? 

आरोग्याच्या दृष्टीने या व्रताचा विचार करायला हरकत नाही जेवणाचे प्रमाण ठरवून दिलेले असल्याने तसेच ते केवळ दिवसाच घ्यायचे असल्याने पचनसंस्थेवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होईल. तसेही उन्हाळ्यात भूक मंदावते आणि पचन संस्था ही थोडी कमकुवत होते. अशा वेळी आहार थोडा कमीच जातो. त्याला थोडी शिस्त लावून घेण्यासाठी या व्रताचा उपाय सुचवलेला आहे. हे व्रत आरोग्याशी निगडित असल्याने त्यातून पुण्यप्राप्ती होवो न होवो, सुदृढ आरोग्य नक्कीच प्राप्त होऊ शकेल. 

मनावर नियंत्रण : 

'कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है।' असे म्हणतात. अन्नावरील वासना कमी करून आपल्या दैनंदिन कार्यात, पूजे-अर्चेत मन रमवावे, यासाठी हे एकभुक्त व्रत केले जाते. त्यामुळे आपोआपच मनावर नियंत्रण येते आणि त्याग भावना बळावते. 

प्रतिकुल परिस्थितीत तग धरण्याची शिकवण:

सतत काही ना काही खाण्याच्या सवयीमुळे अकारण वजन वाढते. स्थूलत्त्व येते आणि शरीराला वरचेवर खाण्याची सवय लागते. घरात असताना ही सवय ठीक आहे, परंतु घराबाहेर असताना आपल्याला सतत अन्नपुरवठा कोण करणार आहे? आणि बाहेर जे अन्न उपलब्ध असते, ते शरीराला हितकारक असेलच असे नाही. अशा वेळी, भूकेवर नियंत्रण मिळवता आले पाहिजे. अन्यथा कोणत्याही कामात मन लागणार नाही आणि आपली चिडचिड होत राहील. अशा व्रतांमुळे संयम अंगी बाणला जातो. शिवाय, दुष्काळ, अन्नटंचाई, आर्थिक टंचाई अशा आस्मानी- सुलतानी संकटात तना-मनाने तग धरता येते आणि मीठ-भाकरीवरही तृृप्तता मानता येते. 

जाणिजे यज्ञकर्म : 

जेवायला बसताना आपण एक श्लोक म्हणतो. 'वदनी कवळ घेता.' त्या श्लोकाच्या शेवटी महत्त्वपूर्ण सूचना केली आहे, `उदर भरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म!' म्हणजेच अन्नग्रहण करताना भगवंताचा आठव करा आणि त्याच्या कृपेने आपल्याला सुग्रास भोजन मिळत आहे, याबद्दल त्याचे आभार माना. शिवाय, जे अन्न ग्रहण करत आहात, ते पोटाची किंवा मनाची तृप्ती व्हावी यासाठी नाही, तर हा एक यज्ञ आहे असे समजा आणि अन्न ही त्या यज्ञातील आहुती समजून, गरज आहे तेवढेच ग्रहण करा. तरच, त्या अन्नाचे ऊर्जेत रुपांतर होऊन, ती ऊर्जा दिवसभरात चांगल्या कामासाठी वापरली जाईल. 

पोषणकर्ता महाविष्णूंना एकवेळचे जेवण समर्पित :

सृष्टीचालक भगवान महाविष्णूंना मुंगीपासून हत्तीपर्यंत सर्व जीव-जीवांचे पोषण करायचे असते. त्यांच्या या महत्कार्यात आपला खारीचा वाटा, या भावनेने आपण एकभुक्त राहून आपल्या वाट्याचे एकवेळचे जेवण गरजू व्यक्तीला द्यावे. किंवा एकवेळच्या जेवणाचा शिधा (कोरडे धान्य, तांदूळ, पीठ, तेल, मीठ) द्यावे. एवढ्याशा सेवेने कोणा गरजूचे आशीर्वाद मिळाले, तर ती सेवा भगवान महाविष्णूंच्या चरणी रुजू झाली असे समजावे.

टॅग्स :foodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स