शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

Gudhi padwa 2025: गुढीला बांधलेला कडूलिंबाचा पाला फेकू नका; त्याचा 'असा' करा वापर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 11:09 IST

Gudhi padwa 2025: आयुर्वेदानुसार कडूलिंब आणि गुळाचे चूर्ण वर्षभर घेतले तर सगळ्या व्याधी दूर होतात, ते शक्य नसेल तर दिलेले उपाय जरूर करा आणि निरोगी राहा.

यंदा ३० मार्च रोजी गुढी पाडवा(Gudi Padwa 2025) आहे. त्यानिमित्त घरोघरी गुढी उभारली जाईल, कडू लिंब, गूळ, धणे, जिरे, मीठ, हिंग यांचे चूर्ण प्रसाद म्हणून दिले जाईल, दुपारी श्रीखंड पुरीचा बेत केला जाईल आणि वामकुक्षी घेऊन सायंकाळी गुढी उतरवली जाईल. दरवर्षी दिसणारे हे चित्र, त्याबरोबरच आपण एकमेकांना निरोगी आरोग्याच्या शुभेच्छा देतो. त्या शुभेच्छा पूर्ण व्हाव्यात आणि निरोगी आयुष्य मिळावे म्हणून दिलेली माहिती जाणून घ्या आणि इतरांनाही सांगा. 

Gudi Padwa 2025: गुढी उभारताना आणि उतरवताना शास्त्रात दिलेले 'हे' नियम जरूर पाळा!

गुढीचा नैवेद्य आयुर्वेदाचार्य सुश्रुताने “चरक संहितेत” सांगितल्याप्रमाणे आयुर्वेदिक औषध म्हणून कडूलिंबाची कोवळी पाने, फुले, गूळ, साखर, मिरे, जिरे, हरभऱ्याची डाळ, ओवा, हिंग, धने, मीठ यांचे मिश्रण वाटून एकजीव करून प्रत्येकाला थोडा थोडा प्रसाद खायला देतात, यासाठी की जरी आयुष्याची किंवा दिवसाची, वर्षाची सुरुवात कडू झाली तरी शेवट गोड व्हावा" हा संदेश यातून मिळतो.

खरे तर हे चूर्ण रोज चमचाभर आयुष्यभर घ्यायचे असते. ज्यामुळे दुर्धर व्याधी दूर होतात. शरीर तेजस्वी व निरोगी बनते. तो तिक्त रस आहे जो शरीराला अत्यावश्यक आहे. तो शीत आहे, चन्दनाच्या खालोखाल त्याचे गंध उगाळून सर्वांगाला लावतात, म्हणजे शरीरातील उष्णता कमी होते. किवा आंघोळीच्या पाण्यात कडूलिंबाची पाने टाकूनही स्नानाला म्हणजे शरीर निरोगी वापरतात. म्हणून लिंबाच्या पेंडीचा निम साबण वापरतात. बाळंतिणीने ह्याचा रस प्यायल्यास बाळंतरोग होत नाहीत.

कडू घोट जीवनात अनेकदा येतात ते गिळून टाकण्याची सवय व्हावी.  म्हणून म्हणतात की व्यवहारात नेहेमी कटू असावे म्हणजे शेवट गोड होतोच. अन नेमके तेच आपल्याला नको असते किंवा आवडत नाही व आपण ते टाळतोच, जे नेहेमी अटळ असते. जे नको असते तेच आपल्या नशिबी येते. मग जे मिळाले तेच गोड का न मानून घ्यावे! औषध कडुच असते पण ते कसे शर्करावगुंठित असते पण ते आपले आरोग्य चांगले ठेवते ना! तसेच आपले आयुष्य असते.

कडुच का? जे वर्षभर सेवन केले जात नाही ते वर्षारंभीच का? हा एक पर्यावरणाचा संदेश आहे. झाडे लावा झाडे जगवा. लिंब हे ऑक्सीजन पुरवणारे झाड आहे. त्याची पाने हवा शुद्ध करतात. पूर्वी हायवेवर, किंवा गावांच्या दुतर्फा ही दोन दोन माणसांच्या हाताचा मोठ्ठा घेर असलेली लिंब, चिंच, आंबा, वड, पिंपळ, साग, पळस, औदुंबरही झाडे लावून त्याचे संवर्धन केले जाई. त्याचे कारण म्हणजे हे वृक्ष थंडगार सावली व लाकूडफाटा, सरण, बांधकामासाठी लाकूड, पाचोळ्याचे खत, फळे फुले, पाने सर्वच औषधी व पशुपक्षी, मानवास खाण्यास उपयोगी, जणू कल्पवृक्षच.

पण आता तुमच्या लक्षात आले आहे का, की इथेही पाश्चिमात्य विचारांनी घुसखोरी करून आपली नकळत सांस्कृतिक व पर्यावरणाची हानी सुप्तपणे चालवली आहे, हे वृक्ष लावणे बंदच झाले आहे काही काळापासून व सुभाबुळ, गुलमोहोर, विदेशी भरपूर कचरा करणारी, फळेफुले न देणारी अशी नाजुक झाडे लावण्याचा सपाटा चालू आहे(ज्याच्या लाकडाचा काहीही उपयोग होत नाही), दुर्दैवाने हे कोणाच्याच लक्षात येत नाही आहे. असो. आपण त्याचे महत्त्व लक्षात घेऊ आणि पर्यावरण पूरक झाडांची लागवड करून निसर्गाचे आणि संस्कृतीचे जतन करू. 

Gudi Padwa 2025: गुढीपाडव्यापासून चैत्रांगणाची रांगोळी काढा; धन-धान्य-संपत्तीत बरकत मिळवा!

टॅग्स :gudhi padwaगुढीपाडवाHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स