शाश्वत सुखप्राप्ती जीवनाचे ध्येय | Shri Pralhad Pai & Voice Guru Dipak Velankar यांचा संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 11:28 AM2021-07-01T11:28:31+5:302021-07-01T11:28:48+5:30

   माणसाची दिवस-रात्र धडपड चाललेली असते सुख मिळवण्यासाठी,  सुख म्हणजे नक्की काय असतं? हा प्रश्न विचारायला जेवढा सोपा वाटतो ...

The goal of eternal bliss is life Dialogue by Shri Pralhad Pai & Voice Guru Dipak Velankar | शाश्वत सुखप्राप्ती जीवनाचे ध्येय | Shri Pralhad Pai & Voice Guru Dipak Velankar यांचा संवाद

शाश्वत सुखप्राप्ती जीवनाचे ध्येय | Shri Pralhad Pai & Voice Guru Dipak Velankar यांचा संवाद

googlenewsNext

   माणसाची दिवस-रात्र धडपड चाललेली असते सुख मिळवण्यासाठी, 
सुख म्हणजे नक्की काय असतं? हा प्रश्न विचारायला जेवढा सोपा वाटतो तेवढेच त्याचे उत्तर मात्र अवघड आहे. 
 आज प्रत्येक जण सुख मिळविण्यासाठी  भरपूर पैसा कमवितो किंवा त्याच्या पाठी लागतो पण तो कमी का पडतो ? पैशाने सुख मिळते का?


आम्ही वेगवेगळे कपडे दागिने खरेदी करतो . इतकं असूनही मनाचा सतत नविन घेण्याकडे कल असतो पण मग हे विषय सुख जास्त काळ टिकत का नाही ? 
बऱ्याचदा तर असंही होतं सर्व सुख हात जोडून उभी असतात पण तरीही कसली तरी उणीव भासत राहते असे का होते? 
  मग असे
कोणते  सुख आहे जे पर्मनंट किंवा शाश्वत असेल. आणि ते
 मिळवायचे कसे?

याच विषयावर
अभिनेते दीपक वेलणकर  आज रात्री ८ वाजता श्री. प्रल्हाद वामनराव पै यांच्याशी लोकमत भक्ती या युट्युब चॅनेलवर संवाद साधणार आहेत. 

श्री. प्रल्हाद पै हे आपल्याला ज्येष्ठ निरुपणकार म्हणून परिचित आहेत. ते सद्गुरू श्री वामनराव पै यांचे चिरंजीव आहेत. जीवनविद्या तत्वज्ञानाचे ही सद्गुरू वामराव पै यांनी सुरु करून दिलेल्या संस्थेचे सर्वेसर्वा आहेत. वडिलांप्रमाणे प्रल्हाद पै यांनाही तत्वज्ञानाची आवड आहे. कारण तत्वज्ञान हे वैज्ञानिक, व्यावहारिक आणि प्रत्येक जीवनात प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त ठरते. जीवनविद्या तत्वज्ञान हे मानसशास्त्र, परजीवी विज्ञान आणि मेटाफिजिक्सचे उत्कृष्ट संयोजन आहे. त्यांनी अनेक वर्षांपासून समुपदेशन सत्रे घेतली आहेत आणि जीवनविद्या तत्वज्ञानाची तत्त्वे लागू करून सामान्य माणसाचे जीवन उन्नतीत आणण्यास मदत केली आहे.

शाश्वत सुखाचा मार्ग जाणून घेण्यासाठी आज रात्री 8  वाजता लोकमत भक्ती चैनल ला नक्की भेट द्या.

Web Title: The goal of eternal bliss is life Dialogue by Shri Pralhad Pai & Voice Guru Dipak Velankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.