शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

Gemology: भाग्यरत्न घातल्याने खरोखरंच भाग्य बदलते का? कोणत्या रत्नाचा काय प्रभाव पडतो जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 14:55 IST

Gemology : भाग्योदय असो नाहीतर एखादी पीडा, यावर उपाय म्हणून ज्योतिषी भाग्यरत्नाचा पर्याय सुचवतात. त्याचे फायदे-तोटे जाणून घ्या.

>> ज्योतिषी सोनाली लिखितकर 

संकटांमध्ये सापडल्यावर आणि दुसरे कोणते उपाय चालेनासे झाले की माणूस या रत्नांकडे वळतो . खरेतर पूर्वीच्या  काळी जशी आयुर्वेद चिकित्सा  होती त्याच प्रमाणे रत्न चिकित्सा पण केली जात असे . या मागचे कारण म्हणजे माणसाचे शरीर पंच महाभूतांचे बनले आहे. त्याच्या शरीरात जेव्हा एखाद्या गोष्टीची कमतरता होते ,म्हणजे ती कमतरता कधी शाररीक असते ,कधी पूर्व कर्मांमुळे असते .तर कधी पूर्व जन्मीच्या कर्मांमुळे असते. ही कमतरता काहीप्रमाणात भरून काढण्यासाठी आपण औषधे किंवा रत्ने यांचा आधार  घेतो .

या रत्नांमधून मिळणारे किरण हे शरीरावर फायदेशीर ठरतात . जसे आपला मोबाईल किंवा tv चालण्यासाठी satellite ची जरूर असते .अगदी तसेच आपल्या शरीरात ज्या ग्रहांची कमतरता असेल त्या ग्रहाची शक्ती ही ग्रह रत्ने satellite प्रमाणे काम करून शोषून घेतात आणि आपल्याला १ महिना ते ३ महिन्यात गुण दिसू लागतो .

ही रत्ने ९ ग्रहांची आहेत .त्यातील काही खनिज म्हणजे खाणीतून उत्पन्न होणारी तर काही जैविक म्हणजे प्राण्यांनी बनवलेली आहेत. पुष्कराज ,माणिक , नीलम ,हिरा , पाचू, लसण्या ,गोमेद ही रत्ने खाणीतून येतात तर पोवळे  आणि मोती हे समुद्रातले लहानसे जीव बनवतात .प्रत्येक ग्रहाचे एक मुख्य रत्न असते आणि काही उपरत्ने असतात. एकंदर ९ मुख्य रत्ने आणि ८४ उपरत्ने आहेत.पण आज आपण या ९ रत्नांचीच  माहिती प्रथम करून घेऊ या. एकंदर १२ राशी आहेत .

आपल्या राशीप्रमाणे माणूस रत्ने वापरू शकतो पण जेव्हा काही समस्यांकरिता  रत्ने घालायची असतील तेव्हा ती जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेवूनच धारण करावी. यातील प्रथम पाहू पुष्कराज -

१) पुष्कराज(yellow  sapphire ) - हे 'गुरु' ग्रहाचे रत्न आहे .धनु आणि मीन राशीचे रत्न.

हे पिवळ्या किंवा पांढऱ्या रंग छटा  मध्ये मिळते.यामुळे व्यापार धंदा ,आरोग्य आणि वैवाहिक  जीवनात  फायदा होतो.

२)माणिक (ruby )- हे सूर्याचे रत्न आहे. सिंह राशीचे रत्न. लाल ,गुलाबी डाळिंबी रंगांत  मिळते.संततीकरिता ,आयुष्यात  स्थिरता येण्यासाठी, तसेच अधिकार पद मिळण्यासाठी , तेज वाढण्यासाठी  उपयोगी आहे.

३)पाचू(emrald )- हे बुध ग्रहाचे रत्न आहे. हे हिरव्या रंगाचे असते. मिथुन आणि कन्या राशीचे रत्न.बुद्धीची कामे करणाऱ्या लोकांना उपयुक्त आहे .मानसिक शांती आणि श्वास विकारांवर उपयोगी आहे.ज्यांना आपली संभाषण कला वाढवायची आहे त्यांनी अवश्य घालावा.

४)हिरा (diamond )अतिशय तेजस्वी आणि महाग मिळणारे हे रत्न आहे. शुक्र ग्रहाचे रत्न आहे. तुला आणि वृषभ राशीकरिता  उपयोगी आहे. सौंदर्य आणि कलेच्या उपासकांना उपयुक्त असते.

५)नीलम (blue sapphire ) शनी ग्रहाचे रत्न आहे .नावाप्रमाणेच निळ्या रंगांत, कधी काळ्या किंवा आकाशी रंगातही असते .मकर आणि कुंभ राशीच्या लोकांना चालते. हे रत्न लवकर प्रभाव दाखवते. म्हणूनच ते घालण्या आधी जाणकार ज्योतिषास विचारूनच घालावे.शानिसम्बंधित दोषांकरिता उपयोगी आहे.

६)मोती (pearl ) हे चंद्राचे रत्न आहे. कर्क राशीच्या लोकांना चालते.मानसिक विकारांवर किंवा मनोबलवाढवण्यासाठी पण त्याच बरोबर संवेदनशील बनवते.

७)पोवळे (coral ) -हे मंगळ  ग्रहाचे रत्न आहे. केशरी किंवा लाल रंगांत ,कधी कधी पांढऱ्या रंगातही मिळते.मन खंबीर करण्याकरिता , डॉक्टर ,पोलीस इ. लोकांना उपयुक्त .तसेच लहान मुलांना दृष्ट लागू नये म्हणून घालतात.

८) गोमेद (heassonite )राहू ग्रहाचे रत्न विटकरी ,लालसर रंगांत येते.हे कोणत्याही एका विशिष्ट राशीकरिता वापरत नाहीत तर काही ग्रहांचा एकत्रित परिणाम साधणे, किंवा जादू टोणा, वशीकरण या सारख्या समस्यांवर उपाय म्हणून वापरले जाते.

९)लसण्या(cat 's eye )- हे केतू ग्रहाचे रत्न आहे .हे मांजराच्या डोळ्याप्रमाणे दिसते .राखाडी ,किंवा काळसर ,पांढऱ्या रंगांत येते .याला सुद्धा स्वतःची रास नाही .पण नजर लागणे ,गुप्त शत्रूपासून रक्षण ,वाईट स्वप्नांपासून रक्षण याकरिता उपयोगी आहे.

तर अशी ही भाग्यरत्ने..

संपर्क -9890447025

टॅग्स :Astrologyफलज्योतिष