२० जून रोजी गायत्री प्रगटोत्सव आहे, त्यानिमित्ताने जाणून घ्या गायत्री मंत्राचे फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 02:27 PM2021-06-16T14:27:33+5:302021-06-16T14:28:35+5:30

स्वामी विवेकानंद म्हणाले होते, की गायत्री हा बुद्धीचा मंत्र आहे, म्हणूनच त्याला मंत्रांचा मुकुट रत्न म्हटले गेले.

Gayatri Pragatotsav is on 20th June, so learn these things regarding Gayatri Mantra. | २० जून रोजी गायत्री प्रगटोत्सव आहे, त्यानिमित्ताने जाणून घ्या गायत्री मंत्राचे फायदे!

२० जून रोजी गायत्री प्रगटोत्सव आहे, त्यानिमित्ताने जाणून घ्या गायत्री मंत्राचे फायदे!

googlenewsNext

गायत्री मातेच्या वैभवाचे पवित्र वर्णन शास्त्रात आढळते. तिचा गौरव गायत्री मंत्रात आहे. गायत्री मंत्र म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचे सार आहे. सर्व ऋषी-मुनि मुक्त कंठाने गायत्री मातेचे गुणगान गात असत. सर्व धार्मिक ग्रंथांमध्ये, गायत्रीचा गौरव केला जातो. गायत्री मंत्र हा हिंदू धर्मातील सर्वोत्तम आणि उत्कृष्ट मंत्र मानला जातो. या मंत्राचे महत्त्व माहीत असल्यामुळे प्रत्येक हिंदू धर्मीयाला तो मुखोद्गत असतो. अनेक संशोधनाचेसार सांगितले जाते की गायत्री मंत्राचा जप केल्यास बरेच फायदे होतात.

ॐ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं 
भर्गो देवस्य धीमहि। 
धियो यो न: प्रचोदयात्।।

गायत्री मंत्रांच्या जपासंदर्भात काही खास गोष्टी जाणून घेऊया-

1. एकूण वेदांची संख्या चार आहे आणि चारही वेदांमध्ये गायत्री मंत्रांचा उल्लेख आहे. या मंत्राचे ऋषी विश्वामित्र आणि देवता सावित्री आहे.

२. या मंत्रात इतकी शक्ती आहे की जो नियमितपणे तीन वेळा नामस्मरण करतो त्याच्याभोवती सकारात्मक शक्तीचे वलय तयार होते. 

३. गायत्री मंत्राचा नित्य जप केल्यास सदैव सन्मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळत राहते. 

४. या मंत्राचा जप केल्याने बौद्धिक क्षमतेत वाढ होते. अडचणीतून मार्ग काढण्यास मदत होते. 

५. सूर्यास्ताच्या सुमारास गायत्री मंत्राचा जप केल्यास त्या मंत्राचा प्रभाव अधिक पडतो. 

६. सूर्यास्ताच्या वेळेस शक्य नसल्यास दिवसभरात जेव्हा शांत वेळ मिळेल तेव्हा हा जप करावा, परंतु रात्री हा जप करू नये. 

७. गायत्री मंत्रात चोवीस अक्षरे असतात. ही चोवीस अक्षरे चोवीस शक्ती आणि कर्तृत्त्वाचे प्रतीक आहेत. यामुळेच ऋषीमुनींनी भौतिक जगातील सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करण्याचा मंत्र म्हणून गायत्री मंत्राचे वर्णन केले आहे.

८. आर्थिक बाबतीत अडचण असल्यास गायत्री मंत्राचा जप करा असे ज्योतिष शास्त्रात सुचवले जाते. 

९. हा मंत्र विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. स्वामी विवेकानंद म्हणाले होते, की गायत्री हा बुद्धीचा मंत्र आहे, म्हणूनच त्याला मंत्रांचा मुकुट रत्न म्हटले गेले.

१०. नियमितपणे १० वेळा गायत्री मंत्राचा जप केल्याने बुद्धी तीव्र होते आणि दीर्घकाळ कोणत्याही विषयाची आठवण ठेवण्याची क्षमता वाढते. हा मंत्र व्यक्तीची बुद्धी आणि विवेक सुधारण्यासाठी देखील कार्य करतो.
 

Web Title: Gayatri Pragatotsav is on 20th June, so learn these things regarding Gayatri Mantra.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.