शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
2
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
3
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
4
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
5
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
6
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
7
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
8
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
9
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
10
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
11
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
12
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
13
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
14
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
15
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
16
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
17
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगेंसोबत उद्धव ठाकरेंनी फोनवरून साधला संवाद
18
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले
19
'ट्रम्प यांच्या टॅरिफ'ला धक्का बसणार ! जपानमधील मेगा डीलनंतर पंतप्रधान मोदी चीनला पोहोचले
20
रात्री गाढ झोपले, सकाळी मृतदेह बाहेर काढले; भूस्खलनात आई-वडिलांसह ५ मुलांचा मृत्यू

Gauri Pujan 2025: गौरीचा धागा व्यक्तिला आणि वास्तुला बांधण्याने होणारे लाभ माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 15:33 IST

Gauri Pujan 2025: ३१ ऑगस्ट रोजी गौरीचे आगमन आणि १ सप्टेंबर रोजी पूजन, जेवण असेल, त्या दिवशी गौरीला अर्पण केलेल्या धाग्याचे एवढे महत्त्व का आहे ते जाणून घ्या.

>> योगेश काटे, नांदेड

गणेश उत्सवात(Ganesh Festival 2025) भाद्रपद शुद्ध अष्टमीपासून तीन दिवस प्रत्येकाच्या घरी  महालक्ष्मींचे आगमन(Gauri avahan 2025) जेवण व गाठी पडणे हा तीन उत्साह असतो. मराठवाडा व विदर्भ, खानदेश , नाशिक परीसरात महालक्ष्म्या म्हणतात तर प.महाराष्ट्रात  गौरी म्हणतात.  प्रत्येक भागातील  पद्धती वेगळ्या स्वयंपाकाची कुलाचाराची पद्धत ही वेगळी. महालक्ष्म्या म्हणत असलो तरी मराठवाड्यातील  विदर्भातील पद्धती वेगळ्या आहेत.  प्रस्तुत लेखात  खास करुन मराठवाड्यातील तेही नांदेड च्या आसपाच्या  कुळाचाराची पद्वत  सांगणार आहोत.

माझ्या निरीक्षणातूंन माझं वैयक्तिक मत सांगतो, मला असे वाटते, सर्वात मोठा सण म्हणजे महालक्ष्म्या तद्नंतर नवरात्र. तर महालक्ष्म्या म्हणलं मला आठवते मखर बसवणे पण त्याआधी ही  मखर नसताना आम्ही पडते टाकून महालक्ष्म्या बसवत होतो. काही जणांकडे बसलेल्या, तर काहींकडे उभ्या लक्ष्म्या असतात. तर  काहींकडे फक्त राशींचे पुजन रास म्हणजे गहु व तांदुळाची.  

Gauri Avahan 2025: गौरी आवाहनापासून विसर्जनापर्यंत सविस्तर माहिती; पूजा साहित्य आणि मुहूर्तही!

ज्यांच्याकडे बसलेल्या  असतात  त्यांच्या घरी मुलाचे लग्न झाल्यावर लक्ष्म्या उभ्या मांडतात. मुखवटे  घेण्याची काही पद्धत आमाच्या मराठवाड्यात वेगळी  असते. काही जणांकडे मुलीचे आई वडील मुखवटे घेऊन देतात तर काहींकडे तसे चालत नाही.  चांगल्या संबंधितांकडून  मुखवटे खरेदी  करण्याचा प्रघात असतो. जो खर्च लागले तो  संबंधितानी हळूहळू द्यायचा जमा  झालेल्या लक्ष्मीच्या डब्यातून द्यावा लागतो.  कोणाकडे पितळी तर कोणाकडे सुगड्याचे तर कोणाकडे  प्लास्टर ऑफ पॉरीसचे मुखवटे असतात.

लक्ष्म्यांच पुजन मराठवाड्यात सहसा संध्याकाळीच  होते आपवाद सोडला तर. महालक्ष्म्यांचा नैवद्य व फराळाची तयारी हा सर्वात मोठा भाग असतो. एक-दोन  दिवसात सगळी तयारी करायाची असते. अनारसे साटोर्या पेटार्या, करंज्या  रवा बेसनाचे लाडु, वेण्या, उंबर शेवलाडू  मोदक, गुळपापडी चे लाडू (तांदुळाच्या पीठाची गुगळपाडी ) इ. पदार्थ . तर जेवणासाठी  वा नैवेद्यावर  पुरणपोळी सांज्याची पोळी,  साखर भात, बासुंदी, श्रीखंड,  खिचडी, बुंदीचा लाडू, मेतकूट, दही टाकून पंचामृत, कोशिंबीर, आमटी कटाची,  कढी, चटणी,  पातळ भाजी,  फोडी भाजी,  सोळ्या भाज्या , कढी  पडवळ टाकून करतात.

पण  वडे भज्जाशिवाय हे पूर्ण होत नाही. हा स्वयंपाक आरतीची तयारी  म्हणजे  तो धुपाचा सुवास भिमसेन कापूराने  मन प्रसन्न करणारा वास.  काडवातीने   देवीला ओवाळने त्या  आरतीच्या वातीपासून काजळ तयार करुन  डोळ्यात भरणे, तसेच  हळदी कुंकवाचे हुंडे  त्याचाच  सडा  तसचे हतवे  हे करताना कोण येतय? अस म्हणत  सोन्या रुपाच्या पावलाने लक्ष्मी येते. सवाष्ण ब्राह्मण तसेच काही जणांकडे.  सवाष्ण व ब्राह्मण काहीजणांकडे  मुक्कामाला थांबण्याची पद्धत आहे.

Gauri Pujan 2025: मुखवट्याच्या गौरी सोडून खड्यांच्या गौरी पूजण्याचे काय आहे कारण? वाचा

दुसऱ्या दिवशी गाठी पाडणे  हा  मराठवाड्यातील खास प्रकार!  काहीजणांकडे या दिवशी ही पुरण पोळी  व सवाष्ण ब्राह्मण असते  गाठी  पाडणे हा महत्त्वाचा विधि. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या  कथेत  या पौत्याचे वा तातुचे  फार महत्त्व सांगितले. स्त्री  व पुरुष  लाहान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत  घरातील प्रत्येक महत्त्वाच्या  वस्तुस बांधणे कारण  बरकत येण्यासाठी. उदा जातं, उखळ,  पाटवरवंटा, खलबत्ता  कपाट  छोटी गिरणी. पौत हे  आठ व सोळा पदरी व गाठीचे असते सोळाचे  मोठ्यांना व आठचे लहानग्यांना  व पुरुष मनगटावर बांधतात तर स्त्रिया गळ्यात परीधान करतात. तसेच  या दिवशी हळदी कुंकवाचीही कार्यक्रम असतो. राशिसाठी वापरले धान्य  हे नवरात्रात  नऊ दिवस वापरतात  तसेच  पौतेही  नवरात्रापर्यंत  वापरतात, नंतर लक्ष्मीच्या निर्माल्यात  विसर्जित करतात. पौत वर्षभर  ठेवायचे व्रत  कोणी आचरते.

सोळा भाज्यात  कदुक,  बीट, शेपु,  गाजर  या  भाज्या निषिद्ध आहेत.तर कर्टुलं, तोंडल ,चमकोरा , आंबाडी  या भाज्या महत्त्वाच्या  आहेत आणि अंबिलही! या सगळ्यात पुरुषवर्गाचीही मदत असते, मात्र मुख्य कामाचा ताण महिला वर्गावर असतो. तरीसुद्धा ना कुठे थकवा, ना चिडचिड, सगळं  प्रसन्न  व हसत मुखाने करणारी गृहगौरी सुद्धा उत्साहात असते त्यामुळे मखरातली गौरीदेखील तृप्त होऊन जाते!

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2025Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीGanpati Festivalगणपती उत्सव २०२५Puja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सण