शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

Gauri Puja 2023: गौराईला बांधलेला धागा वास्तूला आणि व्यक्तीला बांधण्यामागे काय आहे मराठवाड्याची प्रथा? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 07:00 IST

Gauri Puja 2023: मराठवाड्यात गौराईचा पाहुणचार झाल्यावर गाठी पाडणे ही एक प्रथा पाळली जाते, ज्यामुळे व्यक्ती आणि वास्तूची बरकत होते अशी श्रद्धा आहे.

>> योगेश काटे, नांदेड

आजपासून तीन दिवस प्रत्येकाच्या घरी  महालक्ष्मींचे आगमन जेवण व गाठी पडणे हा तीन उत्साह असतो. मराठवाडा व विदर्भ, खानदेश , नाशिक परीसरात महालक्ष्म्या म्हणतात तर प.महाराष्ट्रात  गौरी म्हणतात.  प्रत्येक भागातील  पद्धती वेगळ्या स्वयंपाकाची कुलाचाराची पद्धत ही वेगळी. महालक्ष्म्या म्हणत असलो तरी मराठवाड्यातील  विदर्भातील पद्धती वेगळ्या आहेत.  प्रस्तुत लेखात  खास करुन मराठवाड्यातील तेही नांदेड च्या आसपाच्या  कुळाचाराची पद्वत  सांगणार आहोत.

माझ्या निरीक्षणातूंन माझं वैयक्तिक मत सांगतो, मला असे वाटते, सर्वात मोठा सण म्हणजे महालक्ष्म्या तद्नंतर नवरात्र. तर महालक्ष्म्या म्हणलं मला आठवते मखर बसवणे पण त्याआधी ही  मखर नसताना आम्ही पडते टाकून महालक्ष्म्या बसवत होतो. काही जणांकडे बसलेल्या, तर काहींकडे उभ्या लक्ष्म्या असतात. तर  काहींकडे फक्त राशींचे पुजन रास म्हणजे गहु व तांदुळाची.  

ज्यांच्याकडे बसलेल्या  असतात  त्यांच्या घरी मुलाचे लग्न झाल्यावर लक्ष्म्या उभ्या मांडतात. मुखवटे  घेण्याची काही पद्धत आमाच्या मराठवाड्यात वेगळी  असते. काही जणांकडे मुलीचे आई वडील मुखवटे घेऊन देतात तर काहींकडे तसे चालत नाही.  चांगल्या संबंधितांकडून  मुखवटे खरेदी  करण्याचा प्रघात असतो. जो खर्च लागले तो  संबंधितानी हळूहळू द्यायचा जमा  झालेल्या लक्ष्मीच्या डब्यातून द्यावा लागतो.  कोणाकडे पितळी तर कोणाकडे सुगड्याचे तर कोणाकडे  प्लास्टर ऑफ पॉरीसचे मुखवटे असतात.

लक्ष्म्यांच पुजन मराठवाड्यात सहसा संध्याकाळीच  होते आपवाद सोडला तर. महालक्ष्म्यांचा नैवद्य व फराळाची तयारी हा सर्वात मोठा भाग असतो. एक-दोन  दिवसात सगळी तयारी करायाची असते. अनारसे साटोर्या पेटार्या, करंज्या  रवा बेसनाचे लाडु, वेण्या, उंबर शेवलाडू  मोदक, गुळपापडी चे लाडू (तांदुळाच्या पीठाची गुगळपाडी ) इ. पदार्थ . तर जेवणासाठी  वा नैवेद्यावर  पुरणपोळी सांज्याची पोळी,  साखर भात, बासुंदी, श्रीखंड,  खिचडी, बुंदीचा लाडू, मेतकूट, दही टाकून पंचामृत, कोशिंबीर, आमटी कटाची,  कढी, चटणी,  पातळ भाजी,  फोडी भाजी,  सोळ्या भाज्या , कढी  पडवळ टाकून करतात.

पण  वडे भज्जाशिवाय हे पूर्ण होत नाही. हा स्वयंपाक आरतीची तयारी  म्हणजे  तो धुपाचा सुवास भिमसेन कापूराने  मन प्रसन्न करणारा वास.  काडवातीने   देवीला ओवाळने त्या  आरतीच्या वातीपासून काजळ तयार करुन  डोळ्यात भरणे, तसेच  हळदी कुंकवाचे हुंडे  त्याचाच  सडा  तसचे हतवे  हे करताना कोण येतय? अस म्हणत  सोन्या रुपाच्या पावलाने लक्ष्मी येते. सवाष्ण ब्राह्मण तसेच काही जणांकडे.  सवाष्ण व ब्राह्मण काहीजणांकडे  मुक्कामाला थांबण्याची पद्धत आहे.

दुसऱ्या दिवशी गाठी पाडणे  हा  मराठवाड्यातील खास प्रकार!  काहीजणांकडे या दिवशी ही पुरण पोळी  व सवाष्ण ब्राह्मण असते  गाठी  पाडणे हा महत्त्वाचा विधि. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या  कथेत  या पौत्याचे वा तातुचे  फार महत्त्व सांगितले. स्त्री  व पुरुष  लाहान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत  घरातील प्रत्येक महत्त्वाच्या  वस्तुस बांधणे कारण  बरकत येण्यासाठी. उदा जातं, उखळ,  पाटवरवंटा, खलबत्ता  कपाट  छोटी गिरणी. पौत हे  आठ व सोळा पदरी व गाठीचे असते सोळाचे  मोठ्यांना व आठचे लहानग्यांना  व पुरुष मनगटावर बांधतात तर स्त्रिया गळ्यात परीधान करतात. तसेच  या दिवशी हळदी कुंकवाचीही कार्यक्रम असतो. राशिसाठी वापरले धान्य  हे नवरात्रात  नऊ दिवस वापरतात  तसेच  पौतेही  नवरात्रापर्यंत  वापरतात, नंतर लक्ष्मीच्या निर्माल्यात  विसर्जित करतात. पौत वर्षभर  ठेवायचे व्रत  कोणी आचरते.

सोळा भाज्यात  कदुक,  बीट, शेपु,  गाजर  या  भाज्या निषिद्ध आहेत.तर कर्टुलं, तोंडल ,चमकोरा , आंबाडी  या भाज्या महत्त्वाच्या  आहेत आणि अंबिलही! या सगळ्यात पुरुषवर्गाचीही मदत असते, मात्र मुख्य कामाचा ताण महिला वर्गावर असतो. तरीसुद्धा ना कुठे थकवा, ना चिडचिड, सगळं  प्रसन्न  व हसत मुखाने करणारी गृहगौरी सुद्धा उत्साहात असते त्यामुळे मखरातली गौरीदेखील तृप्त होऊन जाते!

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी