शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सव : आधी मन घेई हाती, तोची गणराजा गणपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 06:12 IST

सद्गुरु वामनराव पै यांनी एका भाषणामध्ये गणपतीची महती स्पष्ट केली होती. सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवानिमित्त त्यांच्या भाषणाचा हा सारांश.

- सद्गुरुवामनराव पै(जीवनविद्या मिशनचे संस्थापक)आपल्या देशात गणेशोत्सव आपण सर्व आनंदाने साजरा करत असतो. यावेळी लोक आपापली दु:खे विसरून जातात, या दृष्टीने या उत्सवाचे महत्त्व आहेच. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला त्यामागे समाजप्रबोधन हा खरा आणि एकमेव हेतू आहे. हा हेतू लक्षात घेऊन गणेशोत्सव साजरा केला गेला तर त्याचे मांगल्य टिकून राहील. गणेशोत्सवातील कार्यक्रमांना समाजप्रबोधन ही एकच दिशा असली पाहिजे. गणपती हे विद्येचे, ज्ञानाचे, शौर्याचे, चातुर्याचे, बुद्धीचे, सामर्थ्याचे दैवत असल्यामुळे लोकमान्य टिळकांनी समाजप्रबोधनासाठी हे दैवत निवडले. पारतंत्र्य काळात धार्मिक उत्सवांच्या निमित्ताने लोक एकत्रित येतील, राष्ट्रकार्यासाठी त्यांना संघटित करता येईल यासाठी लोकमान्य टिळकांनी या उत्सवाचा चंग बांधला. लोकांना आज समाजप्रबोधनाचे महत्त्व वाटत नसल्यामुळे हा हेतू बाजूला होत असलेला दिसत आहे.आपल्या साधुसंतांनी, ऋषिमुनींनी खरा गणपती कोण ते आधीच सांगून ठेवलेले आहे. खऱ्या गणपतीची उपासना करता यावी यासाठी या गणेशाची आपण उपासना करायची असते. ‘आधी मन घेई हाती, तोची गणराजा गणपती’ असे म्हटलेले आहे. तुमचे मन हेच खरा गणपती आहे.या मनरूपी गणपतीला प्रसन्न करून घ्यायचे आहे. यासाठी तुकाराम महाराज असेही सांगतात की ‘मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण’. या मनाला प्रसन्न करून घेतले तरच तुमच्या जीवनातील सर्व प्रश्न सुटतील आणि जीवनात सुखच सुख असेल. भगवतगीतेत, उपनिषदांत या मनरूपी गणपतीचे महत्त्व सांगितलेले आहे. गणपती म्हणजे गणांचा पती, गुणांचा पती. आपल्या ठिकाणी असणारी कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये या सर्वांचा स्वामी गणपती आहे.आपले जे स्वरूप आहे ते प्राप्त करून घेण्यासाठी मनरूपी गणपतीला प्रसन्न करून घेतले पाहिजे. आपल्या गणपतीच्या हातात शस्रे आहेत. त्यातून तुम्ही शूरवीर व्हा, असा संदेश तो देतो आहे. ज्याची तुम्ही भक्ती करता ते तुम्ही झाले पाहिजे याला सायुज्यता मुक्ती असे म्हणतात. गणपती बुद्धीची देवता आहे याचा अर्थ तुम्ही बुद्धिमान व्हा, ज्ञानी व्हा. गणपतीच्या चातुर्याची कथा तुम्हाला ठाऊकच आहे, त्यातून तो आपल्याला चतुर व्हा असे सांगत आहे. गणपती हे मातृभक्त होते, त्याप्रमाणे आपणही मातृभक्त असले पाहिजे.मनरूपी गणपतीला प्रसन्न करून घेण्यासाठी स्थैर्य, शांतीचे मोदक दिले तरच हा गणपती प्रसन्न होतो. ‘शांतीपरते नाही सुख.’ शांतीरूपी मोदक मनाला मिळाला की हे प्रसन्न झालेले मन तुम्हाला तुम्ही मागाल ते देते. आज आपण मनाला काळजी, चिंता, द्वेष यांचा मोदक देत असतो. मनरूपी गणपतीचा अभ्यास केला पाहिजे.मनरूपी गणपतीला अनिष्ट गोष्टी दिल्या की त्याचा तुमच्यावर कोप होतो. पवित्र, मंगल विचारांचा मोदक तुम्ही त्याला दिलात तर तुमच्यावर त्याच्या कृपेचा वर्षाव होतो. हे सर्व मंगल विचार आमच्या विश्वप्रार्थनेत आहे. मनरूपी गणपतीला विश्वप्रार्थनेचा मोदक द्या.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव