शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 12:36 IST

Ganesh Chaturthi 2025: सध्या खवा, चॉकलेट, पनीर, सुका मेवा अशी मोदक बनवण्याची चढाओढ लागली आहे, तरी मूळ वाद दोघांमध्येच; उकडीचा की तळणीचा? पुराणात सापडते उत्तर!

मोदक आवडत नाही, अशी व्यक्ती सापडणे दुर्मिळ. जर आपल्याला मोदक एवढे प्रिय आहेत, तर आपल्या लाडक्या बाप्पाला ते का बरे प्रिय असू नयेत? परंतु, बाप्पाला मोदकच कसे आवडतात, नैवेद्यासाठी २१ च मोदक का? ही संख्या कोणी निश्चित केली? शास्त्रात त्याला काही पुरावे आहेत का? हो आहेत!  याबद्दल पद्म पुराणात दोन कथा सांगितल्या आहेत. येत्या गणेश चतुर्थीनिमित्त(Ganesh Chaturthi 2025) हे मोदक पुराण जाणून घेऊ. 

Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?

पद्म पुराणात सापडते मोदक पुराण : 

एक दिवस अत्री ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसूया माता यांनी भगवान शंकराला आणि पार्वती मातेला मेहूण जेवायला बोलावले. छोट्याशा बालगणेशाला कैलासावर एकटे कसे ठेवायचे, म्हणून माता पार्वती गणोबाला सोबत घेऊन आली. अनुसूया मातेने पाकसिद्धी केली होती. तिघेही जण आसनावर जेवायला बसले. केळीच्या लांबसडक पानावर निरनिराळे पदार्थ वाढले होते. ते पाहून पार्वती माता म्हणजे स्वयं अन्नपूर्णा तृप्त झाली. धुपाचा मंद सुगंध दरवळत होता. तिघेही जण जेवले. 

अनुसूया माता आग्रह करून करून वाढत होती. पार्वती मातेचे पोट भरले. महादेवांनीही पाठोपाठ ढेकर दिली. बालगणेश मात्र इवलेसे तोंड करून पोट भरले नाही, असे हळूच म्हणाला. अनुसूया मातेला हसू आलं. तिने गणोबाला विचारलं, 'मग काय करू तुझ्यासाठी सांग, तुला आवडतं ते करून वाढते, म्हणजे पोट भरेल.' गणोबाने 'काहीतरी गोड करा' असे सांगितले. 

अनुसूया मातेने काही वेळातच केळीच्या पानात लुसलुशीत दिव्य मोदक करून गणोबाला वाढले. पार्वती माता आणि महादेवालाही मोदकांचा आग्रह केला. पण भरल्या पोटी त्यांनी तो आग्रह नाकारला. गणोबाला ते दिव्य मोदक अतिशय आवडले. तो एकामागे एक दिव्य मोदक गट्टम करू लागला. असे करत २१ मोदक त्याने खाल्ले आणि नंतर 'आता माझे पोट भरले' असे म्हणाला. तेव्हापासून पार्वती मातादेखील गणोबाला भूक लागली की अधून मधून २१ दिव्य मोदक करू लागली. पुढे पुढे तशी प्रथाच पडली आणि गणोबाला प्रसन्न करण्यासाठी भक्तांनी त्याच्या पोटातून जाण्याचा मार्ग स्वीकारला. 

Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

यात कथेत कथन केलेले दिव्य मोदक म्हणजेच आजचे उकडीचे मोदक असावेत, मात्र याबद्दल खुलासा नाही. परंतु मोदक या पदार्थाला अनुसूया मातेचा दिव्य स्पर्श झाल्याने त्याला दिव्य मोदक म्हटले जात असावे, असा आपण तर्क लावूया. 

मोदका संदर्भात दुसरी कथा अशी सापडते, की एकदा कार्तिकेय आणि गणोबा यांच्यात स्पर्धा लागली, 'पृथ्वी प्रदक्षिणा आधी कोण पूर्ण करणार याची!' जो विजेता ठरेल त्याला मोदकाचा खाऊ मिळेल, असे बक्षीस पार्वती मातेने घोषित केले. कार्तिकेय पृथ्वी प्रदक्षिणेला निघून गेले, तर हुशार गणोबा आई वडिलांना प्रदक्षिणा घालून हेच माझे जग आहे असे म्हणत स्पर्धेचे विजेते ठरले. आपसुख, स्पर्धेचे पारितोषिक त्यांना मिळाले. 

गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!

या दोन्ही कथांवरून मोदक या पदार्थाचा तपशील मिळतो आणि २१ मोदक का केले जातात, याचा खुलासा मिळतो. या दोन्ही कथा आहेत की नाही मोदकासारख्या गोड गोड? 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024Ganesh Chaturthiगणेश चतुर्थीGanpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीfoodअन्नIndian Festivalsभारतीय उत्सव-सणganpatiगणपती 2024