शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर उतरून डीजे बंद करायला लावणाऱ्या खासदार मेधा कुलकर्णींची गणेश मंडळांना साद; म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 14:03 IST

Ganesh Chaturthi 2024: येत्या ७ सप्टेंबर पासून गणेशोत्सव सुरु होत होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी शेअर केला एक व्हिडीओ!

पुण्याच्या राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी ३ सप्टेंबर रोजी त्यांच्या सोशल मीडिया हॅन्डलवर एक व्हिडीओ शेअर केला, त्यात त्यांनी गणेश मंडळांना उद्देशून आवाहन केले आहे. त्यात त्या म्हणाल्या, 'आपल्याला खूप मोठा आवाज दीर्घ काळासाठी ऐकावा लागला तर त्रास होतो. त्या आवाजाने आपल्या वसाहतीतील ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं, आजारी व्यक्तींच्या हृदयाची धडधड वाढते, तब्येत आणखी बिघडते. या सर्वांची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. सर्व गणेश मंडळांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी आवाजाची मर्यादा पाळावी आणि उत्सवासाठी गाण्यांची डोळसपणे निवड करावी. मोजक्या पारंपरिक वाद्यांची निवड करून हा उत्सव साजरा करावा.' त्यांच्या या व्हिडीओवर नागरिकांनी सहमती दर्शवली आहे, तसेच कायदा कडक करण्याचेही सुचवले आहे. 

गणेशोत्सवाप्रमाणेच चार महिन्यांपूर्वी रामनवमी उत्सवाच्या वेळी मेधा कुलकर्णी यांनी पुण्यातील  MIT कॉलेजच्या परिसरात ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा अधोरेखित केला होता. उत्सवाच्या नावावर कानठळ्या बसवणारे डीजे आणि अश्लील गाणी, लेझर शो यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी मेधा कुलकर्णी यांना बोलावून घेतले. तेव्हा हा उत्सव करणाऱ्या तरुणांशी चर्चा केली आणि डीजे बंद करण्यास भाग पाडले. तेव्हा बहुजन समाजाला रामाची आरती करू दिली नाही, असे म्हणत त्यांच्यावर आयोजकांनी आरोप केले. त्या आरोपांचे खंडन करण्यासाठी सोशल मीडियाचाच आधार घेत मेधा कुलकर्णी यांनी सदर परिस्थिती पुराव्यासहित कथन केली आणि त्या व्हिडीओमधून इशारा दिला, ' हिंदूंचा सण उत्साहाने साजरा झालाच पाहिजे, त्याचबरोबर तो सभ्यतेने झाला पाहिजे. जर कोणी उत्सवाच्या नावावर धांगडधिंगा करत असेल, अश्लील गाणी लावत असेल तर आम्ही विरोध करणार.' 

गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडली, असे नागरिकांकडून म्हटले जात असले. तरीदेखील त्यांनी घातलेली साद किती मंडळांपर्यंत पोहोचते आणि किती मंडळांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Puneपुणेmedha kulkarniमेधा कुलकर्णी