शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

श्रीगणेश चतुर्थी: गणेश पूजनासाठी नेमके काय साहित्य लागते? ‘अशी’ करा संपूर्ण तयारी; पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 12:23 IST

Ganesh Chaturthi 2023: पार्थिव गणपती पूजनासाठी काही गोष्टी अत्यंत आवश्यक मानल्या गेल्या आहेत. गणेश पूजनाची कशी तयारी करावी? जाणून घ्या...

Ganesh Chaturthi 2023: लाडक्या गणेशाच्या आगमनासाठी सर्वत्र लगबग सुरू झाली आहे. गणेश साहित्यांनी बाजार फुलून गेले आहेत. दरवर्षी कोट्यवधी घरांमध्ये गणरायाचे आगमन होते. केवळ भारतात नाही, तर जगातील अनेक ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातो. गणपतीची मनोभावे पूजा केली जाते. गणपतीच्या आवडीचे पदार्थ नैवेद्याला केले जातात. दरवर्षी डेकोरेशनमध्ये वैविध्य आणण्यासाठी सर्जनशीलतेची कसोटी लागते. आपापल्या परिने लाडक्या गणेशाच्या आगमनाची तयारी केली जाते. मात्र, पहिल्या दिवशी पार्थिव गणेशाचे पूजन करताना नेमके कोणते साहित्य लागते? गणपती पूजनाची तयारी कशी करावी? जाणून घ्या... (Ganesh Chaturthi 2023 Puja Sahitya)

श्री गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी श्रींच्या प्राणप्रतिष्ठेसाठी बाजारातून खाली नमूद केलेल्या गोष्टी आणाव्यात. हे पूजेचे साहित्य निवडून, स्वच्छ करून पूजेच्या थाळीत, तबकांत, टोपल्यात नीट लावून ठेवावे, असे सांगितले जाते. (Ganesh Chaturthi 2023 Ganesh Puja Sahitya)

गणेश पूजनाच्या तयारीसाठी लागणारे साहित्य

- पाट किंवा चौरंग, आसन, आसन वा चौरंगावर ठेवण्यासाठी वस्त्र. रांगोळी, समई, निरांजने, पंचारती, वाती, फुलवाती, आरतीसाठी तबक, उदबत्तीचे घर, धूप लावण्यासाठी स्टॅंन्ड, विड्याची पाने, सुट्टे पैसे, सुपारी, फळे, श्रीफळ, नारळ, नैवेद्य व प्रसाद वाटपासाठी वस्तू (वाट्या, चमचा, तबक इ.)

श्रीगणेश पूजनासाठी लागणारे साहित्य

ताम्हण, पळी-पंचपात्री, अष्टगंध डबी, शेंदूर डबी, बुक्का, हळदकुंकू, गुलाल, फुले, निवडलेल्या दूर्वांची २१-२१ ची बांधलेली जुडी, विड्याची पाने १५, गूळ, खोबरें, पंचामृत- साहित्य (दूध, दही, तूप, मध, साखर) गंध, अत्तर जानवे, उदबत्ती, एकारती, आरतीसाठी पंचारती, कापूर, १ नारळ, खारीक, बदाम, फळे, फुले पुढीलप्रमाणे : लाल कमळ, मंदार, चाफा, केवडा, गोकर्ण, जाई, जास्वंद, शेवंती, गुलाब, पारिजातक. (Ganesh Chaturthi Ganesh Puja Sahitya In Marathi)

पुढील प्रमाणें २१ प्रकारची पत्री :- १) मोगरा. २) माका. ३) बेलाचे पान. (४) दूर्वा. ५) बोरीचे पान. ६) धोत्र्याचे पान. ७) तुळस. ८) शमी. ९) आघाडा.  १०) डोरली. ११) कण्हेर. १२) रुई. १३) अर्जुनसादडा. १४) विष्णुकांता. १५) डाळिंब. १६) देवदार. १७) मरुवा. १८) पिंपळ. १९) जाई. २०) केवडा. २१) अगस्तिपत्र.

अन्य साहित्य :- गूळ, खोबरे बारीक किसून खसखस, खडीसाखर, खजूर-बेदाण्यासह पंचखाद्य (वाटी किंवा अधिक प्रसाद वाटण्यासाठी), उकडलेले / तळलेले अगर खव्याचे (पेढे) मोदक - २१ (घरातील परंपरेनुसार नैवेद्यासाठी मोदक), गणपतीसाठी लाल/भगव्या रंगाचे नवीन वस्त्र. अन्य साहित्य आपापल्या परंपरा, कुळाचार, कुळधर्म यांप्रमाणे घ्यावे, असे सांगितले जाते. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीGanpati Festivalगणेशोत्सवganpatiगणपती