शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Chaturthi 2022: गणेशोत्सव: गणेश चतुर्थीला मनापासून करा गणपती पूजन; ‘हे’ ग्रह होतील शुभ! भाग्योदय, नशीब चमकेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 10:20 IST

Ganesh Chaturthi 2022: प्रथमेश असलेल्या गणपती बाप्पाची मनोभावे पूजन केल्यास या दोन ग्रहांचा प्रतिकूल प्रभाव कमी होऊन विघ्नहर्ता कृपेने शुभ फल मिळू शकते, असे सांगितले जाते. जाणून घ्या...

भाद्रपद महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. गणपती बाप्पाचे केवळ नाव उच्चारताच मन अगदी चैतन्यमय होऊन जाते. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे. बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, १४ विद्या आणि ६४ कला अधिपती असलेल्या गणेशाचे पूजन भाद्रपद महिन्यात मोठ्या प्रमाणात केले जाते. यंदा ३१ ऑगस्ट २०२२ रोजी गणेश चतुर्थी आहे. (Ganesh Chaturthi 2022)

गणेश चतुर्थीचा सण देशात, विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गणेशोत्सव काळातील या दहा दिवसांत गणपतीची विधिवत पूजा केली जाते. त्यांच्या पूजेने कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी येते, असे मानले जाते. याशिवाय कुंडलीतील काही ग्रह शांत होऊन शुभ फल प्रदान करतात, अशी मान्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मुख्यतः बुध आणि केतु हे दोन ग्रह गणेश उपासनेचे शुभ फल देतात. म्हणूनच गणेश चतुर्थीच्या दिवशी नियमानुसार गणेशजींची पूजा करावी. यामुळे कुंडलीत बुध आणि केतु यांचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत होऊ शकते, असे सांगितले जाते.

बुध, केतुचा प्रतिकूल प्रभाव कमी, शुभ होईल

ज्योतिषशास्त्रात बुध हा शुभ ग्रह मानला जातो. बुध हा मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी आहे. कर्क ही बुधाची उच्च रास मानली जाते आणि मीन ही बुधाची नीच राशी मानली जाते. अंकशास्त्रानुसार, बुध हा मूलांक ५ चा स्वामी आहे. ज्योतिषशास्त्रात, बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, वाणी, शिक्षण, गणित, लेखन, मनोरंजन, वाद, प्रकाशन, व्यवसाय, मित्र यांचा कारक ग्रह मानण्यात येतो. कुंडलीत बुध शुभ स्थितीत असल्यास बुद्धिमत्ता, वाणी, शिक्षण, व्यवसाय क्षेत्रात यश आणि प्रगती साध्य करता येऊ शकते. ज्योतिषशास्त्रात केतूला पाप ग्रहाच्या श्रेणीत ठेवले आहे. त्याला छाया ग्रह असेही म्हणतात. तो तर्क, बुद्धिमत्ता, ज्ञान, अलिप्तता, कल्पनाशक्ती आणि मानसिक गुणांचा कारक ग्रह मानला जातो. केतू ग्रह लोकांना चौकटीबाहेर काम करण्यास भाग पाडतो, असे म्हटले जाते. 

गणेश चतुर्थीला ग्रहांची शुभ-स्थिती

यंदाच्या वर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र हा बुधाचे स्वामित्व असलेल्या कन्या राशीत असेल. या दिवशी शुक्र कर्क राशीतून सूर्याचे स्वामित्व असलेल्या सिंह राशीत प्रवेश करेल.  या दिवशी शुक्र संक्रांती असेल. गुरु आपल्या राशीत मीन राशीत असेल. शनी स्वराशीत म्हणजेच मकर असेल. सूर्य आपलेच स्वामित्व असलेल्या सिंह राशीत असेल. बुधही आपल्याच म्हणजे कन्या राशीत असेल. म्हणजेच या दिवशी चार ग्रह स्वराशीत असतील. ग्रह नक्षत्रांचा हा संयोग भक्तांसाठीही शुभ ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.  

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवAstrologyफलज्योतिषGanpati Festivalगणेशोत्सवganpatiगणपती