शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांशी मैत्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 05:15 IST

मी कायम सुखी असो, मी शांत असो, मी आनंदित असो आणि मला मुक्ती मिळो.

- धनंजय जोशीपाली भाषेमध्ये टी३३ं म्हणून शब्द आहे. त्याचा अर्थ मैत्री भावना किंवा सर्वांबद्दल प्रेम भावना मानणे. इंग्लिशमध्ये त्याला शब्द आहे लव्हिंग- काइंडनेस!ज्ञान शिबिरामध्ये ही भावना अंत:करणामध्ये जागृत ठेवून कसे जगायचे हे शिकवले जाते. विपश्यना शिबिरात त्याचा नियमित उपयोग होतो. ही भावना आचरणात कशी आणावी हे सोपे काम आहे. तीन किंवा चार वाक्ये मनात ठेवावी. ती कोणती?मी कायम सुखी असो, मी शांत असो, मी आनंदित असो आणि मला मुक्ती मिळो. पहिल्यांदा मी, नंतर आपल्याजवळ जे आहेत ते, नंतर अगदी आपल्याला न आवडणारे जे आहेत ते, त्यानंतर सर्व प्राणिमात्र, अशा सर्वांना शांती, आनंद आणि मुक्ती मिळो ही भावना मनात ठेवून ध्यान करायचे. आपण जर रोज अगदी दहा मिनिटे जरी अशी साधना केली तर आपले जीवन संपूर्ण बदलून जाऊ शकेल. मला नेहेमी वाटते की आपण हे फक्त जीवितांसाठीच का करतो? घरात वावरताना आपण जरा लक्ष देऊन बघावे. आपण रेफ्रीजरेटरचे दार हळू, काळजीपूर्वक, प्रेमाने उघडतो की काहीही विचार न करता? आपण खुर्चीवर बसताना तिचे आभार मानून मग बसतो की तसेच? प्रत्येक क्रिया अशा प्रेमाने का नाही करता येत आपल्याला? माझ्या मित्राने नवीन मर्सिडिज बेंझ गाडी घेतली. त्यातले सगळे फीचर बघून थक्क झालो; पण एक गोष्ट मला अत्यंत आवडली. गाडीचे दार बंद करताना तुम्ही फक्त ते दार जरा जवळ आणायचे आणि ते आपोआप शांतपणे बंद होते. धाडदिशी आपटायची जरूर नाही. मनात विचार आला, ज्या इंजिनिअरने ते डिझाइन केले तो नक्कीच झेन साधक असावा!