शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Chandra Grahan 2023: यंदाचे पहिले चंद्रग्रहण कधी? ‘या’ ठिकाणी दिसणार ग्रहण; पाहा, स्पर्श, मध्य अन् मोक्ष वेळा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 07:19 IST

Lunar Eclipse May 2023 India: सूर्यग्रहणानंतर अवघ्या १५ दिवसांनी चंद्रग्रहण लागणार आहे. कुठे आणि कधी दिसेल ग्रहण? जाणून घ्या, डिटेल्स...

Chandra Grahan 2023: यंदाचे पहिले सूर्यग्रहण चैत्र अमावास्येला लागले होते. मात्र, भारतात हे सूर्यग्रहण दिसले नव्हते. त्यामुळे वेधादि नियम पाळले गेले नव्हते. यानंतर आता लगेचच पंधरा दिवसांनी म्हणजेच वैशाख पौर्णिमेला सन २०२३ मधील पहिले चंद्रग्रहण लागणार आहे. सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण प्रतिकूल मानले जाते. ग्रहण काळात धार्मिक कार्ये, शुभ कार्ये केली जात नाहीत. ०५ मे २०२३ रोजी वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्धपौर्णिमेला हे चंद्रग्रहण लागणार आहे. यंदाच्या पहिल्या चंद्रग्रहणाचा स्पर्श, मध्य आणि मोक्ष याबाबत जाणून घेऊया... (Lunar Eclipse May 2023 India)

वास्तविक पाहता चंद्रग्रहण ही खगोलीय घटना आहे. पौर्णिमेच्या दिवशी सूर्याची चंद्राशी प्रतियुती असते चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी येते, पृथ्वीची चंद्रावर सावली पडते, तेव्हा चंद्रग्रहण लागते, असे म्हटले जाते. सूर्य-चंद्राची युती किंवा प्रतियुती राहू किंवा केतू या बिंदूजवळ होईल तेव्हाच ग्रहणे होतात. म्हणजेच सूर्य अमावास्येला अगर चंद्र पौर्णिमेला राहुच्या किंवा केतुच्या जवळच असावा लागतो. प्रत्येक अमावास्या आणि पौर्णिमेला ग्रहण लागत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार, आताच्या घडीला राहु मेष राशीत तर केतु तूळ राशीत आहे. ग्रहणावेळी चंद्र तूळ राशीत असेल, त्यामुळे या पौर्णिमेला चंद्रग्रहण लागेल, असे सांगितले जात आहे. 

बुद्धपौर्णिमेला छायाकल्प चंद्रग्रहण

चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावलीभोवतीच्या फिकट सावलीतून प्रवास झाला, तर उपछाया चंद्रग्रहण दिसते. उपछाया चंद्रग्रहणाच्या वेळी पौर्णिमेच्या तेजस्वी चंद्राचा प्रकाश काहीसा मंदावलेला दिसतो. जेव्हा चंद्र पूर्णपणे लपत नाही आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडत नाही तेव्हा त्याला छायाकल्प चंद्र ग्रहण म्हणतात. ०५ मे २०२३ रोजी लागणारे चंद्रग्रहण छायाकल्प प्रकारातील आहे. ०५ मे २०२३ रोजी रात्रौ ०८ वाजून ४४ मिनिटांनी ग्रहणाचा स्पर्श होणार आहे. तर रात्रौ १० वाजून २३ मिनिटांनी ग्रहणाचा मध्य असेल. तसेच मध्यरात्रौ ०१ वाजून ०२ मिनिटांनी ग्रहणाचा मोक्ष होईल. छायाकल्प चंद्रग्रहण शास्त्रानुसार पूर्ण ग्रहणासारखे नसते. पौर्णिमेला केले जाणारी पूजा-अर्चा नियमित पद्धतीने केली जाऊ शकते, असे सांगण्यात आले आहे. तसेच कोणत्याही प्रकारची खाण्यापिण्याची पथ्ये पाळली नाही, तरी चालतील, असे सांगण्यात आले आहे. छायाकल्प चंद्रग्रहणाला अधिक महत्त्व नाही. त्यामुळे धार्मिक पथ्ये किंवा अन्य पथ्ये पाळावीत, असे सांगितले जात नाही. तसेच ग्रहणाचे वेधादि नियमही पाळू नये, असे सांगितले जाते. 

कुठे दिसणार सन २०२३ मधील पहिले चंद्रग्रहण? 

यंदाचे म्हणजेच २०२३ चे पहिले चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. सदर चंद्रग्रहण यूरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अंटार्टिका, प्रशांत अटलांटिक आणि हिंद महासागराच्या भागांमध्ये हे चंद्रग्रहण दिसू शकेल. २८ ऑक्टोबर २०२३ रोजी खंडग्रास चंद्रग्रहण लागणार आहे. हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. या दिवशी कोजागिरी पौर्णिमा असून, हेच एकमेव असे चंद्रग्रहण ठरणार आहे, जे भारतातून दिसेल. भारतासह ऑस्ट्रेलिया, उत्तर दक्षिण आफ्रिका, अंटार्टिका, प्रशांत, अटलांटिक आणि हिंद महासागराच्या काही भागांमध्ये चंद्रग्रहण दिसेल. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Lunar Eclipseचंद्रग्रहण