शहरं
Join us  
Trending Stories
1
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
2
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
3
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
4
"भाजपचे नेते काहीही बोलून जातात", बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक
5
'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या', पोलिसांचा सर्वत्र दबाव, पाच महिने 'ती' मागत होती न्याय; खासदार व पीएचाही उल्लेख
6
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
7
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
8
'तक्रार केल्याने दिला जास्त त्रास'; महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पीएसआय बदने, बनकर अटकेत
9
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
10
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
11
धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा डाव, सणातही समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम : वर्षा गायकवाड
12
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
13
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
14
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
15
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
16
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
17
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
18
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
19
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
20
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!

मराठी वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी: चंद्रोदयाची वेळ कधी? पाहा, व्रत पूजा विधी, महात्म्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 15:03 IST

Falgun Sankashti Chaturthi March 2025: मराठी वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी कधी आहे? व्रत पूजन विधी कसा करावा? चंद्रोदयाची वेळ काय? जाणून घ्या...

Falgun Sankashti Chaturthi March 2025: अवघ्या काही दिवसांनी सुरु असलेल्या मराठी वर्षाची सांगता होईल. मराठी महिन्यातील फाल्गुन मास सुरू आहे. मराठी वर्षाच्या सांगतेला अनेक शुभ योग जुळून येत आहेत. या शुभ अद्भूत योगांमुळे हिंदू नववर्षाची सुरुवात अतिशय चांगली होऊ शकेल, असे म्हटले जात आहे. मराठी वर्षाची सांगता होत असताना काही व्रते आचरली जाणार आहेत. यापैकी एक म्हणजे संकष्ट चतुर्थीचे व्रत. मराठी वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी कधी आहे? विविध शहरांमधील चंद्रोदयाची वेळ काय? काही मान्यता जाणून घेऊया...

सर्वांना आपलेसे वाटणारे दैवत म्हणजे गणपती बाप्पा. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळेच देवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो. प्रथमेश गणपती हा सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे. संकटातून मार्ग दाखवणारा आणि अपार कृपा करणारा बाप्पा भाविकांच्या हाकेला धावून जाणार आहे, असे म्हटले जाते. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने अडचणी, समस्येतून बाहेर पडण्यासाठी गणपतीचे नामस्मरण, काही विशेष स्तोत्रांचे पठण, मंत्रांचे जप करणे अतिशय शुभ, पुण्यफलदायी, लाभदायी ठरू शकते, असे सांगितले जाते. 

फाल्गुन संकष्ट चतुर्थी: सोमवार, १७ मार्च २०२५

फाल्गुन संकष्ट चतुर्थी प्रारंभ: सोमवार, १७ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ०७ वाजून ३२ मिनिटे.

फाल्गुन संकष्ट चतुर्थी समाप्ती: मंगळवार, १८ मार्च २०२५ रोजी रात्रौ १० वाजून ०७ मिनिटे.

भारतीय पंचांग पद्धतीनुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असली तरी संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाला महत्त्व असल्यामुळे सोमवार, १७ मार्च २०२५ रोजी संकष्ट चतुर्थी साजरी होणार असल्याचे सांगितले जात आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकतो. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. (Falgun Sankashti Chaturthi March 2025 Vrat Puja In Marathi)

फाल्गुन संकष्ट चतुर्थीचा व्रत पूजन विधी

संकष्ट चतुर्थीचे व्रत एक काम्यव्रत आहे. हे व्रत फार प्राचीन आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले जाते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी. धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य  द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. उपवास सोडताना गणपतीला आवडणारे लाडू, मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात. गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे. या दिवशी २१ दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख-समृद्धी आणि बुद्धीप्रदान करतात, असे सांगितले जाते. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

विविध शहरांतील चंद्रोदय वेळ 

शहरांची नावेचंद्रोदयाची वेळ
मुंबईरात्रौ ०९ वाजून २० मिनिटे
ठाणेरात्रौ ०९ वाजून १९ मिनिटे
पुणेरात्रौ ०९ वाजून १५ मिनिटे
रत्नागिरीरात्रौ ०९ वाजून १५ मिनिटे
कोल्हापूररात्रौ ०९ वाजून ११ मिनिटे
सातारारात्रौ ०९ वाजून १३ मिनिटे
नाशिकरात्रौ ०९ वाजून १७ मिनिटे
अहिल्यानगररात्रौ ०९ वाजून १२ मिनिटे
धुळेरात्रौ ०९ वाजून १४ मिनिटे
जळगावरात्रौ ०९ वाजून ११ मिनिटे
वर्धारात्रौ ०८ वाजून ५८ मिनिटे
यवतमाळरात्रौ ०९ वाजून ०० मिनिटे
बीडरात्रौ ०९ वाजून ०८ मिनिटे
सांगलीरात्रौ ०९ वाजून १० मिनिटे
सावंतवाडीरात्रौ ०९ वाजून १२ मिनिटे
सोलापूररात्रौ ०९ वाजून ०५ मिनिटे
नागपूररात्रौ ०८ वाजून ५७ मिनिटे
अमरावतीरात्रौ ०९ वाजून ०२ मिनिटे
अकोलारात्रौ ०९ वाजून ०५ मिनिटे
छत्रपती संभाजीनगररात्रौ ०९ वाजून ११ मिनिटे
भुसावळरात्रौ ०९ वाजता १० मिनिटे
परभणीरात्रौ ०९ वाजून ०४ मिनिटे
नांदेडरात्रौ ०९ वाजून ०१ मिनिटे
धाराशीवरात्रौ ०९ वाजून ०६ मिनिटे
भंडारारात्रौ ०८ वाजून ५५ मिनिटे
चंद्रपूररात्रौ ०८ वाजून ५४ मिनिटे
बुलढाणारात्रौ ०९ वाजून ०८ मिनिटे
मालवणरात्रौ ०९ वाजून १४ मिनिटे
पणजीरात्रौ ०९ वाजून ११ मिनिटे
बेळगावरात्रौ ०९ वाजून ०९ मिनिटे
इंदौररात्रौ ०९ वाजून १२ मिनिटे
ग्वाल्हेररात्रौ ०९ वाजून ०८ मिनिटे

|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया||

 

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीPuja Vidhiपूजा विधीspiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक