शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

मराठी वर्षातला शेवटचा महिना फाल्गुन होतोय सुरू, चला पुरणपोळीचा बेत करू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 11:24 IST

२८ फेब्रुवारी रोजी फाल्गुन मास सुरू होत आहे आणि पाठोपाठ चैत्रचाहूल; उन्हाचा ताप वाढणार असला तरी उत्सवाचा गारवा तनामनाला तजेला देईल हे नक्की!

हिंदू पंचांगानुसार चैत्र-वैशाखादी मासगणनेतील फाल्गुन हा शेवटचा बारावा महिना! या महिन्यात होळी, धुलिवंदन हे सण वगळता अन्य कोणतेही सण, व्रते येत नाहीत, तसेच कोणतेही शुभकार्य करत नाहीत, म्हणून अडगळीसारखा वाटणाऱ्या या मासाला 'आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास' असे उपरोधिकपणे म्हटले जाते. कारण, या मासामुळे शुभकार्य खोळंबतात. तसे असले तरी फाल्गुन मास आपल्या सर्वांनाच अनेक कारणांमुळे आवडतो. यंदा २८ फेब्रुवारी २०२५ पासून फाल्गुन मास सुरू होत आहे. 

या महिन्यातील पौर्णिमेला किंवा तिच्या आधी किंवा नंतर पूर्वा फाल्गुनी हे नक्षत्र असते, म्हणून या मासाला 'फाल्गुन' अशी ओळख मिळाली आहे. या मासाचे पूर्वीचे नाव 'तपस्य' असे होते. पुढे पुढे नक्षत्राची ओळख त्या महिन्याला मिळू लागली. 

हा शिशिर ऋतूचा दुसरा महिना असून या महिन्यात उत्तरायण असते. या महिन्याच्या पौर्णिमा आणि अमावस्या या दोन्ही तिथी मन्वादि आहेत. मन्वादि तिथी म्हणजे ज्या तिथीला सृष्टीचा पुन: आरंभ झाला असे मानले जाते, त्याला मन्वंतर किंवा मन्वादि तिथी असे म्हणतात. या तिथीला शिव आणि शक्तीची विशेष उपासना केली जाते. 

दक्षिण भारतात फाल्गुन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तेथील देवळांमध्ये लहान-मोठे सर्व उत्सव फाल्गुन महिन्यात केले जातात. तसेच फाल्गुन महिन्यात येणारा होळी-रंगपंचमी-धुळवड हा सण सबंध देशात उत्साहाने साजरा केला जातो. वाईट विचार, आचार यांचे होलिकेत दहन करून नव्या रंगात, नव्या उत्साहात पाच दिवस रंगपंचमी खेळली जाते. 

गोकुळात असताना भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसमवेत रंगपंचमी खेळल्यामुळे या उत्सवाला धार्मिक, आध्यात्मिक आणि भावनिकदृष्ट्यादेखील विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. श्रीकृष्णाच्या प्रेमरंगात रंगलेल्या गोपिका रंगपंचमीला श्रीकृष्णाशी रंगोत्सव खेळतात. तोच उत्साह सर्व वयोगटातील लोकांमध्ये आजही दिसून येतो. मनातील अढी सोडून सगळे जण एका रंगात रंगून जातात.

असा हा फाल्गुन पुरणपोळीचा गोडवा देणारा, विविध रंगांनी आयुष्य रंगवून टाकणारा आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज करणारा महिना आहे. 

टॅग्स :Holiहोळी 2024