शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

२०२० मध्ये करावी लागणार 'लगीनघाई'; वर्षअखेरीस फक्त आठ विवाह मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 2:51 PM

वर-वधुंसाठी वर्षातील शेवटचा महिना हीच विवाहासाठी संधी आहे. कारण, पंचांगानुसार १५ डिसेंबर २०२० ते १८ एप्रिल २०२१ पर्यंत लग्न मुहूर्तांचा अभाव असणार आहे.

दिवाळी पाठोपाठ तुळशीच्या लग्नाची लगबग सुरू होते आणि तुळशीचे लग्न झाले, की घरातील विवाहकार्याचा शुभारंभ होतो. यंदाही प्रबोधिनी एकादशीनंतर विवाह मुहूर्त आहेत. मात्र, विवाह मुहूर्तांचा कालावधी अतिशय कमी आहे. 

विवाह हा सोळा संस्कारांपैकी महत्त्वपूर्ण संस्कार आहे. दोन जीवांच्या संसाराची गाठ बांधण्यासाठी आपल्याकडे शुभमुहूर्त पाहण्याची प्रथा आहे. शुभमुहूर्त अर्थात, असा मंगल क्षण, ज्यावेळेस सर्वार्थाने परिस्थिती वधू आणि वरासाठी अनुकूल असते, ती घटिका! 

चातुर्मासात लग्नसमारंभ केले जात नाहीत. मे-जून नंतर लग्नमुहूर्त निघतात, ते थेट दिवाळीनंतर! कारण, तो कालावधी चातुर्मासाचा असतो. त्या कालावधीत देव आराम करतात, अशी श्रद्धा असते. आषाढी एकादशीला विश्रांतीस गेलेले देव प्रबोधिनी एकादशीला जागे होतात, असे म्हटले जाते. म्हणून या काळात देवाच्या अनुपस्थितीत शुभकार्ये केली जात नाहीत. आपल्या संस्कृतीने प्रत्येक कार्य श्रीकृष्णार्पणमस्तु म्हणत भगवंताच्या चरणी अर्पण करण्याची शिकवण दिली आहे. त्यामुळे आयुष्यातील सर्वात मंगल आणि कलाटणी देणारा क्षण देवाच्या साक्षीने पार पडावा, असा सर्वांचा आग्रह असतो. यासाठीच विवाह मुहूर्त पाहून शुभकार्य ठरवले जाते. माघ, फाल्गुन, ज्येष्ठ, आषाढ, मार्गशीर्ष  हे मराठी महिने विवाहासाठी उचित मानले जातात. तसेच हस्त, उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाढा, स्वाति, मघा, मूळ, अनुराधा, मृगशिरा, रेवती, रोहिणी ही नक्षत्रे अनुकूल मानली जातात. 

कोरोनाने जवळपास पूर्ण वर्ष वाया घालवले. त्यामुळे लग्नेच्छुक वर-वधुंसाठी वर्षातील शेवटचा महिना हीच विवाहासाठी संधी आहे. कारण, पंचांगानुसार १५ डिसेंबर २०२० ते १८ एप्रिल २०२१ पर्यंत लग्न मुहूर्तांचा अभाव असणार आहे. म्हणून, यावर्षातील शेवटचे आठ लग्न मुहूर्त पुढीलप्रमाणे-

२७ नोव्हेंबर शुक्रवार कार्तिक शुद्ध द्वादशी   अश्विनी नक्षत्र२९ नोव्हेंबर रविवार  कार्तिक शुद्ध चर्तुदशी  रोहिणी नक्षत्र३० नोव्हेंबर सोमवार कार्तिक पौर्णिमा           रोहिणी नक्षत्र१ डिसेंबर मंगळवार मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदा रोहिणी नक्षत्र७ डिसेंबर सोमवार  मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी   मघा नक्षत्र९ डिसेंबर बुधवार   मार्गशीर्ष कृष्ण नवमी     हस्त नक्षत्र१० डिसेंबर गुरुवार मार्गशीर्ष कृष्ण दशमी     चित्रा नक्षत्र११ डिसेंबर शुक्रवार मार्गशीर्ष कृष्ण एकादशी  चित्रा नक्षत्र

लागा तयारीला...!