शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

'या' तीन गोष्टी ज्यांनी समजून घेतल्या तर अहंकार कधीच स्पर्श करू शकणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 08:00 IST

अहंकारी व्यक्ती परमेश्वराच्या सन्निध कधीच जाऊ शकत नाही - जगद्गुरु शंकराचार्य 

संत नामदेव म्हणतात, 'अहंकाराचा वारा न लागो राजसा!' का? कारण अहंकार हे सर्व दु:खाचे मूळ आहे. गंमत म्हणजे अहंकार झालेल्या व्यक्तीला आपण अहंकारी आहोत, हेच कळत नाही आणि लोक सांगतात ते पटत नाही. म्हणून आपण अहंकारापासून मुक्त आहोत की नाही, याची स्वत: चाचपणी केली पाहिजे.

देवी भागवतात सांगितले आहे, संसार नाशाचे मूळ कारण अहंकार आहे. धर्म विनाशाचे कारणही अहंकार आहे. अहंकार आपल्या मनात असुरक्षित भावनेला जन्म देतो. अहंकार यशप्राप्तीतून येतो, पण त्याचवेळेस अपयशाची भीती मनाला पोखरत जाते. जेवढा मोठा अहंकार तेवढी जास्त असुरक्षितता!

सर्वांना माहित आहे, प्रत्येकाला एक ना एक दिवस या विश्वाचा निरोप घ्यायचा आहे. तरी स्वत:च्या नावाभोवती मोठे वलय निर्माण करण्याची धडपड कशासाठी? कोणासाठी? कालचक्र फिरत राहते. त्रिकालबाधित काही राहणार असेल, तर ते म्हणजे भगवंताचे नाम! हे माहित असूनही लोक स्वत:ला सर्वश्रेष्ठ म्हणवून घेण्यासाठी धडपडत राहतात. जर तुम्ही स्वत:ला सर्वश्रेष्ठ समजत असाल, तर तुमच्या मनाला कोणत्याही गोष्टीची भीती वाटता कामा नये. जर तुम्ही मनोमन घाबरत असाल, एखादी चिंता तुमच्या मनाला सलत असेल, तर लक्षात घ्या, आपण वृथा अभिमान बाळगत आहोत. आपल्यातील अहंकार ओळखण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. ज्यादिवशी मन भयमुक्त होईल, त्यादिवशी आपल्यातून अहंकाराचा लवलेश निघून गेला, असे म्हणता येईल.

स्वत: सिद्ध करण्यासाठी आज प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करत आहे. अशात अपयश आले, तर ते तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही आणि यश आले, तरी ते तुम्हाला गर्वाने भरून टाकेल. यश-अपयशाकडे जेव्हा आपण समतेने बघायला शिकू, तेव्हा आपण अहंकाराला हरवू शकू. जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात, मन, बुद्धी, चित्त, अहंकार या तत्त्वांमध्ये मी नाही, मी आहे तो केवळ परमात्म्याच्या ठायी!

ब्रह्म आणि अहंकार हे दोघे परस्परविरोधी आहेत. अहंकारी व्यक्ती ब्रह्नाची प्रचिती घेऊ शकत नाही. ब्रह्म म्हणजे सहजता. आपण जसे आहोत, तसा स्वत:चा स्वीकार करणे. आपल्या हातून झालेल्या चुकांची सहजतेने क्षमा मागणे आणि दुसऱ्यांकडून झालेल्या चुकांना सहजतेने क्षमा देणे, हेच ब्रह्मज्ञान आहे. या तीन गोष्टी ज्यांनी समजून घेतल्या त्यांना अहंकार कधीच स्पर्श करू शकणार नाही.