शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

Dussehra 2024: दसर्‍याला आठवणीने करा 'हे' एक काम; वास्तुमध्ये सदैव राहील सुख, संपत्ती, समाधान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 16:11 IST

Dussehra 2024: यंदा १२ ऑक्टोबर रोजी शनिवारी दसरा आला आहे, त्यामुळे वास्तुदोष आणि शनिदोष दूर व्हावेत त्यासाठी दिलेला उपाय करा!

अश्विन महिन्याच्या दहाव्या दिवशी देशभरात दसरा (Dussehra 2024) किंवा विजयादशमीचा (Vijayadashami 2024) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. यावेळी ही शुभ तिथी शनिवार १२ ऑक्टोबर रोजी आहे. दसऱ्याच्या सणाला विजयादशमी असेही म्हणतात. यादिवशी शस्त्रपूजा केली जाते. विजयादशमीच्या सणाशी संबंधित अनेक पौराणिक कथा आहेत, त्यापैकी सर्वात प्रसिद्ध म्हणजे भगवान रामाने रावणाचा वध आणि देवी दुर्गेने महिषासुराचा शेवट. या विजयाचा आनंद केवळ देशभरातच नाही, तर जगभरात उत्साहाने साजरा केला जातो. विजयादशमीच्या दिवशी रामलीलेत रावणासह कुंभकरण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांचेही दहन केले जाते. हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो.

रावण दहनानंतर 'हे' काम करा

दसऱ्याला रावणाचे मोठे पुतळे दहन केले जातात. रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्याचा शुभ मुहूर्त सूर्यास्तानंतर रात्री ८.३० पासून असेल. रावण दहन नेहमीच प्रदोष काळात फक्त श्रवण नक्षत्रातच केले जाते. अश्विन महिन्यातील दशमी तिथीला नक्षत्र उगवते तेव्हा सर्व कार्ये पूर्ण होतात. रावण दहनानंतर त्याची थोडीशी राख घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते. ही रक्षा रामाने दुष्ट प्रवृत्तीवर केलेली मात याची जाणीव करून देते. ती एका पुडीत बांधून आपल्या तिजोरीत ठेवावी. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात समृद्धी राहते असे म्हणतात. 

दसऱ्याचे महत्व

दसरा तिथीची संध्याकाळची वेळ अत्यंत शुभ मानली जाते आणि हा काळ विजय काल म्हणून ओळखला जातो. ज्योतिषांच्या मते, या मुहूर्तावर तुम्ही कोणतेही काम सुरु कराल, त्यात तुम्हाला विजय मिळेल, पण ते काम तुम्हाला मनापासून करावे लागेल, अशी अट आहे. कोणतेही नवीन काम किंवा गुंतवणूक, नवीन विषयाच्या अध्ययनाची सुरुवात अशा अनेक शुभ गोष्टी करू शकता. व्यवसायाशी निगडित महत्त्वाचे निर्णय, कार खरेदी, घर खरेदी या मुहूर्तावर करणे शुभ मानले जाते. लोकश्रद्धेनुसार दसऱ्याच्या दिवशी नीळकंठ पक्षी पाहणे अत्यंत शुभ मानले जाते. पण आजकाल नीलकंठ पक्षी क्वचितच दिसतात.

शमीची पूजा 

दसऱ्याच्या संध्याकाळी शमीच्या झाडाची पूजा करण्याचीही प्रथा आहे. दसर्‍याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केल्याने भाग्य उजळते आणि ग्रह-नक्षत्रांच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते. नवरात्रीमध्ये शमीच्या पानांनी देवीची पूजा केली जाते. यासोबतच शमीची पाने महादेवालाही अर्पण केली जातात. दुसरीकडे, शमीचे झाड हे न्याय देवता शनिचे असल्याचे मानले जाते. त्यालाही शमी अर्पण केली जाते. 

जया-विजया देवीची पूजा:

दसर्‍याचा सण पावसाळ्याचा शेवट आणि शरद ऋतूचा प्रारंभ दर्शवतो. या दिवशी अपराजिता देवीसोबत जया आणि विजया यांचीही पूजा केली जाते. जे लोक दरवर्षी दसऱ्याला जय आणि विजयाची पूजा करतात, त्यांना नेहमी शत्रूवर विजय प्राप्त होतो आणि त्यांना कधीही अपयशाचा सामना करावा लागत नाही. असे मानले जाते की भगवान रामाने नऊ दिवस माता दुर्गेची पूजा केली आणि नंतर जया-विजया देवींची पूजा केली. यानंतर राम रावणाशी लढायला निघाले.

टॅग्स :Navratri Mahotsav 2024शारदीय नवरात्रोत्सव २०२४DasaraदसराAstrologyफलज्योतिषVastu shastraवास्तुशास्त्रPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२४