शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

Dussehra 2023: सरस्वती पूजन झाल्यावर चार दिवस देवी सरस्वतीला सक्तीची विश्रांती का दिली जाते? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 11:07 IST

Navratri Mahotsav 2023: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीचे आवाहन, अष्टमीला पूजन आणि चार दिवस विश्रांती देऊन दसऱ्याला परत पूजा केली जाते, त्यामागचे कारण वाचा. 

आश्विन शुक्ल सप्तमीला देवी सरस्वतीच्या मूर्तीची, ग्रंथाची आणि लेखणीची पूजा करावी. पूजा केल्यानंतर सप्तमी, अष्टमी, नवमी असे तीन दिवस ग्रंथवाचन, अध्ययन, अध्यापन आणि लेखन हे व्यवहार बंद ठेवावेत. या काळात माता सरस्वती शयन करते अशी पूर्वापार श्रद्धा आहे. दशमीला पुन्हा सरस्वतीची, ग्रंथांची, लेखण्यांची पूजा करावी. सरस्वतीची अशी आराधना केल्याने प्रसन्न होऊन ती अधिक बुद्धी देते असे मानले जाते. 

दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन आणि शास्त्रपूजन केले जाते हे आपल्याला माहित आहे. परंतु ते पूजन का, कशासाठी याची पूर्वपिटीका वरील माहितीवरून लक्षात येते. रोजच्या व्यस्त कामकाजातून देवाला विश्रांती देणे हा भोळा भाव या विधींमागे दिसून येतो. परंतु या दिवसात सरस्वतीचे उपासक म्हणून काम थांबवणे हे लक्ष्मीसाठी दार बंद करण्यासारखे ठरेल. त्यामुळे कामकाज थांबवणे परवडणारे नसले, तरी देवी सरस्वतीला विश्रांती आपण नक्कीच देऊ शकतो. मध्यंतरी असाच एक सोहळा तुळजापूरच्या देवीसंदर्भात आपण पाहिला असेल. अशाच भोळ्या भक्तीचे प्रथेत रूपांतर होते व लोक त्याचे पालन करू लागतात. चांगल्या प्रथा असतील तर त्या अनुसरण्यास काहीच हरकत नाही, परंतु त्यामागचे कारण जाणून घेणे हे अनिवार्य असले पाहिजे. केवळ अंधानुकरण नको. 

दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजा आपण सगळेच करतो. वही-पुस्तकांची, संगणकाचीदेखील पूजा करतो. अंकाची सरस्वती रेखाटतो. हे सरस्वतीपूजन खऱ्या अर्थाने षष्ठी पासून सुरू होऊन दसऱ्यापर्यंत असते. ते केवळ नवरात्रीत नाही, तर आयुष्यभर केले पाहिजे. जो सरस्वतीचा उपासक असतो, त्याला लक्ष्मीची कमतरता राहत नाही. कारण, विद्वानं सर्वत्र पूज्यते! अर्थात ज्ञानी, माहितगार, हुशार  माणसांची गरज प्रत्येक ठिकाणी असते. अशा व्यक्तींना त्यांच्या ज्ञानाचा यथायोग्य मोबदलादेखील मिळतो. त्यामुळे आपसुखच लक्ष्मीचे आगमन होते.

म्हणून सरस्वतीचे उपासक व्हा, लक्ष्मी माता आपोआप आपल्यावर प्रसन्न राहील. 

टॅग्स :Navratri Mahotsav 2023शारदीय नवरात्रोत्सव 2023Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३Navratriनवरात्रीDasaraदसरा