शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Dussehra 2021 : दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा; जाणून घ्या दसऱ्याचे शुभ मुहूर्त आणि विधी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 08:00 IST

Vijayadashami 2021: दसऱ्याच्या दिवशी आपण वाहनांची, शस्त्राची आणि शैक्षणिक साहित्याची पूजा करतो. पाटीवर, वहीवर अंकांची सरस्वती रेखाटून त्याची पूजा केली जाते. त्याचे शुभ मुहूर्त जाणून घेऊ. 

नवरात्रीची सांगता, रावण दहन आणि दिवाळीची चाहूल घेऊन येणारा दसरा यंदा १५ ऑक्टोबर रोजी आहे. या सणाला अनन्यसाधारण महत्त्व असते. या दिवशी शिक्षणाची, नवीन कार्याची, मंगल कार्याची नांदी सुरू होते. दिवाळीचे वेध लागतात. आपापसातील मतभेद विसरून, आपट्याची पाने देऊन जुन्या नात्यांना सोनेरी झळाळी दिली जाते, तो हाच सोनेरी दिवस. या दिवशी कोणते विधी केले जातात, कोणते सोपस्कार पार पाडले जातात, नवीन वस्तू किंवा वास्तू खरेदीसाठी शुभ मुहूर्त कोणते, सविस्तर जाणून घेऊ. 

दसऱ्याचा शुभमुहूर्त :

गुरुवार, १४ ऑक्टोबर २०२१ रोजी संध्याकाळी ०६. ५२ पासून अश्विन शुद्ध दशमी दशमी सुरू होत आहे आणि शुक्रवार, १५ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ०६.०२ मिनिटांनी ही तिथी संपेल. परंतु दशमीची तिथी  १५ तारखेचा सूर्योदय पाहत असल्यामुळे विजय दशमीचा सण शुक्रवारी १५ ऑक्टोबर २०२१ रोजी साजरा केला जाईल.

शस्त्र पूजनाची वेळ : 

दसऱ्याच्या दिवशी आपण वाहनांची, शस्त्राची आणि शैक्षणिक साहित्याची पूजा करतो. पाटीवर, वहीवर अंकांची सरस्वती रेखाटून त्याची पूजा केली जाते. त्याचे शुभ मुहूर्त जाणून घेऊ. 

अभिजित मुहूर्त - सकाळी ११. ४३ ते दुपारी १२.३० पर्यंत.विजय मुहूर्त - दुपारी २.०१ दुपारी ते दुपारी २.४७ पर्यंत अमृत ​​काल मुहूर्त - संध्याकाळी ६.४४  ते रात्री ८.२७ पर्यंत.

या सणाचे विधी : 

>> दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी रावणाच्या प्रतिमेचे  दहन केले जाते.

>> या दिवशी शस्त्रांच्या पूजेला खूप महत्व आहे.

>> या दिवशी महिषासुरला माता दुर्गेने आणि रावणाला श्री रामाने मारले, म्हणून त्या दोहोंचे पूजन केले जाते. 

>> या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करून त्याची पाने देण्याची परंपरा आहे.

>> या दिवशी काही नवीन काम करण्याची, खरेदी करण्याची, नवीन कपडे घालण्याची प्रथा आहे.

>> या दिवशी गोर गरिबांना भेटवस्तू, उपयुक्त सामान, अन्नधान्य तसेच मिठाई दान दिली जाते.

>> या दिवशी कुटुंबातील सर्व वडीलधाऱ्या मंडळींना वाकून नमस्कार केला जातो व त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. 

>> या दिवशी गोडाधोडाचे पदार्थ बनवून नऊ दिवसाच्या उपासाचे पारणे फेडले जाते. 

>> अनेक ठिकाणी रावणदहन करून या दिवशी फटाकेही सोडले जातात.

>> दसऱ्याच्या दिवशी, परस्पर वैर विसरून, आपट्याची पाने देऊन नव्याने संबंध प्रस्थापित केले जातात. 

टॅग्स :Navratriनवरात्री