अखिल जगातील हिंदूंची 'ही' राष्ट्रीय प्रार्थना तुम्हाला पाठ आहे का? जाणून घ्या तिचा अर्थ!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 01:38 PM2022-05-09T13:38:59+5:302022-05-09T13:39:16+5:30

ती प्रार्थना वैदिक काळापासून म्हटली जात आहे आणि ती सर्वांना पाठ देखील आहे. फक्त तिचे उच्चारण नीट व्हावे अशी अपेक्षा असते, ते होत नाही...

Do you remember the national prayer of Hindus all over the world? Know what it means! | अखिल जगातील हिंदूंची 'ही' राष्ट्रीय प्रार्थना तुम्हाला पाठ आहे का? जाणून घ्या तिचा अर्थ!

अखिल जगातील हिंदूंची 'ही' राष्ट्रीय प्रार्थना तुम्हाला पाठ आहे का? जाणून घ्या तिचा अर्थ!

googlenewsNext

हिंदू धर्मात अनेक स्तोत्र आहेत, प्रार्थना आहेत. परंतु अन्य धर्मियांप्रमाणे जगभरातील हिंदूंना प्रमाण ठरावी अशी कोणती प्रार्थना आहे का? असेल तर कोणती? ती कधी म्हटली पाहिजे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. 

हिंदू धर्म जगातील सर्वात प्राचीन धर्म म्हणून ओळखला जातो. हिंदू धर्मीय जगातील कानाकोपऱ्यात पसरले आहेत आणि त्यांनी आपल्या राहत्या ठिकाणी, परदेशात आपल्या संस्कृतीची पाळे मुळे रुजवली आहेत. हिंदू धर्मात अनेक देवी देवता आणि त्यांच्याशी संबंधित प्रार्थना, आरती, स्तोत्र उपलब्ध आहेत. त्यामुळे एकत्र म्हणता यावी अशी प्रार्थना कोणती असा अनेकांना प्रश्न पडतो. 

काही जण विचारतात, जशी ख्रिस्त बांधव, जैन बांधव, मुस्लिम बांधव, शीख बांधव इ. धर्मियांची आपापल्या धर्मात एक प्रार्थना असते, जी त्यांच्या जगभरातील बांधवांना पाठ असते, तशी हिंदू धर्मात एखादी प्रार्थना नाही का? तर त्याचे उत्तर - अशी समस्त हिंदूंसाठीदेखील एक प्रार्थना आहे. ती प्रार्थना वैदिक काळापासून म्हटली जात आहे आणि ती सर्वांना पाठ देखील आहे. फक्त तिचे उच्चारण नीट व्हावे अशी अपेक्षा असते, ते होत नाही आणि त्याचा अर्थ समजून घेतला जात नाही. चला, जाणून घेऊ ती प्रार्थना व तिचा अर्थ... 

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तनि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा: ॥

अर्थ : फार पूर्वीच्या काळात मूर्ती पूजा नाही तर यज्ञ कर्म हे उपासनेचे प्रकार होते. स्वर्गस्थित परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी यज्ञ हा एकमेव मार्ग समजला जात असे आणि तोच धार्मिक विधींचाही एक भाग होता. 

ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने।
नमो वयं वैश्रवणाय कुर्महे।
स मस कामान् काम कामाय मह्यं।
कामेश्र्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय।
महाराजाय नम: ।

अर्थ : चरितार्थासाठी अर्थार्जन महत्त्वाचे. त्यासाठी भगवान कुबेर यांची प्रार्थना करत आहोत. त्यांनी सर्वांची इच्छा पूर्ण करून सर्वांना समाधानी ठेवावे. 

ॐ स्वस्ति, साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं
वैराज्यं पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं ।
समन्तपर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुषः आन्तादापरार्धात् ।
पृथीव्यै समुद्रपर्यंताया एकरा‌ळ इति ॥

अर्थ : आपले राज्य सर्वांसाठी कल्याणकारी राज्य होवो. आमचे राज्य सर्व उपभोग्य वस्तूंनी परिपूर्ण होवो. इथे लोकशाही राज्य असू दे. आमचे राज्य आसक्तीमुक्त, लोभमुक्त होवो. खुद्द परमेश्वराने या विश्वाची सूत्रे सांभाळून सर्वत्र सुव्यवस्था संस्थापित करावीत. क्षितिजापल्याड या राज्याच्या सीमांचा विस्तार होवो. सर्वांना दीर्घायुष्य लाभो आणि सुखी, समाधानी जीवन जगण्याचा अधिकार मिळ. 

ॐ तदप्येषः श्लोकोभिगीतो।
मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसन् गृहे।
आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ॥
॥ मंत्रपुष्पांजली समर्पयामि ॥

अर्थ : हा श्लोक राज्याच्या हितासाठी आणि राज्याचा गौरव गाण्यासाठी गायला गेला आहे. अशा सुंदर सृष्टीचा, राष्ट्राचा सभासद होण्याचे भाग्य मला मिळो. 

किती सुंदर प्रार्थना आहे ही. कोणा एकासाठी नाही, तर समष्टीसाठी! आरती झाल्यावर आपण सगळेच ही मंत्रपुष्पांजली म्हणतो, परंतु योग्य ठिकाणी करायचा न्यास, त्याचे उच्चार आणि त्याचा अर्थ समजून घेत नाही. तो आपण नीट शिकून घेतला पाहिजे आणि पुढच्या पिढीलाही शिकवला पाहिजे. जेणेकरून जगाच्या कानाकोपऱ्यातील समस्त हिंदू बांधव ही राष्ट्रीय प्रार्थना शिकून, समजून घेऊन म्हणू शकतील. 

Web Title: Do you remember the national prayer of Hindus all over the world? Know what it means!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.