देवपूजा आपण देवासाठी करतो की स्वतःसाठी? कवितेतून मिळेल एक छान उत्तर!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: February 4, 2021 08:00 AM2021-02-04T08:00:00+5:302021-02-04T08:00:12+5:30

देवासाठी आपण जे भक्तिभावाने करतो, तेच देवाला प्रिय असते.

Do we worship God for ourselves or for ourselves? A great answer from poetry! | देवपूजा आपण देवासाठी करतो की स्वतःसाठी? कवितेतून मिळेल एक छान उत्तर!

देवपूजा आपण देवासाठी करतो की स्वतःसाठी? कवितेतून मिळेल एक छान उत्तर!

googlenewsNext

आपण सगळेच जण रोज देवाची पूजा करतो. अगदी साग्रसंगीत नाही, पण किमान देवाचिये द्वारी उभा क्षणभरी अशी देवाची रोजची भेट होतेच. जेव्हा केव्हा फुरसत मिळते, तेव्हा मात्र अगदी मन भरेपर्यंत आपण स्वच्छता, पूजा अर्चा, धूप दीप, नैवेद्य दाखवून पूजा करतो आणि शेवटी 'आज देवालाही प्रसन्न वाटत असेल' असे मनोमन म्हणतो व सुखावतो. वास्तविक अशा देवपुजेने प्रसन्नता देवाला मिळते की आपल्याला? यावर कविवर्य मंगेश पाडगावकरांनी खूप छान कविता लिहिली आहे. त्या कवितेने आजच्या दिवसाची सकारात्मक सुरुवात करूया. 

"सा रं का ही    स्व तः सा ठी"

देवधर्म पूजाअर्चा
सारं असतं स्वतःसाठी
देवाला यातलं काही
नको असतं स्वतःसाठी

फूलं अर्पण करतो देवाला
ती काय त्याच्याकडे नाहीत म्हणून?
सारी पृथ्वीच ज्याचा बगिचा
त्याला काय करायचंय फुलं घेऊन?

नैवेद्य जो आपण दाखवतो
तो काय देव खातो?
तो तर स्वतःच प्राणीमात्रांचं
भरणपोषण करित असतो

निरांजनाच्या इवल्या ज्योतीने
ओवाळतो आपण प्रभूला
चंद्रसूर्य जातीने
हजर ज्याच्या दिमतीला

स्तोत्रं त्याची गातो ती काय
हपापलाय म्हणून स्तुतीला?
निर्गुण निराकार जो
त्याला अवडंबर हवंय कशाला?

सारं काही जे करायचं
ते स्वतःसाठीच असतं करायचं
प्रार्थनेनं देव बदलत नसतो
स्वतःच स्वतःला असतं सुधारायचं!
 

Web Title: Do we worship God for ourselves or for ourselves? A great answer from poetry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.