शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

अंधश्रद्दांना वैज्ञानिक आधार आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2020 4:12 PM

अंधश्रद्धांना काही वैज्ञानिक आधार आहे, का त्या केवळ मानवजातीची दिशाभूल करणार्‍या परंपरागत तर्कहीन श्रद्धा आहेत? सद्गुरु नाण्याच्या दोन्ही बाजूंवर चर्चा करतात.

सद्गुरु:अनेक लोकं नेहेमी भाग्यवान ग्रह, भाग्यवान तारे, भाग्यवान आकडे – यासारख्या अनेक गोष्टींच्या शोधात असतात. या शोधण्याच्या आणि गोष्टी घडून येण्याची वाट पाहण्याच्या प्रक्रियेत, ते स्वतः अगदी सहजगत्या निर्माण करू शकले असते , अशा अनेक गोष्टी ते पुर्णपणे गमावून बसतात. आयुष्याच्या प्रत्येक पैलूमधे, ते घडवून आणणारे तुम्हीच असले पाहिजे. तुमची शांतता आणि तुमची अशांतता ही तुमची जबाबदारी आहे. तुमचा आनंद आणि तुमचे दुखः ही तुमची जबाबदारी आहे. तुमच्यामधे असलेला देव आणि राक्षस ही तुमची जबाबदारी आहे. जेंव्हा तुम्ही योगायोगाने जीवन जगता, तेंव्हा तुम्ही भीती आणि चिंतेत जीवन जगता. जेंव्हा तुम्ही हेतुपूर्ण आणि सक्षम जीवन जगता, तेंव्हा काय घडते आहे किंवा काय घडत नाहीये याने काही फरक पडत नाही – किमान तुमच्यात जे काही घडते आहे ते तुमच्या नियंत्रणात असते. तसे जीवन अधिक स्थिर जीवन असते.काही वर्षांपूर्वी, माझ्या महितीतील एक महिला एका महत्वाच्या व्यावसायिक भेटीची तयारी करत होती. तामिळनाडुमधे अनेक लोकांची अशी श्रद्धा आहे की जेंव्हा तुम्ही सकाळी गाडी सुरू करता, तेंव्हा तुम्ही ती रिव्हर्स गियरमधे सुरू करू नये. नाहीतर तुमचे संपूर्ण आयुष्यच उलट्या दिशेने जाईल. म्हणून सकाळी ते कायमच थोडे पुढच्या दिशेला सरकतात. तर घराबाहेर पडण्यासाठी गाडी मागे घेण्याआधी तिला तिची गाडी थोडी पुढे घ्यायची होती. अतिशय चिंतातुर होऊन आणि घाबरून जाऊन, काही इंच गाडी पुढे घेण्याच्या प्रयत्नात, तिचा पाय क्लचवरुन निसटला आणि भिंतीला धडक मारून गाडी थेट बेडरुममधे शिरली!

योग्य प्रकारची परिस्थिती निर्माण होण्यासाठी आवश्यक ते आंतरिक आणि बाह्य वातावरण आपल्याभोवती निर्माण करण्याऐवजी, तसे घडवून आणण्यासाठी आपण कायमच भलत्याच गोष्टीकडे पहात असतो. तुमचा आजचा आंतरिक अनुभव कसा होता हे नक्कीच तुमच्या हातात आहे. तुम्ही कोणत्या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवता त्यावर ते अवलंबून नाही. हे फक्त तुम्ही तुमच्या भोवतालच्या जीवनाकडे किती संवेदनशीलतेने , हुशारीने आणि किती जाणीवपूर्वक पाहता यावर अवलंबून आहे.

तर मग या कशातच काही सत्य नाही का? तसे असणे गरजेचे नाही. त्यापैकी बहुतांश गोष्टींमागे एक वैज्ञानिक आधार आहे पण काळाच्या ओघात त्याचा विनाश झालेला आहे. पिढ्यानपिढ्या विज्ञानाने त्याचा मूळ आकार गमावला आहे आणि त्याने दुसरेच स्वरूप धारण केले आहे. त्या व्यतिरिक्त, आज, राजकीय आणि इतर प्रकारच्या वर्चस्वामुळे आपण या निष्कर्षापर्यंत पोचलो आहोत की एखादी गोष्ट पश्चिमेकडून आली असेल तर ते विज्ञान आहे, जर ती पूर्वेकडून आली असेल तर ती अंधश्रद्धा आहे.या संस्कृतीत उल्लेखल्या गेलेल्या अनेक गोष्टींचा शोध , संशोधनावर अब्जावधी डॉलर्सचा खर्च करून आज पुन्हा एकदा लावला जात आहे आणि त्याला मानवी स्वभावाविषयी अतिशय “महान” संशोधन असे म्हटले जात आहे. आपल्याला या गोष्टी नेहेमीच ठाऊक होत्या कारण ही संस्कृती जगण्याच्या सक्तीतून निर्माण झालेली नाही. ही एक अशी संस्कृती आहे जी संत आणि ऋषिमुनींनी जाणीवपूर्वक विकसित केलेली आहे. त्यामध्ये प्रचंड वैज्ञानिक मूल्य आहेत. अगदी तुम्ही बसावे कसे, उभे कसे राहावे आणि खावे कसे इथपासून प्रत्येक गोष्ट – मानवी कल्याणासाठी सर्वोत्तम काय आहे यानुसार संरचित करण्यात आली होती. दुर्दैवाने आपण आज पहात असलेली आध्यात्मिक संस्कृती अनेक आक्रमणांनी आणि अनेक शतके अस्तीत्वात असलेल्या गरिबीमुळे मोडकळीस आली आहे. तरीसुद्धा आध्यात्मिक प्रक्रियेची मूलभूत नीती नष्ट होत नाही किंवा नष्टही केली जाऊ शकत नाही. या प्राचीन परंपरेचे फायदे संपूर्णतः घेण्याची वेळ आता आलेली आहे.