प.पु. स्वामी गोविंद देवगिरी महाराजांनी अलीकडेच एका कार्यक्रमात ज्ञानेश्वरी बाबत खुलासा केला आहे, जो भागवत धर्मातील अनेक भाविकांना परिचायाचा असेलही! मात्र सर्वसामान्य लोकांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून १३ सप्टेंबर, ज्ञानेश्वर जयंतीचे औचित्य साधून 'ज्ञानेश्वरी' या ग्रंथांच्या मूळ नावाबद्दल जाणून घेऊ.
संत ज्ञानेश्वरांनी लिहिली म्हणून ती ज्ञानेश्वरी, असा जर तुमचा आजवरचा समज असेल तर तुम्ही चुकताय! कारण, ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथाला कधीही ज्ञानेश्वरी म्हटले नाही की ज्ञानदेवी म्हटले नाही, तर त्यांनी आपल्या ग्रंथाला नाव दिले होते - भावार्थदीपिका! श्रीकृष्णाने भगवद्गीतेत जसे सांगितले, तसे अनुवादन ज्ञानेश्वरांनी या ग्रंथात केले आहे. हा भावार्थ दीपाप्रमाणे आपले आयुष्य उजळून टाकणारा आहे.
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
१३ सप्टेंबर रोजी भाद्रपद कृष्ण षष्ठी आहे, ही तिथी श्री ज्ञानेश्वरी जयंती(Dnyaneshwari Jayanti 2025) म्हणून ओळखली जाते. भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींनी शके १२१२ अर्थात् इ. स.१२९०-९१ मध्ये श्रीक्षेत्र नेवासे येथील श्रीमोहिनीराजाच्या मंदिरात श्री ज्ञानेश्वरी प्रथम सांगितली. पण ती कोणत्या तिथीला लिहायला सुरवात केली व कोणत्या तिथीला पूर्ण केली हे इतिहासाला ज्ञात नाही.
ज्ञानेश्वरीमध्ये भाग्वद्गितेचे सार सोप्या शब्दात आणि उदाहरणांसह विस्तृत करून संगितले आहे. म्हणून संत नामदेव म्हणतात, 'एक तरी ओवी अनुभवावी!' म्हणजेच, केवळ वाचून विसरून जाऊ नका तर त्याचं चिंतन करा, अनुभूति घ्या अस ते सांगताहेत. नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी केला आहे, मग ज्ञानेश्वरी हा शब्द आला कुठून? तर....
महिला संत आणि नामदेवांची शिष्या जनाबाई यांनी भावार्थदीपिकेला 'ज्ञानेश्वरी' संबोधून या ग्रंथाचा गौरव केला. हा शब्द एवढा रूढ झाला की आता कोणीही भाविक भावार्थदीपिका असे न संबोधता ज्ञानेश्वरी असेच म्हणतात आणि भाद्रपद कृष्ण षष्ठीचा दिवस भावार्थदीपिका जयंती म्हणून साजरा न करता 'ज्ञानेश्वरी जयंती' म्हणून साजरा करतात.
ग्रंथांचीही जयंती साजरी करणारी आपली दिव्य संस्कृती खरोखरीच महान म्हटली पाहिजे, बरोबर ना?
{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/24289761684048666/}}}}