शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Diwali Astro 2024: दिवाळीत 'या' राशींना आहे राजयोगाची संधी; सोनेखरेदी करताना वाचा नियम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 13:20 IST

Diwali Astro 2024: दिवाळीत तीन राशींना राजयोगाची संधी आहे, त्या राशी कोणत्या आणि त्यांनी कोणते नियम पाळायचे ते जाणून घ्या. 

२४ ऑक्टोबर रोजी गुरुपुष्यामृत(Guru Pushyamrut Yoga 2024) योग आहे आणि २८ ऑक्टोबरपासून दिवाळीची(Diwali 2024) सुरुवात; त्यानिमित्ताने सोनेखरेदीचा विचार करत असाल तर कोणत्या राशींनी कोणती काळजी घ्यावी ते जाणून घ्या. 

ज्योतिषशास्त्रानुसार राशीनुसार धातू धारण केले तर ते विशेष फलदायी ठरतात. प्रत्येक धातूचे स्वतःचे महत्त्व आहे. राशीनुसार त्याचा वापर केल्याने व्यक्तिमत्वावर विशेष प्रभाव दिसून येतो. ज्योतिषशास्त्रात राशीनुसार सोने, चांदी, तांबे, कांस्य इत्यादी धातू धारण करण्याचा सल्ला दिला जातो. या सर्व धातूंचे वेगळे महत्त्व आहे. आज आपण सोन्याच्या वापराचे लाभ कोणत्या राशींना होणार ते जाणून घेणार आहोत. 

ज्योतिषशास्त्रात सोने धारण करण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत.सोन्याची अंगठी तर्जनीत घातली तर व्यक्तीची एकाग्रता वाढते. राजयोगात सोन्याची अंगठी देखील उपयुक्त मानली जाते. जर एखाद्या व्यक्तीला आपल्या व्यावहारिक कामात अडथळे जाणवत असतील तर अशा लोकांनी अनामिकेत सोन्याची अंगठी घालावी. अर्थात हा नियम सगळ्या राशीच्या लोकांना लागू होतो असे नाही, तर हा उपाय विशिष्ट राशींसाठी लाभदायक ठरतो. जाणून घेऊया त्या राशी!

पुढील राशींसाठी सोने विशेषतः फलदायी ठरते: 

सिंह : ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या लोकांसाठी सोने शुभ ठरते. भाग्योदयासाठी या लोकांना सोन्याच्या अंगठीचा वापर करा असा सल्ला दिला जातो.  ही राशी अग्नी तत्वाचे चिन्ह आहे आणि तिचा स्वामी सूर्य आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी सोने फायदेशीर ठरते. दिवाळीनिमित्ताने पुढील तीन राशींनी सोन्याच्या अंगठी खरेदीचा विचार नक्की करावा, लाभ होईल!

कन्या : ज्योतिषी मानतात की या राशीचे लोक विलासी जीवनाचे शौकीन असतात. आणि त्यांचा हा छंद पूर्ण करण्यासाठी त्यांना सोने परिधान करण्याचा सल्ला दिला जातो. हे लोक सोन्याच्या अंगठ्या, ब्रेसलेट किंवा साखळी घालू शकतात. या राशीच्या लोकांच्या कुंडलीत गुरु पाचव्या आणि सातव्या घराचा स्वामी असतो. अशा स्थितीत गुरूच्या शुभ प्रभावासाठी सोन्याचे अलंकार धारण करणे फायदेशीर ठरते.

तूळ : या राशीच्या लोकांनी सोन्याचा धातू धारण केल्यास त्यांचे नशीब पालटते. त्यांना विशेषतः सोन्याच्या अंगठ्या घालण्याचा सल्ला दिला जातो. या राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे त्यांनी सोन्याचा धातू धारण करावा. त्यांचे चित्त स्थिर राहून करिअरमध्ये प्रगती होते. 

याचा अर्थ इतर राशीच्या लोकांनी सोन्याचे अलंकार घालू नयेत असे नाही, मात्र आपल्या राशीला अनुकूल धातूचा केलेला वापर राजयोगासाठी कारक ठरू शकतो!

टॅग्स :Diwaliदिवाळी 2024Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य