शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

Diwali 2023: वसुबारसेला गाय-वासराच्या निमित्ताने माय-लेकाच्या नात्याची असते खरी पूजा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 07:00 IST

Diwali 2023: सण-उत्सवाचा आपल्या दैनंदिन जीवनाशी निकटचा संबंध असतो, संत नामदेवांच्या अभंगातून वसुबारस आणि माय-लेकराच्या नात्याचा परस्परसंबंध जाणून घेऊ. 

गाय आणि तिचे वासरू हे निर्व्याज प्रेमाचे प्रतीक मानले जाते. गाय वासरावर जे प्रेम करते, ते केवळ अनुपमेय असते, तसेच वत्साचे गायीवरचे प्रेम हे अनन्यसाधारण असते. दुसऱ्या कोणाला ते बधत नाही. ओळखत नाही. म्हणून देव-भक्त, आई-मूल, गुरु-शिष्य यामधील प्रेमसंबंधालाही आपली संतमंडळी नेहमी गाय-वासराच्या प्रेमाची उपमा देतात. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी नामदेवांची रचना घेऊन वर्णन केले आहे, 

तू माझी माऊली, मी तुझे वासरू,नको पान्हा चोरू, पांडुरंगे।धेनु चरे वनी, वत्स असे घरी, चित्त वत्सावरी, ठेवूनि फिरे।

अशी विठ्ठलाची मनधरणी केली आहे. यासारखे अनेक गोवत्स संदर्भ नामदेवांच्या अभंगात येत असतात. जनाबाईदेखील म्हणतात,

मी वत्स माझी गायी, न ये आता करू काई?मज पाडसाची माय, भक्ति वत्साची ते गाय।।

अशा शब्दात पांडुरंग आणि आपल्यामधील नात्याचे वर्णन केले आहे. ते गाय वासराच दृष्टांत देऊनच. तुकाराम महाराज म्हणतात, 

वत्स पळे धेनु, धावे पाठीलागी,प्रीतीचा तो अंगी, आविर्भाव।।

अशा शब्दात या नैसर्गिक, अकृत्रिम प्रेमाची थोरवी गायली आहे. ज्ञानदेवांच्या सदाप्रसन्न, तृप्त, शांत व्यक्तिमत्त्वाला वत्स-धेनू हा दृष्टांत अधिक आवडला नसता, तरच नवल. ज्ञानेश्वरीतील गाय वासराचे असंख्य संदर्भ नवनवीन रूपात आपल्या समोर येतात.

नाना गाय चरे डोंगरी, परि चित्त बांधिले वत्स घरी.वत्सावरूनि धेनूचे, स्नेह राना न वचे।

गाय डोंगरात चरत असते, पण तिचे सारे लक्ष गोठ्यातल्या वासरावर असते, त्याप्रमाणे स्थिरपुरुष देहाने फिरत असला तरीही त्याचे चित्त चंचल नसते, असा यथार्थ दृष्टांत ज्ञानदेव देतात. ज्ञानी भक्त आणि देव यांच्यामधील अद्वैत सांगताना वासरू जसे तनमनप्राणाने आपल्या आईलाच ओळखते, त्याच्या या अनन्यगतीमुळे गायीचीही त्याच्यावर तशीच अपार माया असते. तृप्त झाल्यावरही गाय आपल्यापासून दूर जाऊ नये, असे वासराला वाटत राहते. या प्रसंगाचे वर्णन ज्ञानोबा करतात,

वत्स धालया परी, धेनु न वचावी दुरी,अनन्य प्रीतीची परी, ऐसीच आहे।

देवांची स्थिती तरी गायींपेक्षा वेगळी कुठे होती?

अहो वासरू देखिलियाचि साठी, धेनु खडबडोनि मोहे उठी, मग स्नामुखाचिये भेटी, काय पान्हा न ये।।

वासराला पाहून गाय प्रेमाने पटकन उठून उभी राहते. तिला पान्हा फुटतो. तसाच भगवद्गीतेतील अर्जुन साक्षात कामधेनुच्या अर्थात भगवान श्रीकृष्णाच्या आश्रयाला आल्यावर, तो तरी ज्ञानामृत प्यायल्यावाचून कसा वंचित राहील? गीतेतील तत्वज्ञान केवळ अर्जुनसाठी नसून संपूर्ण मनुष्यसृष्टीसाठी आहे. म्हणून आपणही वासरू बनून गीतारुपी तत्वज्ञानाला शरण जावे. 

आई-लेकराचे नाते अतुल्य असते. आईला मुलांप्रती आणि मुलांना आाईप्रती वाटणारा जिव्हाळा इतर नात्यांमध्ये क्वचितच सापडू शकेल. म्हणून या नात्याचे प्रतीकात्मक रूप म्हणून गोवत्स द्वादशीला गायीची आणि तिच्या लेकराची पूजा करतात.

आपणही हे वात्सल्य, संस्कृती, आनंद जपुया आणि दिवाळीच्या शुभेच्छा  हॅपी दीपावली, न म्हणता शुभ दिवाळी म्हणत मराठमोळ्या पद्धतीने साजरी करूया.

टॅग्स :Diwaliदिवाळी 2023Diwali Ritualsदिवाळीतील पूजा विधीrelationshipरिलेशनशिप