शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

DIwali 2023: दिवाळी हा सण सर्वात आधी कोणी व कधी साजरा केला होता ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 12:35 IST

Diwali 2023: दिवाळी साजरा करण्याची परंपरा अनेक पिढ्यांपासून आहे हे आपण जाणतो, आज या सणाचा उगमही जाणून घेऊ. 

दिवाळी हा जेमतेम पाच दिवसांचा सण असला, तरी महिनाभर आधीपासून आपल्याला दिवाळीचे वेध लागतात. मात्र, दिवाळी सुरू झाली, की भरभर दिवस निघुन जातात. तरीदेखील या पाच दिवसात कमावलेला आनंद आपल्याला वर्षभर पुरतो. कार्तिक महिन्यातील त्रयोदशीपासून दिवाळीची सुरुवात होते. कार्तिक महिन्याच्या अमावस्येला मुख्य दिवाळी असते. तो दिवस लक्ष्मीपूजेचा असतो. वसुबारस ते भाऊबीज असा दिवाळीचा जल्लोष केला जातो. या सणांच्या निमित्ताने काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया आणि सणाचा आनंद द्विगुणीत करूया.

>> बलिप्रतिपदेच्या दिवशी भगवान विष्णुंनी बळी राजाला पाताळ लोकाचे स्वामीत्त्व बहाल केले होते. त्यामुळे देवेन्द्राची काळजी मिटली आणि स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ लोकावर सर्वात पहिल्यांदा दिवाळी साजरी करण्यात आली. 

>> दिवाळीच्या दरम्यान समुद्रमंथन सुरू असता, लक्ष्मी पाठोपाठ धन्वंतरी आणि कालिका माता प्रगट झाली होती, म्हणून बंगालमध्ये दिवाळीत कालिका मातेची पूजा करतात.

>> प्रभू रामचंद्र चौदा वर्षांचा वनवास संपवून आणि रावणासकट अन्य दुष्टांचा नायनाट करून परत आले, म्हणून समस्त अयोध्यावासियांनी थाटामाटात दिवाळी साजरी केली होती. 

>> भगवान श्रीकृष्णांनी नरकासूराचा वध केला, त्या आनंदात गोकुळात दीपोत्सव साजरा केला होता. त्या प्रसंगाची आठवण म्हणून आजही दिव्यांची आरास केली जाते.

>> गौतम बुद्धांच्या अनुयायांनी २५०० वर्षांपूर्वी त्यांच्या स्वागतासाठी लक्ष लक्ष दिवे लावून रोषणाई केली होती.

>> सम्राट विक्रमादित्याचा दिवाळीच्या मुहूर्तावर राजतिलक झाला होता.

>> इ.स. १५७७ मध्ये अमृतसरमधील स्वर्णमंदिराचा शिलान्यास केला होता.

>> दिवाळीच्या दिवसातच शिखांचे सहावे गुरु हरगोविंद सिंह यांना कारागृहातून मुक्त केले होते.

>> दिवाळीतील पाडव्याला नेपाळमधील बांधवाचे तसेच गुजराती लोकांचे नववर्ष सुरू होते.

>> भगवान महावीर स्वामींचे निर्वाण याचकालावधीत झाले होते.  जैन मंदिरांमध्ये हा दिवस निर्वाण दिवस म्हणून पाळला जातो.

>> गुप्तवंशीय राजा चंद्रगुप्त विक्रमादित्यने 'विक्रम संवत' स्थापन केले. धर्म, गणित, ज्योतिष तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने विक्रम संवत्सराचा मुहूर्त काढला होता.

>> याव्यतिरिक्त यमद्वितीयेला अर्थात भाऊबीजेला आपल्या भावाल अकाली मृत्यू येऊ नये, म्हणून बहीण भावाला ओवाळते, दीर्घायुष्याची प्रार्थना करते आणि त्याच्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी यमराजाला दीपदान करते. याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पूजेची सुरुवात करून मनुष्याला निसर्गाशी जोडले. 

अशी ही सणांची महाराणी दिवाळी, सर्वार्थाने महत्त्वाची आहे.

टॅग्स :Diwaliदिवाळी 2023Diwali Ritualsदिवाळीतील पूजा विधी