शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

Diwali 2021 : लक्ष्मीपतीची उपासना करा, लक्ष्मी आपोआप येईल घरा; कशी ते वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 16:06 IST

Diwali 2021 : जग लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी धडपडते. परंतु, लक्ष्मीलाही निःस्वार्थी भक्त हवे आहेत.

एके दिवशी वैकुंठात नारायण लक्ष्मी बोलत बसले असता लक्ष्मीने प्रश्न केला, `देवा, पृथ्वीवर तुमच्या भक्तांची संख्या जास्त, की माझ्या भक्तांची? मला तरी वाटते, की माझेच भक्त जास्त असतील' यावर नारायण म्हणाले, 'तुझे भक्त जास्त आहेत पण ते स्वार्थापोटी तुझी भक्ती करतात, पण माझे भक्त निःस्वार्थ असतात'. वाटल्यास आपण दोघेही पृथ्वीवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून येऊ.'लक्ष्मी म्हणाली, `देवा, तुम्ही पुढे व्हा आणि शास्त्री बुवांचे सोंग घेऊन एका खेड्यात प्रवेश करा. मी सुद्धा पाठोपाठ तुमची जोडीदार म्हणून वेषांतर करून येते.' दोघांनी वेषांतर केले. पृथ्वीवर आले. नारायणांनी धोतर नेसलेले असून, अंगावर उपरणे पांघरले होते. कपाळाला गंध लावले असून काखेत भागवताची पोथी घेतली होती. शास्त्रीबुवांनी एका खेडेगावात प्रवेश केला. त्यांनी एका श्रीमंताच्या दारात जाऊन घरमालकाला सांगितले, `मी शास्त्री आहे. मला चातुर्मासाात पुराण सांगण्याची इच्छा आहे. तेव्हा गावात जागेची कुठे सोय होईल?' श्रीमंताने उत्तर न देता, शास्त्रीबुवांना पिटाळून लावले. 

शास्त्रीबुवा प्रत्येक घराचे निरीक्षण करीत चालले होते. अर्धा दिवस फिरण्यात गेला. परंतु कोणीही त्यांची आपुलकीने चौकशी केली नाही. त्यावर त्यांनी वैकुंठात परतण्याचा विचार केला. तेवढ्यात बुवांना एक गृहस्थ दिसला. त्याची बायको, मुले घराचे छत कोसळून ठार झाली होती. दुकानाचेही दिवाळे निघाल्यामुळे तो दु:खी, कष्टी झाला होता. मन:शांतीच्या शोधात फिरत असताना, त्याला शास्रीबुवा नजरेस पडले. तो सगळे दु:ख विसरून बुवांना म्हणाला, `तुम्ही कोण, कुठले?' सगळी विचारपूस करून, गावभर दवंडी पिटवून त्याने गावातल्या नारायण मंदिरात बुवांची सोय लावून दिली. पुराण सुरू झाले. गावकरी येऊ लागले. देवळातली जागा अपुरी पडू लागली.

आता लक्ष्मी परीक्षा घेण्यासाठी वेषांतर करून गावात प्रगट झाली. तिने सगळी घरे धुंडाळली, परंतु सगळ्या दारांना कुलूप होते. मंडळी पुराण ऐकण्यासाठी गेली होती. लक्ष्मीला तहान लागली होती. ती नाईलाजाने देवळाकडे वळली. तेवढ्यात एका झोपडीत दिवा दिसला. तिथली एक आजी, गुडघेदुखीमुळे देवळात जाऊ शकली नाही. लक्ष्मीने आजीकडे पाणी मागितले. आजीने विचारपूस केली आणि पाण्याबरोबर दहीपोहेदेखील खायला दिले. लक्ष्मी पाहुणचार घेऊन निघून गेली. थोड्यावेळाने आजीची सून घरी आली. पाहते तर काय, पाण्याचा पेला सोन्याचा झाला होता.  आजीने घडलेली हकीकत सांगितली.

दुसऱ्या दिवशी लक्ष्मी पुन्हा येईल, या विचाराने सुनबाई पुराण ऐकायला न जाता, घरीच थांबली. म्हणता म्हणता गावभर ही वार्ता पसरली. लक्ष्मीची वाट बघत गावकरी देखील दाराकडे डोळे लावून बसले. लोकांचा स्वार्थ भाव पाहून लक्ष्मी खिन्न मनाने देवळाकडे वळली. तिथे शास्त्रीबुवांच्या रूपाने नारायण आणि त्यांची सोय लावून देणारा गृहस्थ एकटाच श्रोता म्हणून बसला होता. त्याला पाहता, लक्ष्मी आणि नारायण यांनी मनोमन स्पर्धेचा निकाल लावला. त्या गृहस्थाची निष्काम सेवा पाहून नारायणाने त्या आशीर्वाद आणि लक्ष्मीने त्याचे गतवैभव प्राप्त करून दिले. 

तात्पर्य हेच, की जग लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी धडपडते. परंतु, लक्ष्मीलाही निःस्वार्थी भक्त हवे आहेत. म्हणून ती विष्णूंच्या पाठोपाठ जाते. जिथे निःस्वार्थ सेवा असेल, तिथे ती आनंदाने राहते आणि आपसूक तिच्याबरोबर नारायणाचेही भक्तांना सान्निध्य लाभते. म्हणून लक्ष्मीपतीची उपासना करा, लक्ष्मी आपोआप येईल घरा!

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021