शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

Diwali 2020: शनि अमावस्येनिमित्त जाणून घ्या शनि महात्म्य आणि शनि महाराजांची उपासना!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: November 6, 2020 12:10 IST

Diwali 2020: शनी महाराज अत्यंत  शीघ्रकोपी आहेत असे म्हटले जाते. जी व्यक्ती चुकीचे काम करते त्याच्यावर कोणाचाही कोप होणे स्वाभाविक आहे, मग शनी महाराज त्यासाठी अपवाद कसे ठरतील? उलट जे लोक धैर्याने संकटांना सामोरे जातात, त्यांना शनी महाराजांची कृपादृष्टी लाभते.

ज्योत्स्ना गाडगीळ 

'श' म्हणजे शांती आणि `नि' म्हणजे निश्चय देणारी देवता म्हणजे शनी! १४ नोव्हेंबर रोजी म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शनि अमावस्या आहे. त्यादिवशी पुरुषांनीच काय, तर स्त्रियांनीही शनिदेवाचे दर्शन घ्यावे आणि त्यांचे गुण आत्मसात करावे. त्यासाठी नंदुरबारजवळील 'शनिमांडळ' ह्या तीर्थक्षेत्राची माहिती व तत्पूर्वी शनि महाराजांचा एका वेगळ्या दृष्टीकोनातून अल्पपरिचय...!

ज्या शनिमहाराजांना आपण बघायलाही घाबरतो, त्यांना खगोलशास्त्राने सर्वात मनोहारी ग्रह असल्याचे म्हटले आहे.  ह्या ग्रहाभोवती असलेली कडी अतिशय नेत्रदीपक आहे, असे म्हणतात. म्हणजेच काय, तर त्यांच्याकडे बघण्याची आपली दृष्टी बदलणे गरजेचे आहे.

हेही वाचा : एकमुखाने बोला, बोला जय जय हनुमान. 

सूर्यदेवाचे पुत्र, यमदेवाचे ज्येष्ठ बंधू आणि वायुपुत्र हनुमंताचे जिवलग मित्र असलेले शनिदेव, त्यांचे वर्णन करताना महर्षी वेदव्यासांनी नवग्रह स्तोत्रात म्हटले आहे -

नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजमछायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम।।

'शनी' हा ग्रह नवग्रहांमध्ये सर्वश्रेष्ठ असल्याचे म्हटले जाते. मात्र, त्यांच्याबद्दलचा लोकांचा `ग्रह' आजतागायत शुद्ध झालेला नाही, उलटपक्षी ते आपल्या राशीला येऊ नयेत म्हणून सगळे `आग्रही' असतात. एखाद्याला रावाचा रंक, तर एखाद्याला रंकाचा राव बनवण्याची किमया त्यांच्याकडे आहे. ते कठोर शासनकर्ते आहेत. म्हणून, जे लोक दुष्कृत्य करतात, ते त्यांना बाचकून असतात. मात्र ज्या व्यक्तीचे आचरण शुद्ध असते, अशा व्यक्तींनी शनी महाराजांची भीती बाळगण्याचे अजिबात कारण नाही. मनुष्याला शिस्त लागावी म्हणून साडेसातीच्या काळात ते कठोरपणे वागतात, पण ती व्यक्ती सुधारली तर तिचा उद्धारही करतात.

रामायणात राम-सीतेला जो वनवास घडला तो शनीच्या साडेसातीमुळे, रावणाचा पराभव झाला, तो शनीची वक्रदृष्टी झाल्यामुळे, कृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा आळ आला, राजा हरिश्चंद्र आणि तारामतीलाही शनिपीडा सहन करावी लागली. इतकेच काय, तर शनी महाराजांचे जन्मत: सावळे रूप पाहून ते आपले अपत्य असूच शकत नाही, असे म्हणत आपल्या बायकोच्या चारित्र्यावर शंका घेणाऱ्या सूर्यदेवालाही अर्थातच आपल्या जन्मदात्या पित्यालाही माफ केले नाही, तर आपली काय कथा? 

शनि महाराजांनी कावळ्याला आपले वाहन निवडले, कारण कावळ्याकडे अतिशय सूक्ष्म नजर असते, तो घाण स्वच्छ करतो. समाजातील अनैतिकतेची, अंधश्रद्धेची, असमानतेची घाण स्वच्छ करण्यासाठी शनी महाराज कावळ्यावर स्वार झाले आहेत.

शनी महाराज अत्यंत  शीघ्रकोपी आहेत असे म्हटले जाते. जी व्यक्ती चुकीचे काम करते त्याच्यावर कोणाचाही कोप होणे स्वाभाविक आहे, मग शनी महाराज त्यासाठी अपवाद कसे ठरतील? उलट जे लोक धैर्याने संकटांना सामोरे जातात, त्यांना शनी महाराजांची कृपादृष्टी लाभते. हेच सांगणारी विक्रमादित्य राजाची पौराणिक कथा आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे. त्याच्या कठोर परिश्रमांना पाहून शनी महाराजांनी त्याची ज्या ठिकाणी साडेसातीतून मुक्तता केली, ते ठिकाण म्हणजे नंदुरबार येथील `शनिमांडळ'. ते स्थान शनी साडेसाती मुक्तीस्थान म्हणूनही ओळखले जाते.  या तीर्थक्षेत्री स्त्रियांनाही दर्शन घेण्याची परवानगी आहे. त्यामुळे असंख्य भाविक शनी महाराजांच्या दर्शनाला तिथे पोहोचतात. भक्तिभावाने शरण गेलेल्या भक्ताला शनी महाराजांची कृपादृष्टी लाभते, असा आजवरचा भक्तांचा अनुभव आहे, असे तिथल्या मंदिराचे मुख्य पुजारी देवेंद्र पांढरकर सांगतात. (संपर्क: ९४२१६१८८३९)

पाषाण स्वरूपात शनिदेवाची मूर्ती आहे. त्याव्यतिरिक्त राजा विक्रम, त्याच्या दोन्ही पत्नी, एक परिचारिका, तेलिकन्या आणि राजा विक्रमादित्याच्या खांद्यावर विराजमान झालेले शनिमहाराज अशी सुबक मूर्तीही तिथे बघायला मिळते. शिवाय तिथे महादेवाचे मंदिर आणि कालभैरवाची मूर्तीही आहे. या तीर्थक्षेत्री अनेक धार्मिक विधी चालतात. वर्षाच्या १२ अमावास्यांना महाअभिषेक असतो.  

त्यांची निष्काम मनाने भक्ती करणाऱ्याला आणि शुद्ध आचरण ठेवून आपले काम चोखपणे करणाऱ्या व्यक्तीला शनि महाराजांची कृपादृष्टी लाभते, अशी ग्वाही शनिस्तोत्रात आढळते.

सूर्य पुत्रो दीर्घ देहो विशालाक्ष: शिवप्रिय:।मन्दचार: प्रसन्नात्मा पीडां हरतु मे शनि:।।

शनि महाराज की जय!! 

हेही वाचा : कोणतीही गोष्ट अशक्य नसते, ती प्रयत्नपूर्वक शक्य करावी लागते - गौर गोपाल दास

टॅग्स :Diwaliदिवाळी