शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Dhanteras 2024: धनत्रयोदशीवर राहूची नजर; 'या' दोन तासांत खरेदी टाळा; जाणून घ्या शुभ मुहूर्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 13:20 IST

Dhanteras 2024: आपल्या संपत्तीत भर पडावी म्हणून धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर करतात खरेदी, परंतु राहू मुळे घ्या दिलेली काळजी!

कार्तिक कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी आपण साजरी करतो. यावर्षी धनत्रयोदशी (Dhanteras 2024) २९ ऑक्टोबरला आहे.  या दिवशी भगवान धन्वंतरी, मृत्यूचे स्वामी यमराज आणि कुबेर यांची पूजा करण्याची परंपरा आहे. ही तिथी धन्वतरी जयंती म्हणूनही साजरी केली जाते. धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला आणि समुद्र मंथनातून ते सोन्याचा कलश घेऊन प्रगट झाले आणि त्यांना आरोग्य, धन संपदेचे वरदान मिळाले, म्हणून या तिथीला अनेक जण खरेदी करतात. संपत्तीत वाढ व्हावी हा त्यामागचा हेतू असतो. 

मात्र यंदा धनत्रयोदशी दरम्यान राहूकाळ सुरु होणार आहे, जो खरेदीच्या दृष्टीने अशुभ मानला जातो. त्यामुळे शास्त्रानुसार या काळात केलेल्या खरेदीचा लाभ होणार नाही. मात्र धनत्रयोदशीला सोने, चांदी, भांडी इत्यादी खरेदी करण्याचा बेत असेल तर शुभ-अशुभाचा मेळ कसा बसवायचा ते जाणून घेऊ. 

त्रयोदशी तिथीची सुरुवात: २९ ऑक्टोबर, सकाळी १०:३२ पासून

त्रयोदशीची समाप्ती तारीख: ३० ऑक्टोबर, दुपारी १:१६ पर्यंत 

राहू काळ : २९ ऑक्टोबर रोजी दुपारी २. ५२ मिनिटांपासून संध्याकाळी ४.२२ मिनिटांपर्यंत असेल. 

राहू काळात मौल्यवान वस्तूंची खरेदी टाळा, मग खरेदीसाठी शुभ मुहूर्त कोणता, तेही जाणून घ्या!

धनत्रयोदशीला खरेदीसाठी शुभ मुहूर्त

पहिला मुहूर्त :  धनत्रयोदशीच्या दिवशी त्रिपुष्कर योग तयार होत आहे, या योगात खरेदी करणे शुभ मानले जाते. हा योग सकाळी ६:३२ पासून सुरू होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी १०:३० वाजेपर्यंत चालू राहील. या योगात खरेदी केल्यावरत्याचे महत्त्व तिप्पट वाढते. 

दुसरा मुहूर्त : धनत्रयोदशीच्या दिवशी अभिजात शुभ मुहूर्त जुळून येत आहे आणि या काळात खरेदी केल्याने संपत्ती आणि समृद्धी मिळते. तसेच माता लक्ष्मी प्रसन्न राहते. हा मुहूर्त २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:४२ ते दुपारी १२:२७ पर्यंत असेल, ज्या दरम्यान तुम्ही खरेदी करू शकता.

तिसरा मुहूर्त : हा शुभ काळ संध्याकाळी ०६:३६ ते सकाळी ०८:३२ पर्यंत असेल जो प्रदोष काळा धरला जाईल.. यापैकी हा मुहूर्त सर्वोत्तम आणि शुभ मानला जातो.

त्रयोदशी तिथीची सुरुवात: २९ ऑक्टोबर, सकाळी १०:३२ पासून

त्रयोदशीची समाप्ती तारीख: ३० ऑक्टोबर, दुपारी १:१६

उदय तिथीनुसार, धनत्रयोदशीचा सण मंगळवार २९ ऑक्टोबर २०२४ रोजी साजरा केला जाईल.

टॅग्स :Diwaliदिवाळी 2024Diwali Ritualsदिवाळीतील पूजा विधीAstrologyफलज्योतिष