शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
4
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
5
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
6
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
7
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
8
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
9
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
10
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
11
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
12
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
13
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
14
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
15
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
16
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
17
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
18
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
19
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
20
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला मुलांना औक्षण करण्यामागे आहे 'ही' कृष्णकथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 11:57 IST

Deep Amavasya 2025 Aukshan: २४ जुलै रोजी दीप अमावास्या आहे, त्या दिवशी दिव्यांचे पूजन आणि घरातील लहान मुलांना औक्षण का केले जाते ते जाणून घ्या.

आषाढापासून कार्तिक मासापर्यंत प्रत्येक दिवस हा उत्सवासारखा साजरा केला जातो. प्रत्येक दिवसाचे महत्त्वही वेगवेगळे आहे. अगदी अमावस्येचे महत्त्वही धर्मशास्त्राने अधोरेखित केले आहे. जसे की आषाढ अमावस्या(Ashadh Amavaysa 2025). हा दिवस 'दिव्याची आवस(Deep Amavasya 2025)अशा नावानेही ओळखला जातो. या दिवशी घरातील लहान मुलांना दिव्याने ओवाळले (Aukshan) जाते. का, कशासाठी ते पाहू...

भारतीय संस्कृतीमध्ये दिवा, ज्योती, फुलवात, वात यांना फार महत्त्वाचे स्थान आहे. प्राणाला `प्राणज्योत' म्हणतात. घरातील मुलांना `वंशाचे दिवे' म्हणातात, इतका हा दीप मानवाशी निगडित झालेला आहे. 

Deep Amavasya 2025: दीप पूजन शास्त्रोक्त विधीने कसे करावे आणि दिव्यांची कोणती आरती म्हणावी जाणून घ्या

दीप म्हणजे काय, तर प्रकाश! जेथे प्रकाश असतो, तेथून अंधाराला काढता पाय घ्यावाच लागतो. अंधार म्हणजे काय? तर संकट आणि दीप म्हणजे काय, तर तेज! जिथे तेज असते, तिथे संकटही घाबरून पळते. असे दिव्याचे तेज आपल्या मुलांना मिळावे व हर तऱ्हेच्या संकटांवर मात करण्याची त्यांना शक्ती मिळावी, यासाठी आषाढ अमावस्येला घरातील लहान मुलांना दीव्याने ओवाळले जाते. आजची मुले ही भविष्यातील जबाबदार नागरिक असतात. त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत, यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला हा संस्कारविधी आहे. या विधीचा संबंध थेट कृष्णकथेत सापडतो.

Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला एक दिवा पितरांसाठी ठेवायला विसरू नका, कारण...

यमुनेच्या तीरावर दररोज गाई गुरे मृत्यूमुखी पडत होती. तेव्हा यमुनेत लपून बसलेला कालिया नाग हे कृत्य करत असल्याचे बाळकृष्णाला कळले. त्याने यमुनेत उडी टाकून कालियामर्दन केले आणि त्याच्यावर स्वार होऊन, त्याला वश करून बासरी वादन करत गोकुळवासियांना भयमुक्त केले. म्हणून यशोदेसकट सर्व सुवासिनींनी गोपाळकृष्णाची दीव्यांनी आरती ओवाळली आणि त्याच्यासारखे तेज, धैर्य, शौर्य आमच्याही मुलांना मिळू देत अशी प्रार्थना केली. तेव्हापासून ही प्रथा सुरू आहे. हा प्रसंग आषाढ अमावस्येला घडल्याने व त्या दीवशी दीव्यांनी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्यांची  आवस अशी ओळख मिळाली. यासाठीच श्रावणात जिवती पूजनाच्या प्रतिमेतही गोपाळकृष्णाची मूर्ती पहायला मिळते व तिचे मनोभावे पूजन केले जाते.

Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...

चला, तर आपणही आपल्या घरातील लेकरांना, तसेच त्यांच्या मित्रपरिवाराला दीव्यांनी ओवाळून त्यांना दीव्याचे तेज लाभू देत अशी प्रार्थना करूया आणि त्यांच्याही मनात संस्कृतीचे दीप प्रज्वलित करूया.

टॅग्स :Puja Vidhiपूजा विधीShravan Specialश्रावण स्पेशलIndian Festivalsभारतीय उत्सव-सणTraditional Ritualsपारंपारिक विधी