शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

Deep Amavasya 2024: गटारी असा शब्द नाही की सणही नाही; आषाढ आमवस्येला असते फक्त दिव्यांची आवस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 14:51 IST

Deep Amavasya 2024: आषाढ आमवस्येला दीप पूजन करून संस्कृतीरक्षक बनायचे की गटारी साजरी करून संस्कृतीभक्षक बनायचे, ते तुम्हीच ठरवा!

दिनदर्शिके केशरी रंगाने भरलेल्या रकान्यांचे दर्शन घडले, की मनाला उभारी येते. कारण सर्व महिन्यांचा राजा श्रावण याच्या आगमनाचे, व्रत वैकल्याचे, आनंद-उत्सवाचे ते चिन्ह असते. अशा या श्रावण मासाच्या पूर्वसंध्येची सुंदर ओळख आपल्या संस्कृतीने करून दिली आहे, ती म्हणजे 'दीप अमावस्या.' तिलाच आपण दिव्यांची आवस असेही म्हणतो. मात्र काही समाजकंटंकांनी तिला 'गटारी' अशी ओळख देऊन संस्कृतीला बट्टा लावला आहे. यंदा दीप अमावस्या सोमवारी ४ ऑगस्ट रोजी आहे. 

श्रावण मासात विविध सण उत्सवांची रेलचेल असल्यामुळे सबंध महिनाभर अनेक जण मांसाहार आणि मद्यपान वर्ज्य करतात. सणाचे पावित्र्य राखावे, यासाठी धर्मशास्त्राने मानवी मनावर घातलेले हे बंधन आहे. परंतु, याचा अर्थ असा नाही, की महिनाभर जे खायचं - प्यायचं नाही, ते महिना सुरू व्हायच्या आदल्या दिवशी चापून घ्यायचं! डॉक्टर जेव्हा पथ्य म्हणून दिवसातून एकवेळ जेवा असे सांगतात, त्याचा अर्थ असतो आहारावर नियंत्रण आणा. मात्र आपण आपल्या सोयीने दोन्ही वेळचे जेवण एकाच वेळी ताटात वाढून घेणार असू, तर त्या पथ्याचा उपयोग तरी काय? हाच नियम धर्मसंस्कृतीने मानवी मनावर घालण्यासाठी निदान महिनाभरासाठी शाकाहार करा असे सुचवले आहे. 

घरातल्या गृहिणींमुळे तरी शाकाहाराचे व्रत पाळले जाते, परंतु मद्यपींना पिण्यासाठी कोणतेही निमित्त चालते. ते आनंद झाला म्हणून पितात, दु:खं झाले म्हणूनही पितात. अशात एक महिनाभर व्रतस्थ राहायचे, म्हणजे महिन्याभराचा कोटा पूर्ण करण्याचे आयते निमित्त चालून आल्यासारखे आहे. अशा मूठभर लोकांनी आषाढ अमावस्येला 'गटारी' घोषित करून शब्दश: गटारात लोळण्याचा जणू परवानाच मिळवला आहे. 

मात्र, हे असे वागणे म्हणजे आपणच हाती राखून आपल्या संस्कृतीचे वाभाडे काढण्यासारखे आहे. आपली संस्कृती आपल्याला आयुष्याच्या उत्कर्षाचे धडे देते. आषाढ अमावस्येला (Aashadh Amavasya 2024) चंद्राची अनुपस्थिती असली म्हणून काय झाले? श्रावण मासाच्या स्वागतासाठी शेकडो दिव्यांचा प्रकाश ती उणीव पूर्ण करेल अशी खात्री देते. हा आपल्या आयुष्यासाठी केवढा मोठा गूढ संदेश आहे, की जेव्हा आपल्याही आयुष्यात काळोखाचे साम्राज्य पसरते, तेव्हा उदास न होता पणतीच्या ज्योतीने का होईना तो दिवस साजरा करावा, तरच आपल्याही आयुष्यात श्रावण नक्कीच येईल.

अशा उदात्त विचारांनी युक्त असलेल्या आपल्या संस्कृतीला गालबोट लागणार नाही, याची खबरदारी घेणे, ही आपली जबाबदारी आहे. म्हणून उद्या कोणी तुम्हाला विचारले की, ' यंदा गटारीला काय विशेष?' तर त्यांना खडसावून सांगा, 'त्या दिवशी दिव्यांची आवस (Deep Amavasya 2024)आहे, गटारी नव्हे!' या दिवशी घरातले दिवे उजळून त्याची पूजा करायची असते तसेच दिव्याचे तेज आपल्या कुलदीपकाला म्हणजेच मुलांना लाभावे म्हणून दिव्याने ओवाळले जाते. 

अशा रीतीने आपण आपल्या धर्माची, परंपरांची, नीती मूल्यांची जपणूक करणे गरजेचे आहे. आज आपण जे वागणार आहोत, त्याचे अनुकरण उद्याची पिढी करणार आहे. त्यांच्यासमोर योग्य तोच आदर्श ठेवला पाहिजे. शेवटी म्हणतात ना, 'धर्मो रक्षति रक्षित:' अर्थात जो धर्माचे रक्षण करतो, त्याचे रक्षण धर्म करतो! चला तर, आपणही धर्मरक्षक बनुया!

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३