शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

चिरतारुण्य आणि सुदृढ आरोग्य देणारा च्यवनप्राश 'च्यवन' ऋषींच्या नावावरून ओळखला जाऊ लागला; वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 13:53 IST

हिवाळ्यात च्यवनप्राशचे सेवन आपण करतो, त्याबरोबर जाणून घ्या त्याच्या उगमाची कथा!

फार पूर्वी शर्याति नावाचा राजा होता. त्याला अनेक अपत्ये होती. तो प्रजाहितदक्ष राजा होताच, शिवाय तो कुटुंबवत्सलदेखील होता. आपला राज्यकारभार सांभाळून तो आपल्या कुटुंबाला वेळ देत असे. एकदा सहपरिवार राना वनाचा फेरफटका करत असताना राजा राणी बोलत बसले. त्यांची मुले वयाने मोठी होती, शूर होती. ती इतरत्र फिरत होती. 

असाच फेरफटका मारत असताना राजकुमारी सुकन्या हिच्या हातून एका मातीच्या ढीगाला दगड लागला आणि त्यातून रक्त वाहू लागले. ती घाबरली. तो मातीचा ढीग नसून त्यात कोणाचा तरी मानवी देह आहे, याची तिला कल्पना आली. तिने तत्काळ ओरडून आपल्या आई वडिलांना आणि भावंडांना तिथे बोलावून घेतले. रक्त थांबत नव्हते. 

राजाने पुढाकार घेऊन मातीचा थर दूर केला. तर त्या ढीगाखाली च्यवन नावाचे थोर तपस्वी तपश्चर्या करत बसले होते. राजकुमारी सुकन्याच्या हातून चुकून लागलेल्या दगडामुळे त्यांचा डोळा जखमी झाला आणि त्यातून रक्त वाहू लागले. 

राजाने तत्काळ आपल्या राज्यातून राजवैद्यांना बोलावून घेतले. ऋषींची मलमपट्टी केली. परंतु, राजवैद्यांच्या सांगण्यानुसार च्यवन ऋषींनी आपली दृष्टी गमावली होती.

हे वृत्त कळल्यावर राजकुमारी सुकन्येला अपराधी वाटू लागले. ऋषींनी क्षमा केली, तरी तिला तिच्या चुकीचे प्रायश्चित्त करून घ्यायचे होते. ती आपल्या वडिलांना म्हणाली, `पिताश्री, माझ्यामुळे ऋषींची दृष्टी गेली, आता मीच त्यांचे नेत्र होईन. अर्थात मी त्यांच्याशी विवाह करून त्यांचा सांभाळ करीन.'

दोघांच्या वयातील तफावत पाहता राजाने तिला अडवले, परंतु तिने आपलेच म्हणणे पुढे रेटले. राजाने च्यवन ऋषींशी राजकन्येचा विवाह लावून दिला. च्यवन ऋषींची तपश्चर्या पाहून देवतांनी त्यांना वरदान दिले आणि आयुर्वेदीक औषधे दिली, ज्यामुळे च्यवन ऋषींना तारुण्य प्राप्त झाले आणि सर्व देवतांच्या आशीर्वादाने ऋषींनी पुढे राजकन्येसोबत सुखाने संसार केला.