शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

Chaturmas 2025: चातुर्मासात लग्न, मुंज, वास्तुशांतीसारखी शुभ कार्य का टाळली जातात? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 12:38 IST

Chaturmas 2025: चातुर्मास सुरू झाला की शुभ कार्य खोळंबल्याने अनेकांचा विरस होतो, पण तसे का केले जाते, हे जाणून घ्या.

आषाढी एकादशीपासून चतुर्मास सुरू होतो.  यंदा ६ जुलैपासून चातुर्मास(Chaturmas 205) सुरू झाला आहे. या चार महिन्यात देव विश्रांती घेतात अशी भक्तांची श्रद्धा असते. या काळात मंगलकार्ये केली जात नाहीत. देवाच्या अनुपस्थितीत मंगलकार्ये करू नये, हा भोळा आणि सच्चा भाव त्यामागे असतो. तरीदेखील पाऊस पाणी पुरेसे आल्यामुळे सर्वत्र सुबत्ता नांदते. उत्साहाचे आणि उत्सवाचे वातावरण असते. त्या उत्साहाला दिशा मिळावी म्हणून नानाविध व्रतांची आखणी चतुर्मासात केलेली दिसते. त्याची सुरुवात होते गोंविदशयन व्रतापासून...

Guru Purnima 2025: गुरु पौर्णिमेपासून चातुर्मासात दर गुरुवारी करा 'हे' उपाय; धनसंपत्ती मिळेल अपार!

गोविंदशयन व्रत अर्थात देवशयनी एकादशीपासून देव चार महिने झोपी जातात, म्हणून देवाची व्यवस्था लावून देणारे व्रत. आजकाल हे व्रत घरोघरी केले जात नाही, परंतु पूर्वी घरातील ज्येष्ठ मंडळी विष्णूंच्या मूर्तीला देव्हाऱ्यात छोटीशी शेज रचून निजवत असत. ज्यांना हे व्रत करणे शक्य आहे, त्यांनी आषाढी एकादशीला व्रताला आरंभ करावा. चार महिन्यांचे हे व्रत वैष्णव संप्रदायातील बरीच मंडळी वैयक्तिक रीतीनेही करतात. प्रामुख्याने ते विष्णुमंदिरात केले जाते. आषाढ शुक्ल एकादशीला पूजेतील विष्णूमूर्ती शय्येवर निजवावी. त्यानंतर कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत चार महिने विवाह, मुंज, नवीन घरातील प्रवेश अशी कोणतीही मंगलकार्ये केली जात नाहीत.

गुजराती वैष्णव बांधवामंध्ये इतर वेळीही देवाला रात्री पडदा लावून विश्रांती देतात. या व्रतामागे केवळ भोळा भक्तीभाव आहे. आपल्याला जशी विश्रांतीची गरज असते, तशी विश्वाचा पसारा सांभाळणाऱ्या देवालाही विश्रांती मिळावी हा भाग त्यामागे असतो. यालाच गोविंदशयन व्रत म्हणतात. त्याबरोबरीने चतुर्मासात आणखीही अनेक व्रते दिलेली आहेत, त्याचा आरंभ आषाढी एकादशीपासून होतो. 

Chaturmas 2025: फक्त २ मिनिटात म्हणून होणारे 'हे' स्तोत्र चातुर्मासात देईल बक्कळ लाभ!

आजही चातुर्मासात बहुसंख्य मंडळी काटेकोरपणे सर्व प्रथा सांभाळताना दिसतात. वास्तविक पूर्वीच्या काळी पावसाळ्यात दळणवळणाचे सर्व मार्ग बंद होत असत. प्रवास करणे अतिशय त्रासदायक व धोकादायक ठरत असे. शिवाय आपला देश कृषिप्रधान असल्यामुळे हे चार महिने शेतीची कामे करण्याची धांदल उडत असे. त्या कामातून सवड काढून लग्नकार्याला जाणे कोणालाच शक्य होत नसे. म्हणून हे चार महिने माणसांच्या सर्व शुभकार्यांसाठी निषिद्ध ठरवले गेले. तर देवकार्यासाठी, धर्मकार्यासाठी उत्तम मानले गेले. त्यामुळे श्रावणात व्रत वैकल्ये सांगितली गेली. 

Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!

आषाढीच्या वारीनंतर प्रवास टाळण्याकडे सर्वांचा कल असला तरी घरी राहून, गावातल्या देवळात, शेजारीपाजारी व्रत, सण, उत्सव साजरे करणे सोयीचे असल्याने नागपंचमी, गोकुळाष्टमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, बैलपोळा, पिठोरी अमावस्या हे सारे सणवार हौसेने केले जाऊ लागले. गणपतीच्या आगमनाच्या काळी नांगरणी, पेरणी ही मुख्य कामे पूर्ण झालेली असतात. पाऊसपाणी चांगले झाल्याने सणाला उत्सवाचे रूप येते. या साऱ्या गोष्टींचा विचार करून धर्माची आपल्या जीवनाशी, व्रत वैकल्यांशी घातलेली सांगड मन थक्क करणारी तसेच आनंददायी, अभिमानास्पद आहे, यात शंका नाही.

टॅग्स :chaturmasचातुर्मासIndian Festivalsभारतीय उत्सव-सण