Chaturmas Last Ashwin Sankashti Chaturthi October 2025: नवरात्रोत्सव, दसरा, अश्विन कोजागरी नवान्न पौर्णिमा झाल्यानंतर अश्विन कृष्ण चतुर्थीला संकष्ट चतुर्थी आहे. प्रत्येक मराठी महिन्यातील वद्य चतुर्थी संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. आषाढी शुद्ध एकादशीला सुरू झालेला चातुर्मास कार्तिक शुद्ध एकादशीला संपतो. त्यामुळे अश्विन महिन्यातील संकष्ट चतुर्थीचातुर्मासातील शेवटची संकष्ट चतुर्थी मानली जाते. अश्विन संकष्ट चतुर्थीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता आणि काही शहरांमधील चंद्रोदय वेळ जाणून घेऊया...
संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे. गेली हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात अगदी निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. कोट्यवधी गणेश भक्त या दिवशी उपवास करतात. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे. यंदा, शुक्रवार, १० ऑक्टोबर २०२५ रोजी अश्विन संकष्ट चतुर्थी आहे. ॥ Ashwin Sankashti Chaturthi October 2025 Date ॥
दाशरथी करक चतुर्थी
अश्विन कृष्ण पक्षातील चतुर्थी दाशरथी चतुर्थी आणि करक चतुर्थी या नावानेही ओळखली जाते. दाशरथी चतुर्थीला दशरथ राजाचे स्मरण करून व्रत केले जाते. तर उत्तर भारतात या दिवशी करवा चौथ व्रत करण्याची परंपरा आहे. करवा चौथ व्रताला अतिशय महत्त्व असून, ते मोठ्या प्रमाणावर केले जाते. यासह संकष्ट चतुर्थीला गणपती पूजन करून बाप्पाचे शुभाशिर्वाद घेतले जातात. अश्विन महिन्याची संकष्ट चतुर्थी चातुर्मासातील शेवटची संकष्ट चतुर्थी आहे. यानंतर कार्तिक महिन्यातील एकादशीला चातुर्मासाची सांगता होत आहे. ॥ Ashwin Sankashti Chaturthi October 2025 Significance ॥
अश्विन संकष्ट चतुर्थी व्रत पूजन विधी
गणपती बाप्पा हे अबालवृद्धांचे आराध्य दैवत! संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकतो. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी, असे सांगितले जाते. ॥ Ashwin Sankashti Chaturthi 2025 Vrat Puja Vidhi In Marathi ॥
संकष्ट चतुर्थी चंद्रोदय झाल्यावर काय करावे?
रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. अगदीच शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावाने अथर्वशीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे. मात्र, चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये, असे म्हटले जाते. ॥ Ashwin Sankashti Chaturthi 2025 Chandrodaya Timing ॥
विविध शहरांतील चंद्रोदय वेळ
शहरांची नावे | चंद्रोदयाची वेळ |
मुंबई | रात्रौ ०८ वाजून ५३ मिनिटे |
ठाणे | रात्रौ ०८ वाजून ५२ मिनिटे |
पुणे | रात्रौ ०८ वाजून ५० मिनिटे |
रत्नागिरी | रात्रौ ०८ वाजून ५६ मिनिटे |
कोल्हापूर | रात्रौ ०८ वाजून ५३ मिनिटे |
सातारा | रात्रौ ०८ वाजून ५१ मिनिटे |
नाशिक | रात्रौ ०८ वाजून ४७ मिनिटे |
अहिल्यानगर | रात्रौ ०८ वाजून ४५ मिनिटे |
धुळे | रात्रौ ०८ वाजून ४० मिनिटे |
जळगाव | रात्रौ ०८ वाजून ३७ मिनिटे |
वर्धा | रात्रौ ०८ वाजून २५ मिनिटे |
यवतमाळ | रात्रौ ०८ वाजून २८ मिनिटे |
बीड | रात्रौ ०८ वाजून ४१ मिनिटे |
सांगली | रात्रौ ०८ वाजून ५१ मिनिटे |
सावंतवाडी | रात्रौ ०८ वाजून ५६ मिनिटे |
सोलापूर | रात्रौ ०८ वाजून ४३ मिनिटे |
नागपूर | रात्रौ ०८ वाजून २२ मिनिटे |
अमरावती | रात्रौ ०८ वाजून २८ मिनिटे |
अकोला | रात्रौ ०८ वाजून ३२ मिनिटे |
छत्रपती संभाजीनगर | रात्रौ ०८ वाजून ४१ मिनिटे |
भुसावळ | रात्रौ ०८ वाजून ३६ मिनिटे |
परभणी | रात्रौ ०८ वाजून ३६ मिनिटे |
नांदेड | रात्रौ ०८ वाजून ३३ मिनिटे |
धाराशीव | रात्रौ ०८ वाजून ४२ मिनिटे |
भंडारा | रात्रौ ०८ वाजून २० मिनिटे |
चंद्रपूर | रात्रौ ०८ वाजून २४ मिनिटे |
बुलढाणा | रात्रौ ०८ वाजून ३६ मिनिटे |
मालवण | रात्रौ ०८ वाजून ५७ मिनिटे |
पणजी | रात्रौ ०८ वाजून ५७ मिनिटे |
बेळगाव | रात्रौ ०८ वाजून ५३ मिनिटे |
इंदौर | रात्रौ ०८ वाजून ३१ मिनिटे |
ग्वाल्हेर | रात्रौ ०८ वाजून १३ मिनिटे |
॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥
Web Summary : Ashwin Sankashti Chaturthi, the last in Chaturmas, is observed with fasting and Ganesh puja. It's believed to bring good fortune. The article details the vrat vidhi and moonrise timings for various cities.
Web Summary : अश्विन संकष्टी चतुर्थी, चातुर्मास की अंतिम, उपवास और गणेश पूजा के साथ मनाई जाती है। यह सौभाग्य लाने वाली मानी जाती है। लेख में व्रत विधि और विभिन्न शहरों के लिए चंद्रोदय का समय बताया गया है।