शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

श्रावण मंगळवार: आवर्जून म्हणा ‘गजानन बावनी’, अपार कृपेचे व्हा धनी; शुभ करेल माऊली, कृपासिंधू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 10:08 IST

Gajanan Maharaj Bavani On Shravan Mangalwar: गजानन महाराजांचे मंत्र, श्लोक, स्तोत्रे अतिशय प्रभावी मानली जातात. यापैकी हे एक स्तोत्र श्रावणी मंगळवारी आवर्जून म्हणावे, असे सांगितले जाते.

Gajanan Maharaj Bavani On Shravan Mangalwar: गण गण गणात बोते! श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवेत्ते महान संत. त्यांचे जीवन हे एक मोठे गूढच होते. दिगंबर वृत्तीच्या या अवलिया गजाननांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला. गजानन महाराजांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले. ते सिद्धयोगी पुरुष होते. अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत महाराजांच्या “गण गण गणात बोते” या सिद्धमंत्रात व्यक्त झाला आहे. श्रावण मास हा वैविध्यपूर्ण व्रत-वैकल्यांसाठी विशेष महत्त्व असलेला महिना आहे. श्रावणी मंगळवारी गजानन महाराज यांचे हे एक स्तोत्र म्हटले किंवा श्रवण केले तर, गुरुकृपेचा अपार लाभ प्राप्त होऊ शकतो, असे सांगितले जाते. 

श्री स्वामी समर्थ महाराजांचे दैवी शिष्य असलेल्या गजानन महाराजांनी शेगावी येथे अनेकांना मार्गदर्शन केले. गजानन महाराज त्रिकालज्ञ होते. भूत, भविष्य आणि वर्तमान याविषयी ते अगोदरच जाणून असायचे.  महाराजांनी अनेकांना सन्मार्ग दाखविला. वऱ्हाडातील भक्त त्यांना प्रेमाने 'गजानन बाबा' म्हणतात. गजानन महाराजांचे कोट्यवधी भक्त आहेत. केवळ देशात नाही, तर परदेशातही गजानन महाराजांचे मठ, मंदिरे आहेत. गजानन महाराजांसंदर्भात अनेक स्तोत्रे, मंत्र, श्लोक आढळून येतात. परंतु, यापैकी गजानन बावनी हे स्तोत्र प्रभावी मानले गेले आहे. या स्तोत्रात ते कसे आचरावे, त्याची फलश्रुती काय, याबाबतचे आश्वासन पाहायला मिळते. 

गजानन महाराजांच्या अद्भूत लीलांचा प्रत्यय, अनुभव अनेकांना आला आहे. आजही मोठ्या प्रमाणावर गजानन महाराजांना भजले, पूजले जाते. संकटे, समस्या, अडचणी आल्या असतील, काही मार्ग दिसत नसेल तर गजानन महाराजांना शरण जावे. आपले दुःख श्रींना सांगावे. गजानन महाराजा भक्तांचा हाकेला त्वरेने धावून येतात. गजानन महाराजांच्या बावनी स्तोत्राचे नियमितपणे पठण किंवा श्रवण करावे. गजानन बावनी नित्य ध्यानी मनी ठेवावी. बावन्न गुरुवार या गजानन बावनीचे मनोभावे संकल्पयुक्ताने पठण किंवा श्रवण केल्यास सारी विघ्ने दूर होतील. सुख-समृद्धीचा लाभ घेता येईल. सगळ्या चिंता दूर होतील. संकटातून तरुन जाता येईल. परंतु, यासोबत सदाचाराचा अंगीकार करायला हवे, असे सांगितले जाते.

गजानन बावनी

जय जय सदगुरू गजानना | रक्षक तूची भक्तजना ||१|| निर्गुण तू परमात्मा तू | सगुण रुपात गजानन तू ||२|| सदेह तू, परी विदेह तू | देह असून देहातीत तू ||३|| माघा वैद्य सप्तमी दिनी | शेगावात प्रगटोनी ||४|| उष्ट्या पत्रावालीनिमित्त | विदेह्त्व तव हो प्रगट ||५|| बंकट लालावारी तुझी | कृपा जाहली ती साची ||६||गोसाव्याच्या नवसासाठी | गांजा घेसी लावून ओठी ||७|| तव पद तीर्थे वाचविला | जानराव तो भक्त भला ||८||जानाकीरामा चिंच वणे | नासावोनी स्वरूपी आणणे ||९|| मुकीन चंदूचे कानवले | खाउन कृतार्थ त्या केले ||१०|| विहिरी माजी जलविहीना | केले देवा जल भरणा ||११|| मध माश्यांचे डंख तुवा | सहन सुखे केले देवा ||१२|| त्यांचे काटे योगबले | काढुनी सहजी दाखविले ||१३|| कुस्ती हरीशी खेळोनि | शक्ती दर्शन घडवोनी ||१४|| वेद म्हणुनी दाखविला | चकित द्रविड ब्राह्मण झाला ||१५|| जळत्या पर्याकावरती | ब्रह्म्हगीरीला ये प्रचीती ||१६|| टाकळीकर हरिदासाचा | अश्व शांत केला साचा ||१७|| बाळकृष्ण बाळापुराचा | समर्थ भक्ताची जो होता ||१८|| रामदास रूपे तुला | दर्शन देवोनी तोषविला ||१९|| सुकुलालाची गोमाता | द्वाड बहु होती ताता ||२०|| कृपा तुझी होताच क्षणी | शांत जाहली ती जननी ||२१|| घुडे लक्ष्मण शेगावी | येता व्याधी तू निरवी ||२२|| दांभिकता परी ती त्याची | तू न चालवोनी घे साची ||२३|| भास्कर पाटील तव भक्त | उद्धरलासी तू त्वरित ||२४|| आज्ञा तव शिरसावंद्य | काकाही मानती तुज वंद्य ||२५|| विहिरीमाजी रक्षियला | देवा तू गणू जवरयाला ||२६|| पिताम्बराकार्वी लीला | वठला आंबा पल्लवीला ||२७|| सुबुद्धी देशी जोश्याला | माफ करी तो दंडाला ||२८|| सवडत येशील गंगाभारती | थुंकून वारिली रक्तपिती ||२९|| पुंडलिकाचे गंडांतर | निष्टा जाणून केले दूर ||३०|| ओंकारेश्वरी फुटली नौका | तारी नर्मदा क्षणात एका ||३१|| माधवनाथा समवेत | केले भोजन अदृष्ट ||३२|| लोकमान्य त्या टिळकांना | प्रसाद तूची पाठविला ||३३|| कवर सुताची कांदा भाकर | भक्शिलास तू त्या प्रेमाखातर ||३४|| नग्न बैसोनी गाडीत | लीला दाविली विपरीत ||३५|| बायजे चित्ती तव भक्ती | पुंडलीकावारी विरक्त प्रीती ||३६|| बापुना मनी विठल भक्ती | स्वये होशी तू विठ्ठल मूर्ती ||३७|| कवठ्याच्या त्या वारकऱ्याला | मरीपासुनी वाचविला ||३८|| वासुदेव यती तुज भेटे | प्रेमाची ती खुण पटे ||३९|| उद्धट झाला हवालदार | भस्मीभूत झाले घरदार ||४०|| देहान्ताच्या नंतरही | कितीजना अनुभव येई ||४१|| पडत्या मजूर झेलीयेले | बघती जन आश्चर्य भले ||४२|| अंगावरती खांब पडे | स्त्री वांचे आश्चर्य घडे ||४३|| गजाननाच्या अद्भुत लीला | अनुभव येती आज मितीला ||४४|| शरण जाऊनी गजानना | दुक्ख तयाते करी कथना ||४५|| कृपा करी तो भक्तांसी | धावून येतो वेगेसी ||४६|| गजाननाची बावन्नी | नित्य असावी ध्यानी मनी ||४७|| बावन्न गुरुवार नेमे | करी पाठ बहु भक्तीने ||४८|| विघ्ने सारी पळती दूर | सर्व सुखांचा येई पूर ||४९|| चिंता सारया दूर करी | संकटातूनी पार करी ||५०|| सदाचार रत साद भक्ता | फळ लाभे बघता बघता ||५१|| सुरेश बोले जय बोला | गजाननाची जय बोला || जय बोला हो जय बोला | गजाननाची जय बोला ||५२||

|| अनंत कोटी ब्रम्हांड नायक, महाराजाधिराज योगीराज, सद्गुरू श्री गजानन महाराज की जय ||

|| गण गण गणात बोते || 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलGajanan Maharajगजानन महाराजspiritualअध्यात्मिक