Ayodhya Ram Mandir: २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत भव्य राम मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. रामललाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर कोट्यवधी भाविकांनी अयोध्येत जाऊन रामललाचे दर्शन घेतले. याच राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर श्रीरामांचा दरबारही पूर्ण झाला आहे. अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण होऊन दीड वर्ष उलटून गेले, तरी भाविकांची राम दर्शनाची आस अद्यापही कमी झालेली नाही. २०२४ मध्ये अयोध्येत पोहोचलेल्या १६ कोटी भाविकांचा विक्रम केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी एक ऐतिहासिक आकडा आहे. परंतु, सप्टेंबर महिन्यात राम मंदिर सुमारे १८ तासांसाठी बंद राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
मृत्यू पंचकात खग्रास चंद्रग्रहण २०२५: सूतक काल कधी? काय करावे अन् काय करू नये; पाहा, नियम
नवीन भव्य श्रीराम मंदिरामुळे अयोध्येत केवळ भाविकांचा ओघ वाढला नाही तर शहराच्या अर्थव्यवस्थेने आणि पर्यटन पायाभूत सुविधांनीही नवीन विक्रम प्रस्थापित केले. श्रीराम मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यापासून आजपर्यंत रामललाच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ तसाच कायम आहे. आजही अयोध्येत लाखो भाविक राम मंदिराच्या दर्शनासाठी येत आहेत. चातुर्मास सुरू असून, भाद्रपद पौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण आहे. या खग्रास चंद्रग्रहणावेळी मृत्यू पंचक लागणार आहे. संपूर्ण भारतात हे चंद्रग्रहण दिसणार असून, या कालावधीत अयोध्येतील राम मंदिर बंद राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.
मृत्यू पंचक २०२५: अनंत चतुर्दशी, चंद्रग्रहणात अशुभाची छाया; चुकूनही ‘ही’ कामे करू नका!
खग्रास चंद्रग्रहण काळात राम मंदिर राहणार बंद
२०२५ मधील शेवटचे चंद्रग्रहण ७ सप्टेंबर रोजी आहे. चंद्रग्रहणाच्या ९ तास आधी मठ मंदिरांचे दरवाजे बंद केले जातील. केवळ अयोध्याच नाही तर संपूर्ण भारतात ७ सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण होत आहे. चंद्रग्रहण रात्री ९.५८ वाजता होईल आणि मध्यरात्री १.२६ मिनिटांनी संपेल. या काळात अयोध्येतील सर्व मठ मंदिरांसह, राम मंदिर भाविकांसाठी बंद केले जाणार आहे. भगवानांच्या नैवेद्य आणि आरतीनंतर दुपारी मंदिराचे दरवाजे बंद केले जातील आणि ८ सप्टेंबर रोजी सकाळी मंदिर भाविकांसाठी खुले होणार आहे.
७ सप्टेंबर २०२५ दुपारपासून ते ८ सप्टेंबर सकाळपर्यंत मंदिर बंद
धार्मिक मान्यतेनुसार, चंद्रग्रहणाच्या ९ तास आधी मंदिरांचे दरवाजे बंद केले जातात. राम मंदिर प्रशासन ७ सप्टेंबर रोजी दुपारी चंद्रग्रहणामुळे राम मंदिर दर्शनासाठी बंद ठेवणार आहे. इतकेच नाही तर राम मंदिरासह अयोध्येतील सर्व मठ मंदिरांचे दरवाजे बंद केले जातील, जे दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच ८ सप्टेंबर रोजी पुन्हा उघडतील. राम मंदिर ट्रस्टचे विशेष निमंत्रित गोपाल राव यांनी सांगितले की, ७ सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण होईल. चंद्रग्रहणाच्या अगदी ९ तास आधी मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. अयोध्येच्या परंपरेनुसार, राम मंदिरातही ग्रहणाची व्यवस्था केली जात आहे.