शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

वडापावच्या गाडीवर काम करणारा मुलगा झाला वडापाव फ्रँचायझीचा मालक; वाचा ही बोधकथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 18:49 IST

सगळे दिवस सारखे नसतात. प्रत्येक अडचणींतून मार्ग निघतोच. तो मिळेपर्यंत श्रद्धा आणि सबुरी हाच मार्ग निवडावा लागतो.

आयुष्यात जेव्हा अडचणीतून बाहेर पडण्याचे सगळे मार्ग बंद झाले असे वाटेल, तेव्हा क्षणभर थांबा, विचार करा कारण एक तरी मार्ग तुम्हाला नव्या वाटेकडे निश्चितच घेऊन जाईल. अशा वेळी गरज असते, ती श्रद्धा आणि सबुरीची!

स्वत:ला सिद्ध करण्यासाठी घर दार सोडून बाहेर पडलेला एक मुलगा कामाच्या शोधात गावोगावी फिरत होता. परंतु काम तर दूरच, त्याची दोन वेळेच्या जेवणाचीही अडचण होऊ लागली. वाटेत त्याला एक साधू भेटले. तो त्यांना म्हणाला, 'मला मार्ग दाखवा.'साधू म्हणाले, `तुझा मार्ग तुला स्वत:लाच शोधावा लागेल आणि शोधलास तर तुला तो नक्की सापडेल.'मुलगा म्हणाला, `पण महाराज, इतके दिवस मी तेच करत होतो. आता मात्र मी हरलो.'साधू म्हणाले, 'ज्या वेळेस आपण स्वत:च हरलो असे मान्य करतो, तेव्हा जिंकायची दारे आपण स्वत:हून बंद करत असतो. तुला अडचणींवर मात करत स्वत:चा मार्ग धुंडाळावा लागेल. त्यासाठी श्रद्धा आणि सबुरी ठेव.'

मुलाने साधू महाराजांना नमस्कार केला आणि तो कामाच्या शोधार्थ भटकू लागला. त्याने मनाशी ठरवून टाकले, काहीही झाले तरी काम करायचे, पण फुकटचे मागून जगायचे नाही. भीक तर अजिबात मागायची नाही.

मुलाच्या या निश्चयामुळे त्याची पडेल ते काम करण्याची मनाची तयारी झाली होती. त्यामुळे विविध प्रकारच्या संधीदेखील त्याच्यासमोर उपलब्ध होऊ लागल्या. फक्त त्याला संधी ओळखण्याची गरज होती. 

त्याला खूप भूक लागली होती. तो एका वडापावच्या गाडीसमोर जाऊन थांबला. खिशात पैसे नव्हते पण पोटात भूक होती. गाडीमालकाने त्याला दया दाखवत वडापाव दिला, पण त्याने तो नाकारला. तो म्हणाला, `काही काम असेल तर मी ते करायला तयार आहे. माझ्या कामाच्या मोबदल्यात मला खायला द्या, पण फुकट नको.'

त्याची प्रामाणिकता पाहून मालकाने त्याला कामाला ठेवून घेतले. तो मन लावून मेहनत करू लागला आणि दिवस रात्र एक करून कमाई करू लागला. व्यवसायात मदतनीस म्हणून काम करता करता त्याने व्यवसायातील बारकावे शिकून घेतले आणि पैशांची जुळवाजुळव करत स्वत:ची वडापावची गाडी टाकली. पाहता पाहता त्याचे प्रस्थ एवढे वाढले की अनेक शहरांतून त्याच्या वडापाव ब्रँडच्या शाखा सुरू झाल्या. एक दिवस त्या मुलाची आणि साधू महाराजांची पुनश्च गाठ पडली. तेव्हा मुलाने त्यांना ओळख दिली, त्यावर महाराज म्हणाले, 'तू स्वत:वर विश्वास ठेवलास म्हणून अडचणीतून मार्ग शोधलास, तू तेव्हाच हार पत्करली असतीस, तर तू कधीच या जगाला निरोप दिला असतास.'

म्हणून स्वत:च्या प्रयत्नांवर विश्वास आणि देवावर अतूट श्रद्धा ठेवा. सगळे दिवस सारखे नसतात. प्रत्येक अडचणींतून मार्ग निघतोच. तो मिळेपर्यंत श्रद्धा आणि सबुरी हाच मार्ग निवडावा लागतो.

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी