शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Bhanu Saptami 2023: रविवारी भानू सप्तमीला 'हे' काम केल्याने वाढेल मान-सन्मान, प्रत्येक कामात मिळेल उत्तुंग यश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 13:56 IST

Bhanu Saptami 2023: भानु सप्तमीला सूर्यपूजा करतात. त्या पूजेस लेखात दिलेल्या गोष्टीची जोड दिल्यास इच्छित फलप्राप्ती झालीच समजा!

हिंदू कॅलेंडरनुसार, सप्तमी तिथी प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पंधरवड्यांमध्ये येते. सप्तमी तिथी ही भगवान सूर्यदेवांना समर्पित आहे. फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी भानु सप्तमी म्हणून ओळखली जाते. या दिवशी भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण करण्याबरोबरच त्याची विधिवत पूजा केली जाते. भारतात सूर्यपूजेची मोठी परंपरा आहे. जी व्यक्ती नियमीतपणे सूर्यपूजा करते, ती सूर्यदेवाच्या कृपेस पात्र होते. म्हणून वर्षभर जमले नाही तरी सुर्यपुजेशी संबंधित तिथीला दिलेली उपासना जरूर करावी असे शास्त्र सांगते. 

सूर्योपासना करणाऱ्याला आयुष्य, आरोग्य, तेज प्राप्त होतेच शिवाय अनेकविध आजारांपासून मुक्ती देखील मिळते. तुम्हालाही ते लाभ हवे असतील तर भानू सप्तमीपासून सूर्य पूजेस प्रारंभ करा. त्यासाठी जाणून घेऊया व्रत विधी. 

भानु सप्तमी शुभ मुहूर्त २०२३

हिंदू कॅलेंडरनुसार, भानु सप्तमी २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १२. ३० वाजता सुरू होईल आणि तारीख २७ फेब्रुवारी रोजी सकाळी १२. ५९ वाजता समाप्त होईल. या दिवशी २६ फेब्रुवारीला संध्याकाळी ४.२६ पर्यंत इंद्र योग राहील. त्याचबरोबर त्रिपुष्कर योगाची सुरुवात २६ फेब्रुवारीला सकाळी ६.३९ ते २७ फेब्रुवारीला सकाळी १२. ५९ पर्यंत असेल.

भानु सप्तमी पूजन पद्धत

या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. हे व्रत कायमस्वरूपी अंगिकारणार असाल तर त्यादिवशी हातात पाणी घेऊन सूर्याकडे बघत अर्घ्य द्यावे आणि संकल्प सोडावा. ही पूजा त्या दिवसापुरती असेल तर स्नान करून तांब्याच्या भांड्यात पाणी, अक्षत, कुंकू घेऊन सूर्याला अर्घ्य द्यावे. त्या दिवशी उपास करावा.  फलाहार करावा. दुसऱ्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यानंतरच उपवास सोडावा. गरजूंना दान आणि गाईला हिरवा चारा द्यावा. याबरोबर सूर्यनमस्कार तसेच सूर्याची बारा नावे घेऊन सूर्यपूजा पूर्ण करावी. या उपासनेने होणारा लाभ काही काळातच तुम्हाला दिसून येईल. 

सूर्यपूजेसाठी सूर्याची बारा नावे-

ओम मित्राय नमः ।

ओम रावये नमः ।

ओम सूर्याय नमः ।

ओम भानवे नमः ।

ओम खगाय नमः ।

ओम पुश्ने नमः ।

ॐ हिरण्यगर्भाय नमः ।

ओम मारिचये नमः ।

ॐ आदित्यय नमः ।

ॐ सवित्रे नमः।

ॐ अर्काय नमः।

ॐ भास्कराय नमः।

टॅग्स :Astrologyफलज्योतिष